Pik Vima Yojana Last Date : खरीप पीकविमा २०२४ साठी अंतिम मुदत लगेच करा अर्ज

Pik Vima Yojana Last Date 2024 राज्यभरातील सर्व शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे शेतकरी मित्रांनो आपल्या माहितीनुसार 2024 च्या खरीप हंगामासाठी पिक विमा भरण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने सुरुवात झाली असून तुम्ही देखील अजूनही तुमचा पीक विमा अर्ज केला नसल्यास तुमच्यासाठी अंतिम मुदत माहिती असणे अत्यंत महत्त्वाचे आहे कारण अंतिम मुदत संपल्यानंतर तुम्ही पिक विमा साठी तुमचा अर्ज करू शकणार नाही.

खरीप हंगाम पिक विमा 2024 साठी सर्व शेतकरी स्वतः मोबाईल मधून किंवा कम्प्युटर द्वारे अथवा आपले सरकार सेवा केंद्र मध्ये जाऊन, सीएससी सेंटर मध्ये जाऊन किंवा महा-ई-सेवा केंद्र मध्ये जाऊन देखील पिक विमा भरू शकणार आहेत. पीक विमा भरण्यासाठी आवश्यक असणारी सर्व कागदपत्रे देखील तुम्हाला यामध्ये देण्यात आली आहेत ज्याची तुम्ही प्रिंट काढून सर्व माहिती भरून कागदपत्र स्कॅन करून अपलोड करू शकणार आहात.

Pik Vima Yojana Information in Marathi

शेतकरी मित्रांनो तुमच्या माहितीसाठी 2023 यावर्षी पासून राज्य सरकारने सर्व शेतकऱ्यांसाठी केवळ एक रुपयांमध्ये पिक विमा योजना घोषणा केली आणि या योजनेला संपूर्ण राज्यभरातील शेतकऱ्यांनी अतिशय चांगला प्रतिसाद दिला. 2023 च्या पूर्वीपासून एकूण पिक विमा रक्कमेच्या पंचवीस टक्के रक्कम ही शेतकऱ्यांना भरावी लागायची आणि उर्वरित रक्कम सरकारद्वारे भरले जायचे.

परंतु आता शेतकऱ्यांना कोणतेही पीक असले तरी फक्त 01 रुपया भरायचा आहे आणि उर्वरित सर्व रक्कम राज्य शासन भरणार आहे यावर्षी देखील ही योजना राज्य सरकारने सुरू ठेवली आहे आणि जून महिन्यापासून या योजनेसाठी खरीप पिकांसाठी तुम्ही पिक विमा अर्ज करू शकणार आहात.Pik Vima Yojana Last Date

Pik Vima Yojana Form

शेतकरी मित्रांनो चालू खरीप हंगामासाठी सध्या वेबसाईट चांगल्या सुरू असून लवकरात लवकर सर्व शेतकऱ्यांनी आपले अर्ज करण्यासाठी प्रशासनाकडून आवाहन करण्यात येत आहे कारण अंतिम मुदत असताना अनेक शेतकरी हा अर्ज भरण्याचा प्रयत्न करतात आणि परिणामी वेबसाईट किंवा सर्वर डाऊन होऊन तुमचा पिक विमा अर्ज सबमिट होत नाही. यावर्षी स्वतः शेतकरी देखील वेबसाईटवर जाऊन लॉगिन करून सर्व आवश्यक कागदपत्रे सबमिट करून त्यांचे अर्ज करू शकणार आहेत.

खरीप हंगामासाठी असणाऱ्या पिकांना देखील रब्बी हंगामा प्रमाणेच नुकसान भरपाईनुसार रक्कम दिली जाणार आहे. शेतकऱ्यांना मिळणारी खरीप हंगामाची नुकसान भरपाई रक्कम ही त्यांच्या बँक खात्यात डीबीटी द्वारे थेट जमा केली जाणार आहे आणि यासाठीच लाभार्थी शेतकऱ्यांच्या आधार कार्ड ला बँक खाते लिंक असणे अनिवार्य असणार आहे कारण ज्या बँक खात्याला आधार कार्ड लिंक आहे किंवा त्याच बँक खात्यात लाभार्थ्यांना सदरील पीक विम्याची रक्कम दिली जाणार आहे.

तुमच्या भागात देखील उपलब्ध असलेल्या पिकांना ही पीक विम्याची रक्कम दिली जात असते आणि यामध्ये शेतकऱ्यांना अर्ज करत असताना कोणत्याही प्रकारची अडचण येत असल्यास शेतकरी हे पीक विमा कंपनी कार्यालयामध्ये जाऊन तसेच तालुका कृषी अधिकारी किंवा महा-ई-सेवा केंद्र चालकाशी संपर्क करून या योजनेचा लाभ घेऊ शकणार आहेत.Pik Vima Yojana Last Date

Pik Vima Yojana 2024 List

या पिकांना मिळणार खरीप पिक विमा योजनेचा लाभ –

  • बाजरी
  • मुग
  • उडीद
  • तुर
  • कापूस
  • मका
  • कांदा

वरील सर्व पिकांसाठी खरीप पिक विमा चा लाभ शेतकऱ्यांना घेण्यात येणार आहे या योजनेसाठी शेतकऱ्यांच्या पिकांचे होणारे नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान जसे की अवकाळी पाऊस, दुष्काळ, गारपीट, चक्रीवादळ, कीटकांच्या प्रादुर्भावामुळे होणारे नुकसान या सर्व नुकसानीसाठी शेतकऱ्यांना त्यांच्या पिकाच्या नुकसानानुसार पंचनामे करून संबंधित नुकसान भरपाई रक्कम देणे हाच पिक विमा योजनेचा मुळात सर्वात महत्त्वाचा उद्देश असतो.

सध्याच्या काळात अनेकदा विविध अडचणीमुळे शेतकरी मोठ्या प्रमाणावर कोलमडला असल्याचे आपण पाहत आहे पिकांना मिळत नसलेल्या भावामुळे, सततच्या पडत असलेल्या अवकाळी पावसाने किंवा काही भागात होणाऱ्या दुष्काळजन्य परिस्थितीमुळे शेतकऱ्याचे जीवन हे समतोल राहिले नाही आणि यामुळेच अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य देण्यासाठी आणि शेती करण्यासाठी प्रोत्साहन म्हणून या पिक विमा योजनेचा नक्कीच लाभ शेतकऱ्यांना देण्यात येतो.

जे शेतकरी पिक विमा साठी आपले अर्ज करणार आहेत आणि अर्ज केल्यानंतर ज्या शेतकऱ्यांची ही पिक पाहणी पूर्ण असेल अशा सर्व शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांचे नुकसान झाल्यानंतर पिक विमा रक्कम थेट बँक खात्यात जमा केली जाते. या योजनेसाठी संपूर्ण राज्यभरातील शेतकरी पात्र असतात आणि सरकार द्वारे जिल्ह्यानुसार किंवा विभागानुसार विविध इन्शुरन्स कंपन्या हा इन्शुरन्स देण्याचे काम करतात.

हेही महत्वाचे :

Pik Vima Comapny Name
कंपनीचे नावजिल्हा
ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडनाशिक,अहमदनगर,सातारा,सोलापूर व जळगाव
एचडीएफसी इन्शुरन्स कंपनी लिमिटेडपुणे,धाराशिव,हिंगोली,धुळे,अकोला
युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेडठाणे,नांदेड,रत्नागिरी,सिंधुदुर्ग
आयसीआयसीआय लोम्बार्ड जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडनागपूर,परभणी,वर्धा
युनिव्हर्सल सोंपो जनरल कंपनी लिमिटेडकोल्हापूर,जालना व गोंदिया
रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनीअमरावती,यवतमाळ,गडचिरोली
एमबीआय जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडलातूर
चोलामंडलम एम. एस. जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडभंडारा,छत्रपती संभाजीनगर,रायगड व पालघर
भारतीय कृषी विमा कंपनीसांगली,बीड,वाशीम,नंदुरबार,बुलढाणा

पिक विमा योजनेसाठी 15 जुलै 2024 पर्यंत तुम्ही ऑनलाईन पद्धतीने तुमचे अर्ज सबमिट करू शकणार आहात आणि यानंतर तुम्हाला तुमच्या पिकाचे नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झाल्यास संबंधित पिकाचे रक्कम मिळणार आहे हे नुकसान भरपाईची रक्कम नक्कीच शेतकऱ्यांना फायद्याची ठरणार आहे.या योजनेसाठी आवश्यक असलेली सर्व कागदपत्रे तुम्हाला खाली दिली आहेत या pdf तुम्ही डाऊनलोड करून त्याची प्रिंट घेऊ शकणार आहात आणि सर्व माहिती भरून अपलोड करू शकणार आहात.Pik Vima Yojana Last Date

Pik Vima Yojana Last Date
पिक विमा अर्ज करण्यासाठीयेथे क्लिक करा
पिक पेरा स्वयंघोषणा पत्र डाऊनलोड करण्यासाठीयेथे क्लिक करा
पिक विमा योजना अधिकच्या माहितीसाठीयेथे क्लिक करा
Whatsapp Group जॉईन करण्यासाठीयेथे क्लिक करा
Telegram Group जॉईन करण्यासाठीयेथे क्लिक करा

Q : खरीप हंगाम पिक विमा योजनेसाठी अर्ज करण्यासाठी किती शुल्क आवश्यक असणार आहे ?

A – खरीप पिक विमा २०२४ साठी सर्व पिकांसाठी 01 रुपया शुल्क असणार आहे.

Q : खरीप पिक विमा कोणत्या पिकांसाठी मिळणार आहे ?

A – खरीप हंगाम २०२४ साठी बाजरी,मुग,उडीद,कापूस,मका,कांदा,तूर या पिकांचा समावेश असणार आहे.

Q : कृषी पिक विमा किती प्रकार असतात ?

A – पिक विमा ०२ प्रकारचा असतो यामध्ये एक उत्पन्न आणि दुसरा महसूल मध्ये येतो.

Q : पिक विमा साठी अर्ज करण्याची वेबसाईट कोणती आहे ?

A – पिक विमा योजनेची अधिकृत वेबसाईट https://pmfby.gov.in