Pik Vima List 2023 महाराष्ट्र राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे राज्यातील शेतकऱ्यांची पिक विमा लाभार्थी यादी आता प्रसिद्ध करण्यात आली असून या यादीनुसार आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर पिक विमा रक्कम वर्ग करण्यात येणार आहे.24 जिल्ह्यांसाठी पात्र शेतकरी यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे आणि या जिल्ह्यांतील ज्या शेतकऱ्यांनी आपला पिक विमा भरला होता अशा सर्वच शेतकऱ्यांना आता हा लाभ देण्यात येणार आहे.
शेतकरी मित्रांनो फसल बिमा योजना म्हणजेच पीक विमा योजने अंतर्गत राज्यातील सर्व शेतकऱ्यांना ज्यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे ज्यामध्ये अनेक नैसर्गिक आपत्तींचा समावेश असणार आहे अशा शेतकऱ्यांना विमा दिला जातो. खरीप हंगाम 2023 मध्ये ज्या शेतकऱ्यांनी आपला पीक विमा भरला होता आणि ज्यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे अशा सर्व शेतकऱ्यांना पिकानुसार सरसकट रक्कम बँक खात्यावर जमा करण्यात येणार आहे. याबाबत कोणते जिल्हे पात्र आहे ? कोणते तालुके पात्र आहेत ? अनुदान किती मिळणार ? यासंदर्भात सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे.
Pik Vima Yadi 2023 Pdf
शेतकरी मित्रांनो 2023 यावर्षीपासून महाराष्ट्र राज्यात स्थापन झालेल्या नवीन सरकार द्वारे शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचे काही निर्णय घेण्यात आले होते आणि त्यामधील सर्वाधिक महत्त्वाचा निर्णय म्हणजे 01 रुपयांमध्ये शेतकऱ्यांना पीक विमा देण्याची घोषणा करण्यात आली आणि त्यानुसारच शासन निर्णय प्रसिद्ध करून अंमलबजावणी देखील करण्यात आली.
2023 च्या पूर्वी एकूण पिकाच्या विमा रक्कमेच्या 25 टक्के रक्कम ही शेतकऱ्यांना भरायला लागायचे परंतु केवळ एक रुपया भरून उर्वरित सर्व रक्कम ही राज्य सरकार द्वारे विमा कंपन्यांना देण्यात आली आणि परिणामी राज्यभरातून अनेक शेतकऱ्यांनी यावेळी आपला खरीप पिक विमा भरला. दुष्काळजन्य परिस्थितीमुळे यावेळी अनेक भागातील शेतकऱ्यांची पिके करपून गेल्याने मोठ्या प्रमाणावर नुकसान भरपाईसाठी शेतकरी पात्र झाले आणि याच मध्ये आता 24 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पिक विमा वाटप करण्यात येत आहे.
योजनेचे नाव | प्रधानमंत्री पिक विमा योजना २०२३ |
विभाग | महाराष्ट्र राज्य महसूल व वन विभाग |
लाभार्थी शेतकरी यादी | ३५ लाख शेतकरी |
एकूण मंजूर रक्कम | १८०० कोटी |
पिक विमा जमा होण्याची तारीख | मार्च-एप्रिल २०२४ |
Pik Vima List 2023 Maharashtra
पिक विमा योजनेचा महत्त्वाचा उद्देश म्हणजे शेतकऱ्यांवर अकाळी येणाऱ्या संकटांमुळे नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे होणारे नुकसान आणि या नुकसानीतून शेतकऱ्यांना बाहेर काढण्यासाठी आर्थिक सहाय्य म्हणून पीक विमा योजनेच्या द्वारे डीबीटी मार्फत शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर अनुदानावर रक्कम जमा केली जाते. या रक्कमेचा फायदा शेतकऱ्यांना नुकसानीतून झालेल्या संकटांचा सामना करण्यासाठी बळ देत असते. राज्य सरकार द्वारे शेतकऱ्यांसाठी अनेक वेगवेगळ्या योजना राबवल्या जातात ज्या योजनांचा उद्देश नवीन शेतकऱ्यांना शेती करण्यासाठी प्रोत्साहन म्हणून आणि आर्थिक सहाय्य म्हणून दिले जातात.
यातीलच केंद्र सरकार द्वारे 2019 पासून पीएम किसान शेतकरी सन्मान योजना राबवली जाते ज्या योजनेद्वारे देशातील सर्व शेतकऱ्यांना वार्षिक 6000 रुपये दिले जातात याच योजनेला अधिक व्यापक करण्यासाठी राज्य सरकार द्वारे देखील 2023 पासून नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेची घोषणा करण्यात आली ज्याद्वारे राज्य सरकार आता शेतकऱ्यांना अधिकचे 6000 रुपये देते. यादेखील योजनांमुळे अनेक शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर फायदा होतो. महाराष्ट्रातील सुमारे 93 लाख शेतकरी या दोन्ही योजनांच्या मार्फत वार्षिक 12000 रुपयांचा लाभ घेत आहेत.
2023 च्या खरीप पिक विमा साठी राज्यातील 24 जिल्ह्यांमधून सुमारे 35 लाख शेतकऱ्यांना लाभार्थी करण्यात आले आहे यामध्ये आधीच 25% अग्रीम रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात आली असून उर्वरित 75 टक्के रक्कम देखील आता देण्यासाठी शेतकऱ्यांना 1800 कोटी रुपये बँक खात्यावर वर्ग करण्यात येणार आहेत. यामध्ये राज्य सरकारच्या आपदा निधीमधून वादळ, गारपीट, दुष्काळ, ओला दुष्काळ कीड व रोग यांसारख्या अनेक आपत्तींसाठी शेतकऱ्यांना ही रक्कम देण्याचा अधिकार राज्य सरकारला असतो.
पिक विमा साठी विम्यासाठी ज्या शेतकऱ्यांनी खरीप हंगाम 2023 मध्ये एक रुपया भरून आपला पिक विमा अर्ज सबमिट केला होता आणि ज्या शेतकऱ्यांनी आपली पिकाची इपिक पाहणी केली होती अशा सर्व शेतकऱ्यांना ज्यांच्या पिकांचे 33% पेक्षा जास्त नुकसान आहे यांनाही पीक विमा रक्कम देण्यात येणार आहे. याबाबत पीक विमा कंपन्यांना राज्य सरकार द्वारे आदेश देखील दिल्याची माहिती कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली आहे. सरसकट पिक विमाला सुरुवातीला पीक विमा कंपन्यांनी विरोध केला होता परंतु आता लवकर शेतकऱ्यांना हा लाभ मिळणार आहे.Pik Vima List 2023
Pik Vima Yadi 2023 pdf Download
खरीप पिक विमा २०२३ साठी पात्र ठरलेले जिल्हे,लाभार्थी शेतकरी संख्या आणि मंजूर रक्कम खालीलप्रमाणे आहे –
जिल्ह्याचे नाव | लाभार्थी शेतकरी संख्या | मंजूर रक्कम (कोटी) |
---|---|---|
नाशिक | 350000 | 155.74 |
जळगाव | 16921 | 4.88 |
सोलापूर | 1,82,534 | 111.41 |
अहमदनगर | 2,31,831 | 160.28 |
सांगली | 98,372 | 22.04 |
सातारा | 40,406 | 6.74 |
बीड | 7,70,574 | 241.21 |
धाराशिव | 4,98,720 | 218.85 |
बुलढाणा | 36,358 | 18.39 |
कोल्हापूर | 2280 | 1.30 |
अकोला | 1,77,253 | 97.29 |
जालना | 3,70,625 | 160.48 |
परभणी | 4,41,970 | 206.11 |
नागपूर | 63,422 | 52.21 |
लातूर | 2,19,535 | 244.87 |
अमरावती | 10,265 | 8.00 |
एकूण जिल्हे व रक्कम | 35,08,303 शेतकरी | 1,700.73 कोटी |
पिक विमा योजनेतील वरील सर्व जिल्ह्यातील लाभार्थी शेतकऱ्यांना पिकानुसार आणि झालेल्या नुकसानी नुसार रक्कम दिली जाणार आहे.यामध्ये जे शेतकरी पात्र असतील त्या सर्व शेतकऱ्यांच्या बँक खात्याला आधार कार्ड लिंक असणे आवश्यक आहे शेतकऱ्यांच्या आधार कार्डला जे बँक खाते लिंक आहे केवळ त्याच बँक खात्यात शेतकऱ्यांना हि रक्कम जमा केली जाणार आहे.ज्या शेतकऱ्यांच्या आधार कार्डला बँक खाते लिंक नाही अशा शेतकऱ्यांना पिक विमा रक्कम मिळणार नाही.
शेतकरी मित्रांनो हेही अत्यंत महत्वाचे वाचा –
राज्यातील शेतकऱ्यांना दुष्काळ अनुदान मंजूर गावनिहाय यादी प्रसिद्ध | Dushkal Yadi 2024 Maharashtra
Namo Shetkari Yojana List | नमो शेतकरी योजनेची लाभार्थी यादी प्रसिद्ध लगेच पहा
काही जिल्ह्यांतील अथवा तालुक्यांतील अनेक शेतकरी पिक विमा लाभापासून वंचित असल्याचे सांगण्यात आले आहे आणि त्यामुळे अजूनही शेतकऱ्यांसाठी पुढील लाभार्थी यादी देखील येण्याची शक्यता आहे.परंतु त्यासाठी शेतकऱ्यांनी आपल्या पिकाची ई पिक पाहणी द्वारे ७/12 वर नोंद करून घेणे अनिवार्य आहे.तसेच आधार कार्डला बँक खाते लिंक नसल्यास पोस्टात खाते उघडायचे आहे. Pik Vima List 2023
Pik Vima Yadi 2024 Maharashtra Pdf
खरीप पिक विमा २०२३ महाराष्ट्र जिल्ह्यानुसार एकूण पात्र असलेल्या गावांची नावे खालीलप्रमाणे आहेत –
- बुलढाणा जिल्हा ९८ गावे
- बीड जिल्हा ६४ गावे
- जालना जिल्हा 144 गावे
- यवतमाळ जिल्हा १६१ गावे
- नांदेड जिल्हा 144 गावे
- नाशिक जिल्हा 91 गावे
- परभणी जिल्हा ७३ गावे
- लातूर जिल्हा १२० गावे
- अकोला जिल्हा १४६ गावे
- वाशीम जिल्हा ११२ गावे
- कोल्हापूर जिल्हा ७३ गावे
- संभाजीनगर ११९ गावे
- जळगाव १०५ गावे
पिक विमा लाभार्थी यादी जाहिरात पाहण्यासाठी | इथे क्लिक करा |
शेतकरी योजनांची माहिती घेण्यासाठी | इथे क्लिक करा |
Whatsapp Group जॉईन करण्यासाठी | इथे क्लिक करा |
Telegram Group जॉईन करण्यासाठी | इथे क्लिक करा |
वरीलप्रमाणे लाभार्थी गावे असणार आहेत.गावानुसार लाभार्थी शेतकरी यादी पाहण्यासाठी सर्व शेतकऱ्यांनी आपल्या गावातील तहसील कार्यालयात जाऊन आपली नावे पहायची आहेत यामध्ये उमेदवारांना कोणत्याही प्रकारची KYC करण्याची आवश्यकता नाही.दुष्काळी अनुदान साठी मात्र शेतकऱ्यांना आधार प्रमाणीकरण म्हणजेच KYC करावी लागणार आहे.
FAQ (सतत विचारले जाणारे प्रश्न)
Q : पिक विम्याचे उर्वरित रक्कम शेतकऱ्यांना कधी मिळणार आहे ?
A – शेतकऱ्यांना येत्या काही दिवसातच पिक विम्याची उर्वरित ७५% रक्कम दिली जाणार आहे.
Q : ई पिक पाहणी नोंद नसल्यास पिक विमा मिळणार आहे का ?
A – नाही.ई पिक पाहणी नोंद नसल्यास पिक विमा लाभ दिला जाणार नाही.
Q : खरीप पिक विमा साठी सरसकट लाभ मिळणार आहे का ?
A – ज्या शेतकऱ्यांनी पिक विमा भरला आहे अशा सर्वच शेतकऱ्यांना लाभ दिला जाणार आहे.
Q : पिक विम्याची रक्कम कोणत्या बँक खात्यात जमा होणार आहे ?
A – शेतकऱ्यांच्या आधार कार्डला जे बँक खाते लिंक आहे त्याच बँक खात्यात रक्कम जमा होणार आहे.Pik Vima List 2023