Pm Kisan 17 Installment Date देशातील शेतकऱ्यांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा शपथ घेतल्यानंतर पहिला निर्णय हा देशातील सर्व शेतकऱ्यांसाठी गिफ्ट म्हणून देण्यात आला आहे कारण देशातील सर्व पात्र शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा १७वा हफ्ता जारी करण्यात आला आहे.आज दिनांक 10 जून २०२४ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कार्यभार स्विकारल्या नंतर पहिलाच निर्णय हा शेतकऱ्यांसाठी घेण्यात आला आहे आणि यामुळे शेतकऱ्यांसाठी हि अत्यंत आनंदाची बातमी असणार आहे.
पीएम किसान योजनेच्या १७व्या हफ्त्यासाठी 09.03 कोटी शेतकऱ्यांना हा हफ्ता जमा होणार आहे.यामुळे शेतकऱ्यांसाठी ही एक अत्यंत महत्त्वाची बातमी असणार आहे. मोदी सरकार 3.0 यांचा पहिला निर्णय हा सर्व देशातील शेतकऱ्यांसाठी घेण्यात आलेला आहे आणि त्यामुळे शेतकरी देखील आता आनंदी असणार आहेत.
Pm Kisan 17th Installment List
याच शेतकऱ्यांना मिळणार पीएम किसान योजनेचा १७वा हफ्ता –
पी एम किसान योजनेच्या 17 व्या हप्त्यासाठी संपूर्ण देशभरातून विविध राज्यातील शेतकरी पात्र आहेत. यामध्ये महाराष्ट्र राज्यात सुमारे ९० लाख शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा सतरावा हप्ता जमा होणार आहे. सध्या संपूर्ण देशभरात चांगल्या प्रमाणात पाऊस झाल्याचे पाहायला मिळत आहे आणि यामुळेच आता शेतकरी पेरण्या देखील मोठ्या प्रमाणावर करणार आहेत आणि या पेरण्यांच्या मुहूर्तावरच आता शेतकऱ्यांना दोन हजार रुपये जमा होणार आहेत.
योजनेचे नाव | पी एम किसान सम्मान योजना |
विभाग | कृषी व महसूल विभाग |
लाभार्थी संख्या | ०९.03 कोटी शेतकरी |
१७व हफ्ता जमा तारीख | जारी करण्यात आला आहे. |
28 फेब्रुवारी 2024 रोजी पीएम किसान योजनेचा सोळावा हप्ता देशातील सर्व शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा झाला होता त्यानंतर आचारसंहिता लागल्याने आणि काल दिनांक ०९ जून 2024 रोजी देशात नवीन सरकार शपथविधी सोहळा पार पडला आणि लगेच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आपला कार्यभार स्वीकारून शेतकऱ्यांसाठी हा पहिला निर्णय घेतला आहे.
ज्या शेतकऱ्यांनी आपली ई केवायसी, लँड सीडींग अपडेट केली होती तसेच ज्या शेतकऱ्यांच्या आधार कार्ड ला बँक खाते लिंक आहे अशा सर्व शेतकऱ्यांना हा हप्ता थेट बँक खाते जमा होणारा आहे यासाठी कोणतीही प्रक्रिया करण्याची आवश्यकता नसणार आहे. परंतु ज्या शेतकऱ्यांची माहिती अपडेट नसेल त्यांना मात्र हा हप्ता दिला जाणार नाही.
Pm Kisan Next Installment List Maharashtra
पी एम किसान योजना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुसऱ्यांदा शपथ घेतल्यानंतर 2019 या वर्षापासून सुरू करण्यात आली होती या योजनेमार्फत आजवर संपूर्ण देशभरातील शेतकऱ्यांना 16 हप्ते देण्यात आले आहेत. देशाच्या इतिहासात शेतकऱ्यांसाठी थेट बँक खात्यावर पैसे जमा होणाऱ्या या योजनेमधून नेहमीच कौतुक केले जाते. आणि याच योजनेचा पुढील हप्ता आता येत्या दोन ते तीन दिवसात शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात येईल.
पी एम किसान योजनेला अधिक व्यापक बनवण्यासाठी राज्यात देखील 2023 या वर्षापासून नमो शेतकरी महासन्मान निधी योजना जाहीर करण्यात आली आणि या योजनेद्वारे केवळ महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपये दिले जातात आणि यामुळे महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना वार्षिक 12000 रुपये मिळतात.
पीएम किसान योजनेचा हफ्ता मिळणार का ? असे पहा –
- pmkisan.gov.in या अधिकृत वेबसाईटवर जायचे आहे.
- वेबसाईट वर होम पेज वर तुम्हाला Beneficiery Staus हा पर्याय दिसणार आहे.
- या पर्यायावर जाऊन तुम्हाला तुमचा रजिस्ट्रेशन नंबर टाकायचा आहे.
- रजिस्ट्रेशन नंबर माहिती नसल्यास तुम्ही आधार नंबर टाकून किंवा मोबाईल नंबर टाकून तुम्ही तुमचा स्टेटस पाहू शकणार आहात.
- यामध्ये सर्व गोष्टी YES असल्यास तुम्हाला पुढील हफ्ता जमा होणार आहे.
- यामध्ये काही ठिकाणी NO असल्यास तुम्हाला दुरुस्त करून घ्यावे लागणार आहे.
- EKYC DONE : YES | Adhar-Bank Seeding Status : YES | Land Seeding : YES हे तपासाचे आहे.
PM Kisan Yojana New Registration
शेतकरी मित्रांनो तुम्ही अजूनही या योजनेचा लाभ घेत नसाल तर आजच तुम्ही वेबसाईट वर जाऊन मोबाईल वरून तुमचे अर्ज करू शकणार आहात.यासाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क लागणार नाही ऑनलाईन नोंदणी करण्याची सविस्तर प्रक्रिया खाली देण्यात आली आहे.
- योजनेचा नवीन अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाईट pmkisan.gov.in या वेबसाईटवर जाऊन शेतकऱ्यांनी न्यू रजिस्ट्रेशन या बटनावर किंवा लिंक वर क्लिक करायचे आहे.
- अर्ज करण्याआधी शेतकऱ्यांनी त्यांच्या आधार कार्डला नंबर लिंक आहे का याची खात्री करून घ्यायची आहे आणि लिंक नसल्यास आधार कार्ड ला मोबाईल नंबर लिंक करणे आवश्यक असणार आहे.
- यानंतर पुढील टॅब वर ग्रामीण भागातील शेतकऱ्यांनी रुरल फार्मर रजिस्ट्रेशन वर क्लिक करायचे आहे आणि शहरी भागातील शेतकऱ्यांनी अर्बन फार्मर रजिस्ट्रेशन वर क्लिक करायचे आहे.
- तुमचा आधार कार्ड चा नंबर टाकून त्या शेजारी आधार कार्ड ला लिंक असलेला मोबाईल नंबर टाकायचा आहे.
- राज्य निवडून त्यासमोर असलेला कॅपच्या कोड टाकून गेट ओटीपी या बटणावर क्लिक करायचे आहे.
- यानंतर तुमचा आधार कार्ड ला लिंक असलेल्या मोबाईल नंबर वर तुम्हाला ०६ अंकी ओटीपी येणार आहे तो ओटीपी टाकून तुम्ही प्रोसेस करायचे आहे.
- पुढील ओपन झालेल्या टॅब वर तुम्हाला तुमचे नाव, गाव, पत्ता यासंदर्भातील सर्व माहिती दिसणार आहे ती योग्य असल्यास खाली येऊन तुम्ही तुमच्या शेती विषयीची माहिती भरायची आहे.
- यामध्ये लँड रजिस्ट्रेशन आयडी भरताना तुमचा फेरफार नंबर टाकायचा आहे.
- क्षेत्राबद्दल सर्व सविस्तर माहिती भरून आधार कार्ड, 7/12 तुम्हाला व्यवस्थित स्कॅन करून अपलोड करायचा आहे.
- सर्व माहिती व्यवस्थित भरल्यानंतर तुम्ही अमित बटनावर क्लिक करून तुमचा अर्ज सबमिट करायचा आहे. अर्ज सबमिट केल्यानंतर त्याची प्रिंट देखील घ्यायची आहे.Pm Kisan 17 Installment Date

ऑनलाईन पद्धतीने नोंदणी करण्यास काही अडचण येत असल्यास तुम्ही तुमच्या गावातील तहसील कार्यालयात जाऊन देखील तुमचे अर्ज करू शकणार आहात.
पीएम किसान योजना लाभार्थी यादी पाहण्यासाठी | येथे क्लिक करा |
पीएम किसान योजना नवीन अर्ज करण्यासाठी | येथे क्लिक करा |
Whatsapp Group जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा |
Telegram Group जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा |
Pm Kisan Samman Yojana पात्रता व अटी –
पीएम किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्रता –
- लाभ घेणारा शेतकरी अल्पभूधारक असावा.
- शेतकऱ्याच्या नावावर स्वतंत्र सातबारा व आठ अ उतारा असावा.
- लाभ घेण्यासाठी शेतकरी सरकारी नोकरदार नसावा
- शेतकरी खासदार,आमदार,जिल्हा परिषद सदस्य नसावा.
- शेतकरी ITR भरणारा नसावा.
- पती-पत्नी दांपत्यांपैकी एकालाच लाभ मिळणार आहे.
वरील सर्व अटींमध्ये पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांनी लवकरात लवकर आपले अर्ज भरायचे आहेत.अधिकच्या माहितीसाठी आमचा Whatsapp Group जॉईन करा.Pm Kisan 17 Installment Date