लाडकी बहिण योजनेसाठी या बँकेत खाते काढा मिळणार सर्वात आधी पैसे | Ladki Bahin Yojana Bank List

Ladki Bahin Yojana Bank List मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महाराष्ट्र राज्यात सुरू झाली असून या योजनेचा अर्ज करण्यासाठी आता सर्वत्र महिला गर्दी करत असल्याचे पाहायला मिळत आहे कारण त्वरित घोषणा करून योजनेचे अर्ज करण्यासाठी मोबाईल ॲप्लिकेशन द्वारे ऑनलाईन पद्धतीने सुरुवात करण्यात आली आहे. तुम्ही देखील स्वतः तुमच्या मोबाईल मधून या योजनेसाठी अर्ज करत असल्यास बँक खात्याबद्दल देखील अनेक महिलांच्या मनात शंका आहे अर्ज करण्यासाठी दोन महिन्यांची मुदत असल्यामुळे तुम्ही बँक खाते देखील या योजनेसाठी योग्य ते वापरायचे आहे बँक खात्याबद्दलची सविस्तर माहिती तुम्हाला खाली देण्यात आली आहे ती माहिती तपासूनच सदरील बँकेत तुमचे खाते आहे का हे तुम्ही पाहू शकता.

महाराष्ट्र सरकारच्या अतिरिक्त अधिवेशनामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली अर्थमंत्री अजित पवार यांच्या वतीने अर्थसंकल्पामध्ये या योजनेसाठी वार्षिक 46 हजार कोटींची तरतूद करण्यात आल्याचे सांगितले आणि या योजनेचे मूळ उद्देश म्हणजे राज्यभरातील महिलांचे राहणीमान, जीवनशैली उंचावणे आरोग्य सुधारणे आणि महिलांना बळकट करण्यासाठी सहाय्य म्हणून रक्कम देणे. या योजनेद्वारे राज्यभरातील २१ ते ६० वर्षे वयोगटातील सर्वच महिलांना ज्या पात्रतेमध्ये पात्र आहेत अशा सर्वांना दर महिन्याला १५०० रुपये डीबीटी म्हणजेच डायरेक्ट बेनिफिशियरी ट्रान्सफर द्वारे महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्याची घोषणा करण्यात आली.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अधिवेशनामध्ये घोषणा करण्यात आलेल्या या योजनेची अधिसूचना म्हणजेच अधिकृत शासन निर्णय दिनांक 28 जून 2024 रोजी प्रसिद्ध करण्यात आला त्वरित अंमलबजावणी करण्याची आदेश दिल्याने या योजनेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया देखील लगेच सुरू करण्यात आली.

योजनेसाठी नवीन शासन निर्णयानुसार सध्या तरी फक्त नारीशक्ती दूत या मोबाईल ॲप्लिकेशन द्वारे नोंदणी करण्याची प्रक्रिया सुरू आहे यासाठी तुमच्या जवळील अंगणवाडी सेविकांकडे जाऊन तुम्ही तुमचे अर्ज सबमिट करू शकणार आहात अथवा तुमच्या मोबाईल मधून हे ॲप्लिकेशन डाऊनलोड करून कोणतेही शुल्क न भरता तुमचा अर्ज योग्यरित्या सबमिट करू शकणार आहात.Ladki Bahin Yojana Bank List

लाडकी बहीण योजनेसाठी बँक खात्याबद्दल देखील अनेकांच्या मनात विविध शंका आहे कारण कोणत्या बँक खात्यामध्ये हे पैसे येणार आहेत किंवा येणार नाहीत याबद्दल अनेक जण प्रश्न विचारत आहेत. या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांच्या आधार कार्ड ला जे बँक खाते लिंक असेल ते बँक खाते आणि त्याची माहिती तुम्ही दिल्यास तुमचा चांगला फायदा होणार आहे. मित्रांनो यामध्ये पतसंस्थेमध्ये किंवा इतर कुठल्याही संस्थांमध्ये असणारी बँक खाते तुम्ही देऊ नका शक्यतो राष्ट्रीयकृत बँकेत खाते असल्यास फायदा आहे आणि नसल्यास तुमच्याकडे अजून मुदत आहे आणि या मुदतीमध्ये तुम्ही बँक खाते काढून घेऊ शकणार आहात.

या योजनेसाठी इंडिया पोस्ट पेमेंट बँक म्हणजेच पोस्टमध्ये खाते असल्यास तुम्हाला लवकर पैसे मिळतात कारण पोस्टामधील बँक खाते तुमच्या आधार कार्ड ला डायरेक्ट लिंक केलेले असते आणि त्यामुळेच तुम्हाला हप्ता येण्यासाठी किंवा योजनेचे पैसे मिळण्यासाठी कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही इतरही राष्ट्रीयकृत बँका असतील, जिल्हा मध्यवर्ती बँक असेल अथवा सहकारी बँक मध्ये देखील तुमचे खाते असल्यास आणि त्याला आधार कार्ड लिंक असल्यास तुम्हाला पैसे येण्यात कोणतीही अडचण येणार नाही.

माझी लाडकी बहिण योजना महत्वाची माहिती –

माझी लाडकी बहिण योजना अर्ज प्रक्रिया मोबाईल सविस्तर माहिती व कागदपत्रे

लाडकी बहिण योजना या नवीन एप्लिकेशन मधून करा तुमचा अर्ज 10 मिनिटांत

  • सर्वात प्रथम लाभार्थी व्यक्तींच्या आधार कार्डचा पुढच्या व मागच्या दोन्ही बाजूचा फोटो तुम्हाला काढून घ्यायचा आहे.
  • यानंतर अधिवास प्रमाणपत्र म्हणून तुम्ही जे ही तुमच्याकडे कागदपत्र असणार आहे जसे की रेशन कार्ड असेल, पंधरा वर्षांपूर्वी मतदान कार्ड असेल अथवा शाळा सोडल्याचा दाखला असेल याचा व्यवस्थित फोटो काढायचा आहे.
  • उत्पन्नाचे प्रमाणपत्र असल्यास उत्पन्नाचे प्रमाणपत्र अथवा त्या ठिकाणी तुम्ही पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड याचा फोटो काढून ठेवायचा आहे.
  • यानंतर सर्वात महत्त्वाचे म्हणजे बँक पासबुक च्या पहिल्या पानाचा फोटो तुम्ही व्यवस्थित काढायचा आहे.
  • हमीपत्र यासाठी तुम्हाला खाली दिलेली पीडीएफ प्रिंट करून त्यावर सही करायची आहे आणि सही करून या पीडीएफ चा देखील तुम्हाला चांगला फोटो काढून घ्यायचा आहे.Ladki Bahin Yojana Bank List
Ladki Bahin Yojana Bank List

माझी लाडकी बहिण योजनेचा अर्ज करताना ज्या महिलांकडे पांढरे रेशन कार्ड आहे अशा महिलांना २.५ लाख रुपयांपेक्षा कमी असेलेले उत्पन्नाचा दाखला आवशक असणार आहे आणि हा दाखला तहसीलदार यांच्याकडून घेतलेला असावा.

लाडकी बहिण योजना अर्ज प्रक्रियायेथे क्लिक करा
लाडकी बहिण योजना हमीपत्र डाऊनलोड करायेथे क्लिक करा
योजनेचा अधिकृत शासननिर्णय पाहण्यासाठीयेथे क्लिक करा
योजना ग्रुप जॉईन करण्यासाठीयेथे क्लिक करा