लाडकी बहिण योजना या नवीन एप्लिकेशन मधून करा तुमचा अर्ज 10 मिनिटांत | Majhi Ladki Bahin Yojana Form

Majhi Ladki Bahin Yojana Form नमस्कार मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी ऑनलाईन पद्धतीने मोबाईल वरून नोंदणी करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून यासाठी मोबाईल ॲप्लिकेशन द्वारे तुम्ही अगदी काही मिनिटांमध्ये तुमचे अर्ज करू शकणार आहात आणि हे अर्ज अगदी योग्यरीत्या सबमिट देखील होत आहेत. याबाबत असणारे अनेक प्रश्न तसेच नवीन एप्लीकेशन बद्दल सविस्तर माहिती आणि अर्ज करण्याची प्रक्रिया संपूर्ण स्टेप बाय स्टेप तुम्हाला खाली देण्यात आली आहे. ही प्रक्रिया करून तुम्ही अगदी तुमच्या घरबसल्या दहा ते पंधरा मिनिटांमध्ये तुमचा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज सबमिट करू शकणार आहात.

मित्रांनो या योजनेसाठी मोबाईल ॲप्लिकेशन द्वारे सध्या नोंदणी सुरू आहे का तुमच्या मोबाईल मधील गुगल प्ले स्टोअर वरती जाऊन नारीशक्ती दूत या एप्लीकेशन ला डाऊनलोड करून घ्यायचे आहे आणि यामधूनच तुम्हाला या योजनेसाठी चा अर्ज करायचा आहे. इतर वेबसाईटवरून अथवा ऑफलाइन पद्धतीने अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया अद्याप सुरू झाली नाही परंतु या मोबाईल ॲप्लिकेशन वरून तुम्ही ऑनलाईन पद्धतीने लगेच तुमची नोंदणी करून तुमचा अर्ज देखील सबमिट करू शकणार आहात.

मित्रांनो सदरील मोबाईल ॲप्लिकेशन हे महाराष्ट्र राज्य सरकारच्या वतीने जारी करण्यात आले आहे आणि या एप्लीकेशन मधूनच तुम्हाला हा अर्ज करायचा आहे यासाठी सर्वात प्रथम तुम्हाला आवश्यक असणारे कागदपत्रांचे चांगले व क्लिअर फोटो काढून घ्यायचे आहेत जेणेकरून अपलोड केल्यानंतर हे फोटो क्लिअर दिसल्यावर तुमचे अर्ज स्वीकारण्यात कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही.

या योजनेचा अर्ज करण्यासाठी लाभार्थी महिलांकडून कोणत्याही प्रकारचे शुल्क घेतले जाणार नाही याबाबतचे आदेश राज्य सरकारच्या वतीने देण्यात आले आहेत आणि त्यामुळेच तुम्ही कुठेही जाण्याची आवश्यकता नाही आणि अगदी काही वेळात तुम्ही या योजनेसाठी तुमचे अर्ज करू शकणार आहात ही सविस्तर प्रक्रिया खाली देण्यात आली आहे आणि यातूनही नाही समजल्यास या प्रक्रियेचा संपूर्ण व्हिडिओ देखील तुम्ही खाली पाहू शकणार आहात.Majhi Ladki Bahin Yojana Form

या योजनेचा अर्ज करण्यासाठी तुम्ही खालील कागदपत्रे ठेवायची आहेत त्यामुळे त्यांचे फोटो तुम्ही व्यवस्थित मोबाईल मध्ये काढून घेयचे आहेत. (Majhi Ladki Bahin Yojana Documents)

  • सर्वात प्रथम लाभार्थी व्यक्तींच्या आधार कार्डचा पुढच्या व मागच्या दोन्ही बाजूचा फोटो तुम्हाला काढून घ्यायचा आहे.
  • यानंतर अधिवास प्रमाणपत्र म्हणून तुम्ही जे ही तुमच्याकडे कागदपत्र असणार आहे जसे की रेशन कार्ड असेल, पंधरा वर्षांपूर्वी मतदान कार्ड असेल अथवा शाळा सोडल्याचा दाखला असेल याचा व्यवस्थित फोटो काढायचा आहे.
  • उत्पन्नाचे प्रमाणपत्र असल्यास उत्पन्नाचे प्रमाणपत्र अथवा त्या ठिकाणी तुम्ही पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड याचा फोटो काढून ठेवायचा आहे.
  • यानंतर सर्वात महत्त्वाचे म्हणजे बँक पासबुक च्या पहिल्या पानाचा फोटो तुम्ही व्यवस्थित काढायचा आहे.
  • हमीपत्र यासाठी तुम्हाला खाली दिलेली पीडीएफ प्रिंट करून त्यावर सही करायची आहे आणि सही करून या पीडीएफ चा देखील तुम्हाला चांगला फोटो काढून घ्यायचा आहे.Majhi Ladki Bahin Yojana Form

माझी लाडकी बहिण योजना Application डाऊनलोड करण्यासाठी – इथे क्लिक करा

मित्रांनो या योजनेचा अर्ज करण्यासाठी आता मोबाईल ॲप्लिकेशन मधून सुरुवात झाली असून यामधून अगदी काही मिनिटांमध्ये तुम्ही तुमचे अर्ज घरबसल्या सबमिट करू शकणार आहात यासाठी तुमच्याकडे आवश्यक असणाऱ्या कागदपत्रांची पूर्तता करणे अनिवार्य असणार आहे आणि अर्ज करण्यासाठीची सविस्तर प्रक्रिया खाली देण्यात आली आहे.

  • मित्रांनो यासाठी सुरुवातीला तुम्हाला तुमच्या मोबाईल मध्ये प्ले स्टोअर मध्ये जाऊन नारीशक्ती दूत हे ॲप्लिकेशन डाऊनलोड करून घ्यायचे आहे.
  • एप्लीकेशन डाउनलोड केल्यानंतर सुरुवातीला तुम्हाला यामध्ये तुमची प्रोफाइल अपडेट करून घ्यावी लागणार आहे.
  • सुरुवातीला तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकून लॉगिन या बटणावर क्लिक करायचे आहे लॉगिन बटणावर क्लिक केल्यानंतर तुमच्या मोबाईलवर तुम्हाला चार अंकी ओटीपी येणार आहे तो ओटीपी टाकून स्वीकारा या बटनावर क्लिक करून तुम्हाला पुढे जायचे आहे.
  • यानंतर तुम्हाला तुमची वैयक्तिक माहिती प्रोफाइल अपडेट साठी विचारली जाणार आहे ज्यामध्ये तुमचे नाव, ईमेल आयडी, तुमचा जिल्हा, तालुका आणि नारीशक्ती प्रकार निवडावा लागणार आहे.
  • नारीशक्ती प्रकारामध्ये तुम्ही स्वतःसाठी अर्ज करत असल्यास त्या ठिकाणी तुम्हाला सामान्य महिला यावर क्लिक करायचे आहे आणि पुढे जायचे आहे.
  • प्रोफाइल अपडेट झाल्यानंतर तुम्हाला होम पेजवर यायचे आहे आणि त्या ठिकाणी तुम्हाला खाली योजना या पर्यायावर क्लिक करून त्यानंतर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेच्या पर्यायावर क्लिक करायचे आहे यानंतर तुम्हाला फॉर्म ओपन होणार आहे या फॉर्ममध्ये तुम्हाला विचारलेली सर्व माहिती तुम्ही सविस्तर भरायची आहे.
  • यामध्ये जन्मस्थळ असेल, तुमचा पत्ता असेल, तुमचा जन्म दिनांक, तुमचे संपूर्ण नाव पतीचे नाव यांसारखी सर्व माहिती भरून त्यानंतर तुम्हाला तुमच्या बँकेचा तपशील व्यवस्थित भरायचा आहे.
  • बँकेचा तपशील भरताना त्या ठिकाणी आयएफएससी कोड, बँक अकाउंट नंबर याची खात्री करून घ्यायची आहे आणि तुम्ही इतर कुठल्या योजनेचा लाभ घेत नाही हे देखील तुम्हाला त्या ठिकाणी सिलेक्ट करायचे आहे.Majhi Ladki Bahin Yojana Form
Majhi Ladki Bahin Yojana Form
हमीपत्र डाउनलोड करण्यासाठीयेथे क्लिक करा
योजनेचा अधिकृत शासननिर्णय पाहण्यासाठीयेथे क्लिक करा
योजनेची पात्रता पाहण्यासाठीयेथे क्लिक करा
योजना ग्रुप जॉईन करण्यासाठीयेथे क्लिक करा

माझी लाडकी बहिण योजना महत्वाच्या अपडेट्स –

माझी लाडकी बहिण या 04 कागदपत्रांद्वारे भरा तुमचा अर्ज मोबाईल मधून | Majhi Ladki bahin Yojana Documents

माझी लाडकी बहिण योजना अर्ज प्रक्रिया मोबाईल सविस्तर माहिती व कागदपत्रे | Mazi Ladki bahin Yojana Online Apply