लाडकी बहिण योजना 16 लाख महिला प्रतिक्षेत कधी जमा होणार सर्व हफ्ते ? | Ladaki Bahin Yojana Last Date

Ladaki Bahin Yojana Last Date मित्रांनो महाराष्ट्र राज्यात सर्वाधिक चर्चेत असलेली सध्याची योजना म्हणजेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना आणि या योजनेमध्ये संपूर्ण राज्यभरातून तब्बल 02 कोटी 34 लाख महिलांच्या बँक खात्यावर जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचे मिळून प्रत्येक पात्र वाहिलेच्या बँक खात्यावर ७५०० रुपये जमा करण्यात आले आहेत

आणि यामुळेच महाराष्ट्रातील सर्व महिलांनी या योजनेचे समर्थन केलेले आहे त्यासोबतच योजनेबद्दल समाधान देखील व्यक्त केले आहे. परंतु अजूनही काही महिलांच्या बँक खात्यावर पैसे जमा झाले नाहीत आणि सर्व करून देखील आम्हाला का पैसे आले नाहीत तसेच परत पैसे मिळणार का असे प्रश्न महिला विचारत आहेत याबद्दलची सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे.

Majhi Ladaki Bahin Yojana Maharashtra :

मित्रांनो अधिवेशनामध्ये महाराष्ट्र सरकारने राज्यातील सर्व महिलांना लाभ देण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेची घोषणा केली आणि त्यानुसारच योजनेसाठी त्वरित अंमलबजावणी देखील सुरू करण्यात आली आणि अंमलबजावणीनंतर महिलांच्या बँक खात्यावर पैसे देखील जमा होण्यास सुरुवात झाली. जुलै महिन्यामध्ये या योजनेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सरकारद्वारे सुरू करण्यात आली होती आणि यामध्ये ऑनलाईन आणि ऑफलाइन अशा दोन्ही पद्धतीने अर्ज सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती.

मित्रांनो या योजनेचा लाभ तळागाळातील सर्व महिलांना मिळण्यासाठी ग्रामपंचायत कार्यालय असेल अथवा अंगणवाडी सेविका यांच्याकडून देखील ऑफलाइन पद्धतीने अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू होती त्यासोबतच ज्या महिला घरबसल्या त्यांच्या मोबाईलवरून देखील अर्ज करू शकतात अशा महिलांना देखील संधी देण्यात आली होती. मोबाईल एप्लीकेशन नंतर अर्ज करण्यासाठी वेबसाईट अथवा पोर्टल देखील सुरू केले जेणेकरून पोर्टलवरून विविध अर्ज स्वीकारले गेले.Ladaki Bahin Yojana Last Date

Ladaki Bahin Yojana Next Installment Date :

लाडकी बहीण योजनेबद्दल बोलायचे झाल्यास सुरुवातीला ज्यावेळी या योजनेची राज्य सरकार द्वारे अंमलबजावणी सुरू झाली त्यावेळी लाडकी बहीण योजनेसाठी महाराष्ट्र राज्यातून सुमारे अडीच कोटी महिला लाभार्थी ठरतील असे सांगण्यात आले होते. आणि आचारसंहितेपूर्वीच महिलांच्या खात्यामध्ये काही हप्ते द्यायचे असल्याने अगदी त्वरित या योजनेसाठी नोंदणी प्रक्रिया सुरू केली होती आणि त्याद्वारेच महिलांनी उत्सर्फ असा प्रतिसाद देऊन या योजनेचे स्वीकार केला.

अजूनही 16 लाख महिलांपर्यंत आम्ही आणि त्याहूनही महिला वाढल्यास तरी देखील आम्ही सर्व महिलांना लाभ देणार तसेच कोणत्याही परिस्थितीमध्ये योजना बंद पडू देणार नाही असे महिला व बालविकास विभागाकडून आणि राज्य सरकारकडून देखील सांगण्यात आले आहे.

त्यामुळेच आचारसंहिता आणि इलेक्शन संपल्यानंतर पुन्हा एकदा या योजनेसाठी नव्याने अर्ज करण्याची प्रक्रिया देखील महिलांसाठी उपलब्ध करून देण्यात येईल आणि पुढील देखील सर्व हप्ते महिलांच्या बँक खात्यावर आम्ही प्रत्येक महिन्याला जमा करू असे देखील राज्य सरकार द्वारे आश्वासन देण्यात आल्याने तुम्ही कोणत्याही प्रकारची काळजी करण्याची आवश्यकता नाही.

Ladaki Bahin Yojana Aadhar Bank Link :

या कारणामुळे अनेक महिलांना पैसे मिळाले नाही –

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत अनेक महिलांना पैसे न मिळण्याबाबत एक कारण समोर आले आहे आणि त्यामध्ये अनेक महिलांच्या बँक खात्याला आधार कार्ड लिंक रस्त्याने अशा महिलांना डीबीटी द्वारे पैसे ट्रान्सफर करता येत नसल्याने महिलांच्या बँक खात्यावर पैसे जमा झाले नाहीत.

यामध्ये काय होत आहे की महिलांना अर्ज करताना बँकेचा तपशील मागवला आहे आणि महिलांनी जी बँक भरली आहे त्या बँकेत जाऊन महिला चौकशी करत आहेत परंतु यामध्ये तुम्ही एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या की तुम्हाला तुमच्या आधार कार्ड ची लिंक असलेल्या बँक खात्यामध्येच पैसे जमा केले जातात त्यामुळेच तुम्ही अर्ज करताना कोणते बँकेची तपशील दिला आहे याची काळजी न करता तुम्ही फक्त तुमच्या आधार कार्ड ला बँक खाते लिंक करून घ्यायचे आहे जेणेकरून तुमच्या बँक खात्यावर थेट पैसे जमा केले जाणार आहेत.Ladaki Bahin Yojana Last Date

Ladaki Bahin Yojana Last Date
लाडकी बहिण योजना तारीख पाहण्यासाठीयेथे क्लिक करा
📃लाडकी बहिण योजना यादी पाहण्यासाठीयेथे क्लिक करा
🟢 योजना ग्रुप जॉईन करण्यासाठीयेथे क्लिक करा