Pik Vima Yojana 2024 : पिक विमा भरताना यावेळी नवीन अटी व्यवस्थित करा अर्ज

Pik Vima Yojana 2024 महाराष्ट्र राज्य सरकारने पिक विमा योजनेत 2023 यावर्षीपासून मोठ्या प्रमाणावर बदल केल्यामुळे शेतकऱ्यांना याचा काही प्रमाणात फायदा झालेला आहे. 2023 च्या अधिवेशनामध्ये कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी सांगितल्याप्रमाणे शेतकऱ्यांना पीक विमा भरण्यासाठी आता केवळ 01 रुपया एवढाच खर्च येत आहे आणि उर्वरित सर्व रक्कम हे पीक विमा कंपन्यांना राज्य सरकारच्या वतीने दिली जात आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

ही योजना सलग दुसऱ्या वर्षी देखील राज्य सरकारच्या वतीने सुरू ठेवण्यात आली आहे परंतु यावेळी अर्ज करताना शेतकऱ्यांनी काही गोष्टींची दक्षता घेणे आवश्यक असणार आहे. कारण मोबाईल मधून देखील शेतकरी स्वतः अर्ज करू शकणार असल्याने कागदपत्रांबाबत किंवा इतर सर्व सविस्तर माहिती तुम्हाला खाली देण्यात आली आहे. त्यामुळेच पिक विम्याचा अर्ज करण्यापूर्वी तुम्ही ही माहिती सविस्तर पाहिजे आहे आणि मगच तुमचा अर्ज करायचा आहे.

शेतकरी मित्रांनो पिक विमा योजनेबद्दल बोलायचे झाल्यास महाराष्ट्र राज्यात 2016 या वर्षीपासून खरीप पिक विमा म्हणजेच प्रधानमंत्री पिक विमा योजना राबविण्यात येते पूर्वीच्या काळी या योजनेच्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये असणाऱ्या पिकाच्या एकूण 25% रक्कम ही शेतकऱ्यांना भरावी लागायची आणि त्यानंतर शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान झाल्यास त्यांना सर्व नुकसान भरपाई रक्कम दिली जायची. 2023 नंतर या योजनेत मोठ्या प्रमाणावर बदल करण्यात आलेले आहेत आणि या बदलांमुळेच पिक विमा योजनेचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या अगदी दुप्पटीने वाढली आहे.Pik Vima Yojana Maharashtra 2024

दिनांक ०७ जुलै 2024 पर्यंत महाराष्ट्र राज्यात सध्याच्या सुरू असलेल्या खरीप हंगामामध्ये एकूण ७२ लाख 46 हजार ५४३ शेतकऱ्यांनी पिक विमा योजनेसाठी नोंदणी केली आहे. 2023 यावर्षी राज्यभरातून सुमारे 01 कोटी 70 लाख शेतकऱ्यांनी पिक विमा योजनेसाठी नोंदणी केल्याची माहिती कृषी संचालक विस्तार व प्रशिक्षक श्री विनय कुमार आवटे यांनी सांगितले आहे.

शेतकरी मित्रांनो तुम्ही अजूनही तुमच्या पिकाचा पिक विमा भरला नसल्यास लवकरात लवकर तुम्ही तुमच्या मोबाईलवरूनच केवळ 01 रुपयांमध्ये तुमच्या शेतातील खरीप पिकांचा पीक विमा भरू शकणार आहात आणि यामध्ये तुम्हाला तुमच्या पिकांचे नुकसान झाल्यास चांगल्या प्रमाणात नुकसान भरपाई देखील दिली जाणार आहे या योजनेचा लाभ जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी घेण्यासाठी संबंधित विभाग आणि प्रशासनाच्या वतीने आवाहन करण्यात येत आहे.Pik Vima Yojana 2024

या कागदपत्रांवर लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांचे किंवा अर्ज करणाऱ्या शेतकऱ्याचे नाव समान असणे आवश्यक –

शेतकरी मित्रांनो याबाबत बोलताना कृषी विभागाकडून सांगण्यात आले आहे की शेतकऱ्यांच्या आधार कार्डवर आणि बँक खात्यावरील नाव हे समान असणे आवश्यक आहे. यामध्ये अनेक शेतकऱ्यांच्या जुन्या सातबाराच्या नोंदी असल्याने त्यावर काही प्रमाणात नावांमध्ये फरक असल्याचे जाणवत आहे हा फरक थोडक्यात असल्यास चालणार आहे परंतु काही वेळा आडनावामध्ये बदल असेल तर मात्र असे शेतकरी या योजनेसाठी अर्ज करू शकणार नाहीत. यासाठी तुम्हाला तुमच्या सातबारा वरील अथवा आधार कार्ड वरील नाव बदलून घेणे आवश्यक असणार आहे.Pik Vima Yojana 2024

शेतकऱ्यांच्या पिकांची ई पिक पाहणी वर नोंद केलेली असणे आवश्यक –

पिक विम्याचा अर्ज करत असताना शेतकऱ्यांनी आपल्या पिकांची ई पिक पाहणी या मोबाईल ॲप्लिकेशन द्वारे ऑनलाइन पद्धतीने नोंदणी केलेली असणे आवश्यक असणारा आहे. कारण तुमच्या सातबारावर तुम्ही भरत असलेल्या पिकाच्या पीक विमा साठी नोंद नसल्यास तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार नाही आणि त्यामुळेच अर्थ करण्यापूर्वी तुम्ही या बाबींची खात्री करून घ्यायची आहे.

पिक विमा अर्ज करण्यासाठी आवश्यक शुल्क –

शेतकरी मित्रांनो तुम्ही तुमच्या मोबाईलवरून पीक विम्याच्या वेबसाईटवर जाऊन अर्ज केल्यास तुम्हाला केवळ 01 रुपया शुल्क लागणारा आहे परंतु तुम्ही जर सीएससी सेंटर मध्ये जाऊन अर्ज करणार असाल तर तिथे तुम्हाला 50 रुपये द्यायला लागणार आहेत असे कृषी विभाग आणि प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे याबाबत जास्त रक्कम मागितल्यास तुम्ही तक्रार देखील करू शकणार आहात.

पिक विमा योजना मोबाईल वरून अर्ज करण्याची सविस्तर प्रक्रिया पहा – क्लिक करा

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
Pik Vima Yojana 2024

खरीप पिक विमा भरण्यासाठी शेतकऱ्यांकडे १५ जुलै 2024 पर्यंत मुदत देण्यात आली आहे आणि त्यामुळेच आता शेवटचे काही दिवस तुमच्याकडे शिल्लक आहेत त्यामुळे लवकरात लवकर जाऊन तुम्ही तुमच्या पिकांची ई पिक पाहणी एप्लीकेशन वरून नोंद करून तुमच्या मोबाईलवरून अथवा जवळील सीएससी सेंटर मध्ये जाऊन तुमच्या पिकांचा पीक विमा भरून घ्यायचा आहे. पिक विमा न भरल्यास अशा शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाल्यानंतर पीक विम्याची रक्कम दिली जाणार नाही आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांचे नुकसान देखील होण्याची शक्यता आहे.Pik Vima Yojana 2024

पिक विमा योजना अर्ज करण्यासाठीयेथे क्लिक करा
शेतकरी योजना ग्रुप जॉईन करण्यासाठीयेथे क्लिक करा

FAQ (सतत विचारले जाणारे प्रश्न)

Q : पिक विमा योजनेचा अर्ज करताना पिकाचा फोटो अपलोड करावा लागतो का ?

A – नाही.पिक विमा योजना अर्ज भरताना फोटो अपलोड करावा लागत नाही.

Q : ई पिक पाहणी एप्लिकेशन वर पिकांची नोंद असणे आवश्यक आहे का ?

A – होय.पिक विमा अर्ज करताना पिकांची नोंद ई पिक पाहणी एप्लिकेशन वर असणे आवश्यक आहे.

Q : पिक विमा अर्ज भरण्यासाठी शेवटची मुदत काय आहे ?

A – पिक विमा योजना अर्ज भरण्यासाठी 15 जुलै 2024 अंतिम मुदत असणार आहे.