Mazi Ladki Bahin Yojana New GR महाराष्ट्र राज्यातील सध्याच्या सर्वात महत्त्वाचा योजनांपैकी एक असलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा पुन्हा एकदा नवीन शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आलेला आहे आणि या शासन निर्णयानुसार आता या योजनेमध्ये काही बदल पुन्हा एकदा करण्यात आलेले आहेत हे बदल अत्यंत महत्त्वाचे असणार असून यामुळे काही कागदपत्रांची पूर्तता तुम्हाला आता करावी लागणार नाही तसेच काही महिलांना आता या योजनेसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज देखील करण्याची आवश्यकता नसणार आहे आणि फक्त ऑफलाईन अर्ज भरूनच अशा महिलांना या योजना चा लाभ दिला जाणार आहे. आणि त्यामध्ये नमूद केल्यात आलेली सर्व सविस्तर माहिती तुम्हाला खाली देण्यात आली आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना नवीन शासननिर्णय :
महाराष्ट्र शासन महिला व बालविकास विभाग यांच्याद्वारे दिनांक 12 जुलै 2024 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या या शासन निर्णयानुसार राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य आणि घोषणा सुधारणा करण्यासाठी तसेच कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राबवण्यास दिनांक 28 जून 2024 रोजी राज्य सरकारच्या हिवाळी अधिवेशनात मान्यता देण्यात आलेली आहे.
योजना नाव | मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना |
विभाग | महाराष्ट्र राज्य महिला व बाल विकास विभाग |
अर्ज प्रक्रिया | ऑनलाईन व ऑफलाईन |
मिळणारा लाभ | महिना १५०० रुपये |
आणि या मान्यता नुसार दिनांक 01 जुलै 2024 पासून ऑनलाइन पद्धतीने या योजनेसाठी मोबाईल ॲप्लिकेशन द्वारे नोंदणी करण्याची प्रक्रिया देखील संपूर्ण राज्यभरातील महिलांसाठी सुरू करण्यात आली सुरुवातीच्या काळात या योजनांमधील काही अटी आणि पात्रताबद्दल अनेक महिलांनी नाराजी व्यक्त केल्यानंतर राज्य सरकारने पुन्हा एकदा या योजनेचा सुधारित शासन निर्णय काढून योजनांमधील अटींचा त्यासोबतच पात्रतेचा देखील पुनर्विचार करून अनेक महिलांना पात्र करण्यासाठी बऱ्यापैकी अटींची यामधून कमी करून महिलांना जास्त प्रमाणात लाभ घेण्यासाठी आवाहन करण्यात आले.Mazi Ladki Bahin Yojana New GR
Mazi Ladki Bahin Yojana Maharashtra Documents List :
मित्रांनो या योजनेसाठी सुरुवातीच्या काळात आवश्यक असणाऱ्या कागदपत्रांमध्ये मोठ्या प्रमाणावर कमतरता करून त्यामध्ये महिलांकडे फक्त 05 कागदपत्र असले तरी देखील महिला या योजनेसाठी अर्ज करण्यास पात्र ठरणार आहेत. या कागदपत्रांमध्ये आधार कार्ड, रेशनिंग कार्ड, रहिवासी प्रमाणपत्र, बँक पासबुक आणि हमीपत्र यांचा समावेश आहे. एवढी कागदपत्रे महिलांकडे असल्यास या योजनेसाठी राज्यभरातील महिला अर्ज करू शकणार आहेत.
नवीन शासन निर्णयानुसार कुटुंबाची व्याख्या आता खालील प्रमाणे करण्यात आलेली आहे म्हणजेच कुटुंब याचा अर्थ पती, पत्नी व त्यांची अविवाहित मुले अथवा मुली. यामुळेच ज्या नवविवाहित महिलेच्या बाबतीत रेशनिंग कार्डवर लगेच नाव लावणे शक्य होत नाही अशा महिलांना आता विवाह नोंदणी प्रमाणपत्र असलेल्या नवविवाहित महिलेच्या पतीचे रेशनिंग कार्ड हे उत्पन्नाचा दाखला म्हणून ग्राह्य धरण्यात येणार असल्याचा एक मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे.
यासोबतच परराज्यात जन्म झालेल्या व सध्या महाराष्ट्रामध्ये वास्तव्यास असेल अशा महिलांनी महाराष्ट्रातील अधिवास असणाऱ्या पुरुषाबरोबर विवाह केला असेल तर अशा बाबतीत त्यांना पतीचा जन्म दाखला किंवा शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र, अधिवास प्रमाणपत्र हे ग्राह्य धरण्यात येणार आहे यासोबतच महिलेच्या पतीचे पंधरा वर्षांपूर्वीचे रेशन कार्ड व पंधरा वर्षांपूर्वीचे मतदान कार्ड देखील आता ग्राह्य धरण्यात येणार आहे.
Mazi Ladki Bahin Yojana Online Form :
लाडकी बहीण योजनेसाठी ऑनलाईन व ऑफलाईन दोन्ही पद्धतीने अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू असली तरी देखील अंगणवाडी सेविकांना ऑफलाइन पद्धतीने अर्ज स्वीकारून पुन्हा त्याला ऑनलाइन पद्धतीने एप्लीकेशन वर रजिस्ट्रेशन करावे लागत असल्याने बऱ्याचदा एप्लीकेशन चालत नाही आहे आणि सर्वर चे प्रॉब्लेम येत असल्याने अनेक महिला या योजनेसाठी अद्याप आपले अर्ज करू शकत नसल्याचे लक्षात आले आहे.
यावर बोलताना महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले की येत्या काही दिवसातच या योजनेसाठी आता ऑनलाइन पोर्टल म्हणजेच वेबसाईट देखील सुरू होणार असल्याने आता महिला वेबसाईटवर जाऊन देखील आपले अर्ज सबमिट करू शकणार आहेत आणि ज्यामुळे लाभार्थी महिलांना जास्त त्रास होणार नाही आणि अर्ज देखील ते सहज सबमिट करू शकणार आहेत. एप्लीकेशन मध्ये देखील आवश्यक असणारे सर्व बदल लवकरात लवकर करून एप्लीकेशन देखील व्यवस्थित कसे चालेल याबद्दल देखील डेव्हलपमेंट टीम काम करत असल्याचे आदिती तटकरे यांनी सांगितले आहे.Mazi Ladki Bahin Yojana New GR
आता हे खाते देखील चालणार –
मित्रांनो सुधारित शासन निर्णयामध्ये बँक खात्याबद्दल देखील एक महत्त्वाचे अपडेट देण्यात आलेले असून यानुसार आता सदरील योजनेचा लाभ घेण्यासाठी पोस्टातील म्हणजेच इंडिया पोस्ट पेमेंट बँकेमधील खाते देखील ग्राह्य धरण्यात येणार असल्याचे स्पष्टपणे सांगण्यात आले आहे आणि त्यामुळेच तुमचे पोस्टात देखील खाते असल्यास आता तुम्हाला योजनेचा लाभ घेता येणार आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना लाभार्थी यादी :
योजनेचा लाभ घेण्यासाठी आता या महिला देखील असणार पात्र –
मित्रांनो सुरुवातीच्या शासन निर्णयामध्ये योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही राज्य सरकार अथवा केंद्र सरकार द्वारे सुरू असलेल्या इतर आर्थिक योजनांचा लाभ घेत असल्यास तुम्हाला या योजनेचा लाभ देण्यात येणार नव्हता परंतु आता तुम्ही पीएम किसान, नमो शेतकरी योजना तसेच श्रावणबाळ योजना, जनधन योजना यांसारख्याही योजनांचा लाभ घेत असल्यास तरी देखील तुम्हाला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ देण्यात येणार आहे फक्त तुमचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी असावे.
आता या महिलांना ऑनलाईन अर्ज भरावा लागणार नाही –
योजनेसाठी लाभ घेण्याकरता आता काही महिलांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची देखील आवश्यकता नसणार आहे कारण या महिलांचा सर्व डेटाबेस आधीच सरकारकडे असणार आहे मग आता या महिलांमध्ये कोणाचा समावेश होतो तर ज्या महिला केंद्र शासनाने विविध शासकीय योजनांचे लाभ PFMS-DBT प्रणाली द्वारे देण्याची प्रक्रिया कार्यान्वित केलेली आहे म्हणजेच की ज्या महिला पीएम किसान योजना, नमो शेतकरी योजना, पीएम स्वनिधी योजना, पोषण योजना यांसारख्या योजनांचा लाभ घेतात अशा महिलांचा डेटा माहिती व तंत्रज्ञान विभागाकडून पात्र झाल्यानंतर त्यांचे केवायसी व आधार ऑथेंटिकेशन आधीच झाले असल्याने या महिलांना ऑनलाइन फॉर्म देखील भरावा लागणार नाही.
योजनेचा नवीन शासननिर्णय पाहण्यासाठी | येथे क्लिक करा |
योजना ऑनलाईन अर्ज करण्यासाठी | येथे क्लिक करा |
योजना नवीन एप्लिकेशन डाऊनलोड करण्यासाठी | येथे क्लिक करा |
योजना ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा |
Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा |