Ladki Bahin Yojana Helpline राज्याच्या इतिहासातील सर्वाधिक गाजलेली आणि गेम चेंजर ठरलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेबद्दल आता पुन्हा एकदा नवीन अपडेट समोर येत आहे आणि यामध्ये काही महिलांसाठी अत्यंत आनंदाची बातमी असणार आहे कारण महिलांच्या बँक खात्यावर योजनेअंतर्गत 4500 रुपये जमा केले जाणार असल्याची माहिती मिळत आहे आणि त्यामुळेच महिलांमध्ये देखील आता समाधानाचे वातावरण पाहायला मिळत आहे.
महाराष्ट्र सरकारच्या शेवटच्या अधिवेशनामध्ये राज्य सरकारनेही गेम चेंजर योजना सुरू करून राज्यातील सुमारे 02 कोटी 40 लाख महिलांच्या बँक खात्यावर दर महिना 1500 रुपयाप्रमाणे 05 महिन्यांचे 7500 रुपये जमा केले आणि त्याचाच परिणाम राज्याच्या विधानसभा निवडणुकांमध्ये पाहायला मिळाला आणि महाराष्ट्रात पुन्हा एकदा माहिती सरकार आल्याचे आपण पाहिले.
Mazi Ladki Bahin Yojana Helpline :
लाडकी बहिण योजनेचे पैसे मिळाले नसल्यास अशी करा तक्रार –
मित्रांनो लाडकी बहीण योजना सुरू होऊन राज्यात जवळपास 05 महिन्यातून अधिक काळ होऊन गेला आणि यामध्ये अनेक महिलांनी योजनेचा लाभ घेतला परंतु अजूनही काही महिलांचे मत आहे की त्यांनी या योजनेसाठी अर्ज केला आहे त्यांच्या अर्जाची पडताळणी होऊन अर्ज स्वीकारला देखील गेला आहे त्यासोबत त्यांच्या आधार कार्ड ला बँक खाते लिंक आणि सीडींग देखील केलेले आहे तरी देखील योजनेचे पैसे मिळाले नाहीत.
यासाठी आता महिला तक्रार देखील करू शकणार आहेत आणि महिला व बाल विकास विभाग अंतर्गत येणाऱ्या या योजनेसाठी दोन पद्धतीने किंवा दोन हेल्पलाइन नंबर वर आता महिला थेट संपर्क करून योजनेसाठी त्यांना हप्ते मिळत नसल्यास तक्रार करून पात्र असल्यास योजनेचे हप्ते महिलांना जमा देखील केले जाणार आहेत.
यासाठी महिला महिला व बालविकास विभाग यांचा हेल्पलाइन नंबर 181 यावर संपर्क साधून सविस्तर माहिती कळवून हप्ता जमा होत नाही अशी तक्रार करू शकत आहेत आणि त्यानंतर संबंधित विभागाकडून त्या संदर्भातील छाननी करून महिलांच्या बँक खात्यावर निधी वर्ग केला जाणार आहे. अथवा व्हाट्सअप नंबर वरून 9861717171 या नंबरला तुमची सविस्तर माहिती सांगून स्क्रीन शॉट सेंड करून हप्ते मिळत नसल्याची तक्रार महिला देऊ शकतात ज्याची देखील पडताळणी करून महिलांना संबंधित हप्ते वर्ग केले जाणार आहेत.Ladki Bahin Yojana Helpline
Mazi Ladki Bahin Yojana Maharashtra 2024 :
आता 4500 रुपये कोणत्या महिलेला जमा होणार तर या योजनेअंतर्गत काही महिलांनी ऑक्टोबर महिन्यामध्ये अर्ज केले परंतु काही कारणास्तव त्यांचे अर्ज स्वीकारून देखील त्यांच्या आधार कार्ड ला बँक खाते लिंक नसल्याने त्यांचे पैसे खात्यावर जमा करण्यात आले नाहीत परंतु निवडणुकांच्या काळामध्ये मागील महिन्यात अनेक महिलांनी आपल्या आधार कार्ड ला बँक खाते लिंक करून घेतली आहे.
| 📃लाडकी बहिण योजना बोनस यादी पाहण्यासाठी | येथे क्लिक करा |
| 📃लाडकी बहिण योजना लाभार्थी यादी पाहण्यासाठी | येथे क्लिक करा |
| 💻लाडकी बहिण योजना ऑनलाईन अर्ज करण्यासाठी | येथे क्लिक करा |
| 🟢लाडकी बहिण माहिती ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा |

आधार कार्ड ला बँक खाते लिंक झाले असल्याकारणाने आता अशा महिलांच्या बँक खात्यावर पैसे जमा होण्यास कोणत्याही प्रकारची त्रुटी राहिली नाही आणि त्यामुळेच अशा देखील सर्व महिलांच्या बँक खात्यामध्ये ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर असे 03 महिन्यांची मिळून 4500 रुपये जमा केले जाणार आहेत आणि त्यामुळे अशा महिलांच्या बँक खात्यामध्ये एकाच वेळी 4500 रुपये येणार आहेत आणि त्यामुळे महिलांमध्ये देखील आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे.Ladki Bahin Yojana Helpline