Namo Shetkari Yojana List | नमो शेतकरी योजनेची लाभार्थी यादी प्रसिद्ध लगेच पहा

Namo Shetkari Yojana List नमस्कार शेतकरी मित्रांनो नमो शेतकरी महासन्मान निधी या राज्य सरकारच्या अत्यंत महत्त्वाच्या योजनेचा पुढील हप्ता आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा होणार असून याबाबत लाभार्थी शेतकऱ्यांची यादी देखील आता प्रसिद्ध करण्यात आली आहे. या यादीमधील शेतकऱ्यांनाच आता पुढील हप्ता दिला जाणार आहे.

यादीमध्ये ज्या शेतकऱ्यांचे नाव नाही अशा शेतकऱ्यांना पुढील येणारा नमो शेतकरी योजनेचा हप्ता मिळणार नाही याबाबत काही महत्त्वाची कारणे देखील समोर आली आहेत आणि ज्याची दुरुस्ती देखील आता शेतकरी करू शकणार आहेत. योजनेच्या पुढील हप्ता बद्दल सर्व सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे.

शेतकरी मित्रांनो देशभरातील सर्व अल्पभूधारक शेतकऱ्यांना शेती करण्यास प्रोत्साहन देण्यासाठी आणि आर्थिक सहाय्य म्हणून 2019 पासून केंद्र सरकारने पी एम किसान शेतकरी सन्मान योजना या योजनेची घोषणा केली. या योजनेद्वारे देशभरातील शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपये देण्याबाबत शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आला आणि त्याची अंमलबजावणी देखील झाली.

या योजनेद्वारे तीन हप्त्यांमध्ये दोन हजार रुपयांप्रमाणे शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर वार्षिक सहा हजार रुपये जमा करण्याची प्रक्रिया सुरू झाली. महाराष्ट्र राज्यातील सुमारे 01 कोटी शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतला आणि देशभरातून सुमारे 11 कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर डीबीटी द्वारे हा निधी जमा होण्यास सुरुवात झाली.

अल्पभूधारक शेतकऱ्यांनाच या निधीद्वारे सहाय्य देण्याचा केंद्र सरकारचा उद्देश असल्याने ज्या शेतकऱ्यांच्या नावावर 05 एकर पेक्षा जास्त जमीन आहे अशा शेतकऱ्यांचे अर्ज त्यावेळी स्वीकारले गेले नाहीत. सुरुवातीच्या काळात ही योजना ऑफलाइन पद्धतीने राबवली जात असल्याने सर्व आवश्यक कागदपत्रांसह शेतकऱ्यांना आपले तहसील कार्यालय, कृषी, गावकामगार तलाठी यांच्याकडे सातबारा, आठ अ उतारा, बँक पासबुक, आधार कार्ड यांसारखी कागदपत्रे जमा करावी लागत होती.

ऑफलाइन पद्धतीने योजना राबवत असल्याने अनेक शेतकरी पीएम किसान या योजनेपासून वंचित राहिल्याचे लक्षात आल्यानंतर या योजनेचे ऑनलाईन पोर्टल सुरू करण्यात आले आणि ज्याद्वारे शेतकरी स्वतः कोणतेही शुल्क न भरता आपल्या मोबाईलवरून देखील या योजनांसाठी अर्ज करू शकत होता. ऑनलाईन पद्धतीने वेबसाईट किंवा पोर्टल सुरू केल्यानंतर अनेक शेतकऱ्यांनी या योजनेसाठी आपले रजिस्ट्रेशन केले.

परंतु जे शेतकरी या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र नव्हते अशा देखील शेतकऱ्यांनी अर्ज केल्याचे आणि चुकीच्या पद्धतीने लाभ घेत असल्याचे संबंधित अधिकाऱ्यांच्या लक्षात आल्यानंतर पी एम किसान योजनेसाठी ईकेवायसी करणे बंधनकारक करण्यात आले. जे शेतकरी आपली ईकेवायसी करणार नाहीत तसेच ज्या शेतकऱ्यांच्या बँक खात्याला आधार कार्ड लिंक नाही आणि ज्यांच्या जमिनीची माहिती अद्यावत केली नाही असे सर्व शेतकरी योजनेचा पुढील लाभ घेण्यापासून अपात्र करण्यात आले.

मित्रांनो नमो शेतकरी योजना ही पीएमकिसान सन्मान योजनेची संलग्न असल्यामुळे या योजनेसाठी देखील शेतकऱ्यांकडून कोणत्याही वेगळ्या प्रकारचे रजिस्ट्रेशन करून घेतले नाही. 2023 सालच्या अधिवेशनादरम्यान पी एम किसान योजनेला अधिक व्यापक करण्यासाठी आणि महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना अधिकच सहाय्य देण्यासाठी राज्य सरकारने या योजनेमध्ये ६००० रुपयांची भर घालून नमो शेतकरी योजना जाहीर केली.

नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेसाठी राज्य सरकारकडून कोणत्याही प्रकारचे अर्ज भरून घेतले नाहीत जे शेतकरी पीएम किसान योजनेचा लाभ घेत आहेत अशा सर्व शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा लाभ थेट देण्याबाबत घोषणा करण्यात आली आणि त्यानुसार 28 ऑक्टोबर 2023 ला देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या हस्ते नमो शेतकरी महासंघ निधी योजनेचा पहिला हप्ता राज्यातील 86 लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात आला.Namo Shetkari Yojana List

पहिला हप्ता जमा केल्यानंतर अनेक शेतकऱ्यांनी आम्हाला या योजनेचा लाभ मिळाला नसल्याची तक्रार केली आणि त्यानंतर दुसऱ्या हप्त्यापर्यंत शेतकऱ्यांना त्यांची माहिती अपडेट करण्यासाठी पीएम किसान व नमो शेतकरी या दोन्ही योजनेद्वारे विविध पद्धतीने जनजागृती करून कॅम्पद्वारे गावागावात जाऊन शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी दुरुस्त केल्या. आणि त्याद्वारे सुमारे 08 लाख शेतकऱ्यांची माहिती अपडेट करून घेण्यात आली आणि दुसरा हप्ता 93 लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर नमो शेतकरी योजनेअंतर्गत जमा करण्यात आला.

शेतकरी मित्रांनो तुम्ही देखील शेती करत असाल आणि या योजनांचा लाभ अद्यापही तुम्हाला मिळत नसल्यास तुम्हाला अजूनही या दोन्ही योजनांसाठी अर्ज करण्याची संधी आहे. यासाठी मोबाईल वरून तुम्ही पीएम किसान च्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन तुमचा अर्ज भरू शकता अन्यथा तुम्ही सीएससी सेंटर किंवा आपले सरकार सेवा केंद्र मध्ये जाऊन तुमच्या सर्व आवश्यक कागदपत्रांसह तुमचा अर्ज करू शकणार आहात.

  • नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकरी हा जगातील रहिवासी असावा.
  • लाभ घेण्यासाठी शेतकरी अल्पभूधारक असावा.शेतकऱ्याच्या नावावर स्वतंत्र शेतजमीन असावी आणि ही शेत जमीन दोन हेक्टर म्हणजेच ०५ एकर पेक्षा कमी असावी.
  • लाभ घेण्यासाठी शेतकरी दांपत्य म्हणजेच पती-पत्नी पैकी एकच व्यक्ती या योजनेचा लाभ घेऊ शकणार आहे.
  • जे शेतकरी आमदार, खासदार, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य यापैकी कोणताही पदावर असल्यास त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही.
  • शासकीय नोकरदार असणाऱ्या शेतकऱ्यांना देखील या योजनेअंतर्गत लाभ दिला जाणार नाही.
  • जे शेतकरी आयटीआर म्हणजेच इन्कम टॅक्स रिटर्न भरतात अशा देखील शेतकऱ्यांना या योजने अंतर्गत लाभ मिळणार नाही.
  • सामायिक जमीन असल्यास अशा शेतकऱ्यांना देखील लाभ देण्यात येणार नाही.
  • स्वतंत्र आठ अ उतारा असलेले शेतकरीच या योजनेसाठी अर्ज करू शकणार आहेत.
  • वडिलांच्या अथवा आईच्या नावावर जमीन आहे आणि मुलगा अर्ज करणार असेल तरीदेखील लाभ दिला जाणार नाही.Namo Shetkari Yojana List
Namo Shetkari Yojana List
नमो शेतकरी योजना नवीन अर्ज करण्यासाठीइथे क्लिक करा
नमो शेतकरी योजना लाभार्थी यादी पाहण्यासाठीइथे क्लिक करा
  • योजनेचा नवीन अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाईट pmkisan.gov.in या वेबसाईटवर जाऊन शेतकऱ्यांनी न्यू रजिस्ट्रेशन या बटनावर किंवा लिंक वर क्लिक करायचे आहे.
  • अर्ज करण्याआधी शेतकऱ्यांनी त्यांच्या आधार कार्डला नंबर लिंक आहे का याची खात्री करून घ्यायची आहे आणि लिंक नसल्यास आधार कार्ड ला मोबाईल नंबर लिंक करणे आवश्यक असणार आहे.
  • यानंतर पुढील टॅब वर ग्रामीण भागातील शेतकऱ्यांनी रुरल फार्मर रजिस्ट्रेशन वर क्लिक करायचे आहे आणि शहरी भागातील शेतकऱ्यांनी अर्बन फार्मर रजिस्ट्रेशन वर क्लिक करायचे आहे.
  • तुमचा आधार कार्ड चा नंबर टाकून त्या शेजारी आधार कार्ड ला लिंक असलेला मोबाईल नंबर टाकायचा आहे.
  • राज्य निवडून त्यासमोर असलेला कॅपच्या कोड टाकून गेट ओटीपी या बटणावर क्लिक करायचे आहे.
  • यानंतर तुमचा आधार कार्ड ला लिंक असलेल्या मोबाईल नंबर वर तुम्हाला ०६ अंकी ओटीपी येणार आहे तो ओटीपी टाकून तुम्ही प्रोसेस करायचे आहे.
  • पुढील ओपन झालेल्या टॅब वर तुम्हाला तुमचे नाव, गाव, पत्ता यासंदर्भातील सर्व माहिती दिसणार आहे ती योग्य असल्यास खाली येऊन तुम्ही तुमच्या शेती विषयीची माहिती भरायची आहे.
  • यामध्ये लँड रजिस्ट्रेशन आयडी भरताना तुमचा फेरफार नंबर टाकायचा आहे.
  • क्षेत्राबद्दल सर्व सविस्तर माहिती भरून आधार कार्ड, 7/12 तुम्हाला व्यवस्थित स्कॅन करून अपलोड करायचा आहे.
  • सर्व माहिती व्यवस्थित भरल्यानंतर तुम्ही अमित बटनावर क्लिक करून तुमचा अर्ज सबमिट करायचा आहे. अर्ज सबमिट केल्यानंतर त्याची प्रिंट देखील घ्यायची आहे.

Que :  Shetkari Sanman Yojana Maharashtra शेतकरी सन्मान योजनेचा पुढील हफ्ता कधी येणार ?

Ans – शेतकरी सन्मान योजनेचा पहिला हफ्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जून २०२४ मध्ये जमा केला जाणार आहे.

Que : या योजनेसाठी नव्याने फॉर्म भरायची गरज आहे का ?

Ans – नाही.तुम्ही जर पीएम किसान सन्मान योजनेचा लाभ घेत असाल तर तुम्हाला या योजनेचा लाभ थेट मिळणार आहे.कोणताही वेगळा फॉर्म भरण्याची गरज नाही.

Que : शेतकरी सन्मान योजने अंतर्गत शेतकऱ्यांना किती पैसे मिळणार आहेत ?

Ans – शेतकरी सन्मान योजने अंतर्गत शेतकऱ्यांना वार्षिक ६००० रु.मिळणार आहेत.