Namo Shetkari Yojana 4th Installment : राज्यातील 90 लाख शेतकऱ्यांना यादिवशी मिळणार नमो शेतकरी योजनेचा हफ्ता

Namo Shetkari Yojana 4th Installment राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर येत आहे महाराष्ट्र राज्यातील सुमारे 90 लाख शेतकऱ्यांना नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत चौथा हप्ता आता लवकरच वितरित करण्यात येणार आहे आणि यामुळेच ऐन खरीप हंगामात राज्यातील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर या हप्त्यामुळे फायदा होणार आहे. योजने संदर्भातील सर्व सविस्तर माहिती खाली देण्यात आलेली असून लाभार्थी शेतकऱ्यांची यादी व हप्ता जमा होण्याची तारीख देखील तुम्हाला खाली सांगण्यात आली आहे.

Namo Shetkari Yojana Maharashtra 2024 :

राज्यभरातील शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य देण्यासाठी केंद्र सरकारच्या पीएम किसान सन्मान योजनेची संलग्न असलेली नमो शेतकरी महासंघ निधी योजनेची घोषणा केली आणि या योजनेची 2023 यावर्षीपासून अंमलबजावणी देखील करण्यात आली. योजनेअंतर्गत पीएम किसान सन्मान योजनेप्रमाणेच केवळ महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांसाठी नमो शेतकरी योजनेद्वारे 6000 रुपये देण्यास सुरुवात झाली आणि या योजनेचे आजवर राज्यातील सुमारे 90 लाख शेतकऱ्यांना 03 हप्ते वितरित करण्यात आले आहेत.

योजना नावनमो शेतकरी महासन्मान योजना
लाभार्थी शेतकरी संख्या९० लाख शेतकरी
हफ्ता जमा होण्याची तारीखऑगस्ट २०२४
योजना विभागकृषी व महसूल विभाग

सर्व शेतकरी आता या योजनेचा चौथा हप्ता कधी मिळणार याबाबत गेली अनेक महिन्यांपासून चौकशी करत असल्याचे पाहायला मिळत आहे कारण फेब्रुवारी महिन्यामध्ये तिसरा हप्ता मिळाल्यानंतर अजूनही चौथा हप्ता का मिळाला नाही याबाबत शेतकऱ्यांमध्ये साशंकता पाहायला मिळत आहे यावरच राज्याच्या अधिवेशनामध्ये चर्चा होऊन आता शेतकऱ्यांना लवकरच चौथा हप्ता वितरित करण्यात येणार आहे.

Namo Shetkari Yojana Maharashtra 4 Instllment List :

शेतकरी मित्रांनो नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा चौथा हप्ता आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा होणार असल्याने योजनेची लाभार्थी यादी कधी येणार याबद्दल शेतकरी चौकशी करत आहेत लाभार्थी यादी बद्दल अधिकचे बोलायचे झाल्यास ज्या शेतकऱ्यांना पीएम किसान सन्मान योजनेचा सतरावा हप्ता जमा झाला होता या सर्व शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता दिला जाणार आहे. यासाठी कोणतीही वेगळी यादी तुम्हाला पहावी लागणार नाही आणि नमो शेतकरी योजनेसाठी पीएम किसान योजनेसाठी असलेली यादीत ग्राह्य धरली जाणार आहे.

नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर लाभार्थी यादी पाहता येत नसल्याने अनेक शेतकऱ्यांना लाभार्थी यादी बद्दल विविध प्रश्न पडतात परंतु शेतकऱ्यांना तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो की पी एम किसान सन्मान योजनेची लाभार्थी यादी नमो शेतकरी योजनेसाठी ग्राह्य धरले जात असल्याने तुम्हाला काळजी करण्याची कोणतीही आवश्यकता नसणार आहे. याची लाभार्थी यादी पाहण्यासाठी तुम्ही पीएम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊ शकता या वेबसाईटवरून तुम्ही बेनेफिशरी लिस्ट हा पर्याय निवडून त्यामध्ये तुमचा जिल्हा तसेच तुमचा तालुका आणि गावाचे नाव निवडून तुम्ही सर्व लाभार्थी यादी सहज पाहू शकणार आहात.

Namo Shetkari Yojana Maharashtra New Registration :

नमो शेतकरी योजनेसाठी नव्याने अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया देखील सुरू असून यासाठी तुम्ही ऑनलाईन अथवा ऑफलाइन या दोन्ही पद्धतीने तुमचे अर्ज सबमिट करू शकणार आहात यासाठी योजनेद्वारे दिल्या गेलेल्या अटींमध्ये तुम्ही पात्र असणे आवश्यक असणार आहे आणि सर्व अटींमध्ये तुम्ही पात्र असल्यास तुम्ही या भरतीसाठी अजूनही तुमचे अर्ज करू शकता आणि या योजनांचा लाभ घेऊ शकता.

ऑनलाइन पद्धतीने करायचे झाल्यास तुम्हाला पीएम किसान च्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन सर्व आवश्यक कागदपत्रे व्यवस्थितरित्या स्कॅन करून अपलोड करू शकता आणि तुमचे अर्ज सबमिट करू शकता. सीएससी सेंटर मध्ये जाऊन अथवा आपले सरकार सेवा केंद्र मध्ये जाऊन देखील तुम्ही ऑनलाईन पद्धतीने तुमचे अर्ज करू शकता आणि यासाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क तुम्हाला लागत नाही.

एकदा का तुम्ही पीएम किसान या योजनेसाठी पात्र झाल्यास तुम्हाला नमो शेतकरी योजनेचे हप्ते आपोआप मिळण्यास सुरुवात होते आणि यासाठी नव्याने कोणत्याही प्रकारचा अर्ज करावा लागत नाही कारण या दोन्ही योजना एकमेकांशी संलग्न असल्याने केंद्र सरकारच्या पीएम किसान योजनेचा डेटाबेस आहे असा नमो शेतकरी योजनेसाठी वापरला जात आहे.Namo Shetkari Yojana 4th Installment

Namo Shetkari Yojana 4th Installment
योजनेची लाभार्थी यादी पाहण्यासाठीयेथे क्लिक करा
योजनेची अधिकची माहिती पाहण्यासाठीयेथे क्लिक करा
बेनिफिशरी स्टेटस पाहण्यासाठीयेथे क्लिक करा
योजना ग्रुप जॉईन करण्यासाठीयेथे क्लिक करा
Namo Shetkari Samman Yojana Beneficiery Status Check :

नमो शेतकरी योजनेचा बेनिफिशरी स्टेटस म्हणजेच हप्ता जमा झाला का हे पाहण्यासाठी तुम्हाला योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जायचे आहे आणि या ठिकाणी तुम्ही तुमचा स्टेटस तपासू शकणार आहात याद्वारे तुम्हाला कोणत्या तारखेला आता जमा झाला तसेच कोणत्या बँक खात्यामध्ये तुम्हाला पैसे मिळाले आणि तुमचे नाव सर्वच माहिती सविस्तर पाहता येणार आहे.

शेतकरी मित्रांनो बेनिफिशियल स्टेटस पाहण्यापूर्वी तुम्ही तुमच्या आधार कार्ड ला लिंक असलेले बँक खाते तपासायचे आहे कारण डीबीटी द्वारे या योजनांमध्ये पैसे ट्रान्सफर होत असल्याने तुमच्या आधार कार्ड ला बँक खाते लिंक असणे आवश्यक असणार आहे आणि जे बँक खाते तुमच्या आधार कार्ड ला लिंक आहे त्याच बँक खात्यामध्ये तुम्हाला या दोन्ही योजनांचे पुढील हप्ते मिळणार आहेत.

यामुळे ज्या शेतकऱ्यांच्या आधार कार्ड ला बँक खाते लिंक नसणार आहे अशा शेतकऱ्यांना या योजनांचे पुढील हप्ते दिले जाणार नाहीत आणि परिणामी तुम्ही या योजनांचा लाभापासून वंचित देखील राहू शकता म्हणूनच लवकरात लवकर तुम्ही तुमच्या आधार कार्ड ला बँक खाते लिंक करून घ्यायचे आहे अथवा पोस्टामध्ये जाऊन तुम्ही तुमचे खाते काढू शकता.Namo Shetkari Yojana 4th Installment