Namo Shetkari Yojana Installment Date : नमो शेतकरी योजनेचा पुढील हफ्ता यादिवशी जमा होणार

Namo Shetkari Yojana Installment Date राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे कारण आता लवकरच सर्व लाभार्थी शेतकऱ्यांना नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा पुढील म्हणजेच तिसरा हफ्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा होणार आहे.ऐन खरीप हंगामाच्या तोंडावर शेतकऱ्यांना बियाणे खरीदी असेल आणि शेती मशागतीसाठी या निधीचा नक्कीच मोठा फायदा होणार असल्याचे बोलले जात आहे.यामध्ये ज्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे अश्या सर्व शेतकऱ्यांची लाभार्थी यादी देखील प्रसिद्ध करण्यात आली आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या अधिकृत वेबसाईट वर जाऊन तुम्ही यादी पाहू शकणार आहेत.तसेच ज्या शेतकऱ्यांना मागील काही हफ्ते मिळाले नाहीत त्यांच्याबद्दल देखील महत्वाची माहिती आता देण्यात आली आहे.तुम्हालादेखील या योजनेबद्दल अधिकची माहिती घेयची असल्यास खाली संपूर्ण आणि सविस्तर माहिती देण्यात आली आहे.

शेतकरी मित्रांनो नमो शेतकरी महासन्मान निधी योजना 2023 पासून महाराष्ट्र राज्यात सुरू करण्यात आली. ही योजना संपूर्णपणे केंद्र सरकारने 2019 पासून सुरू केलेल्या पीएम किसान महासन्मान निधी योजनेवर अवलंबून आहे. अवलंबून यासाठी कारण ज्यावेळी अधिवेशनात पीएम किसान या योजनेला संलग्न आम्ही नमो शेतकरी निधी योजना सुरू करतोय असे मुख्यमंत्री व कृषिमंत्री यांच्याकडून सांगण्यात आले त्यानंतर या योजनेसाठी कोणत्याही प्रकारचे नवीन नोंदणी प्रक्रिया घेण्यात आली नाही.

नमो शेतकरी योजनेचा लाभ शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर थेट देण्यासाठी पी एम किसान या योजनेला जो डेटाबेस वापरला जातो तोच डेटाबेस आहे असा नमो शेतकरी योजनेकडे घेण्यात आला. आणि ज्यामुळेच ज्या शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा लाभ मिळतो अशा सर्व शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा लाभ देखील देण्यात आला.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

सुरुवातीच्या काळात ज्यावेळी नमो शेतकरी योजनेचे पहिले दोन हप्ते शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा झाले त्यावेळी हे पैसे कोणत्या बँक खात्यात गेलेत किंवा जमा झालेत की नाही या सर्व गोष्टी शेतकऱ्यांना पाहता येत नव्हत्या याचे कारण म्हणजे पी एम किसान च्या वेबसाईटवर जाऊन तुम्ही तपासल्यास त्या ठिकाणी केवळ पी एम किसान चा डेटाबेस येत असायचा आणि नमो शेतकरी योजनेचा लाभ मिळाला की नाही हे कळण्यास कोणताही मार्ग नव्हता परंतु आता नमो शेतकरी योजनेची देखील अधिकृत वेबसाईट सुरू करण्यात आली आहे.

नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेसाठी नवीन नोंदणी प्रक्रिया देखील पुन्हा एकदा सुरु झाली असून तुम्हीदेखील अल्पभूधारक शेतकरी असाल आणि तुमची नमो शेतकरी योजनेच्या सर्व अटींमध्ये पात्र असाल तर आजच खालील दिलेल्या अधिकृत लिंक वर जाऊन मोफत तुमचे अर्ज करू शकणार आहात.नमो शेतकरी योजनेचा अर्ज करण्यासाठी देखील उमेदवारांना पीएम किसान या साईट वर जायचे आहे आणि आपले अर्ज सबमिट करायचे आहेत.

Namo Shetkari Maha Samman Nidhi Yojana is a government yojana made for farmers of maharashtra.The main motive of this scheme is to give support to famers and motive young farmers for farming.This yojana basically gives 6000rs.annually to farmers this money is directly transfers to the bank account of the farmer therough DBT (Direct Beneficiery Transfer).Namo Shetkari Yojana Installment Date

शेतकरी मित्रांनो नमो शेतकरी महासन्मान निधी या योजनेसाठी तुम्हाला वेगळे रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नसणार आहे याचाच अर्थ जर तुम्हाला पीएम किसान योजनेचे पैसे मिळत असतील तर तुम्हाला नमो शेतकरी योजनेसाठी नव्याने रजिस्ट्रेशन करण्याची कोणतीही आवश्यकता नाही परंतु पीएम किसान योजनेने सांगितल्याप्रमाणे जर तुम्ही ईकेवायसी केली नसल्यास तुम्हाला पी एम किसान योजनेचे पुढील हप्ते आणि त्यासोबतच नमो शेतकरी योजनेचे देखील हफ्ते मिळणार नाहीत.

ऑनलाइन पद्धतीने नोंदणी करण्यास अडचण येत असल्यास उमेदवारांनी आपल्या गावच्या तहसील कार्यालयात जाऊन देखील या योजनेचे ऑफलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहेत. सीएसटी सेंटर त्याचबरोबर आपले सरकार सेवा केंद्र मध्ये देखील या योजनांसाठी उमेदवारांची नोंदणी सुरू आहे.Namo Shetkari Yojana Installment Date

नमो शेतकरी योजना नवीन अर्ज करण्यासाठी प्रक्रिया –

  • योजनेचा नवीन अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाईट pmkisan.gov.in या वेबसाईटवर जाऊन शेतकऱ्यांनी न्यू रजिस्ट्रेशन या बटनावर किंवा लिंक वर क्लिक करायचे आहे.
  • अर्ज करण्याआधी शेतकऱ्यांनी त्यांच्या आधार कार्डला नंबर लिंक आहे का याची खात्री करून घ्यायची आहे आणि लिंक नसल्यास आधार कार्ड ला मोबाईल नंबर लिंक करणे आवश्यक असणार आहे.
  • यानंतर पुढील टॅब वर ग्रामीण भागातील शेतकऱ्यांनी रुरल फार्मर रजिस्ट्रेशन वर क्लिक करायचे आहे आणि शहरी भागातील शेतकऱ्यांनी अर्बन फार्मर रजिस्ट्रेशन वर क्लिक करायचे आहे.
  • तुमचा आधार कार्ड चा नंबर टाकून त्या शेजारी आधार कार्ड ला लिंक असलेला मोबाईल नंबर टाकायचा आहे.
  • राज्य निवडून त्यासमोर असलेला कॅपच्या कोड टाकून गेट ओटीपी या बटणावर क्लिक करायचे आहे.
  • यानंतर तुमचा आधार कार्ड ला लिंक असलेल्या मोबाईल नंबर वर तुम्हाला ०६ अंकी ओटीपी येणार आहे तो ओटीपी टाकून तुम्ही प्रोसेस करायचे आहे.
  • पुढील ओपन झालेल्या टॅब वर तुम्हाला तुमचे नाव, गाव, पत्ता यासंदर्भातील सर्व माहिती दिसणार आहे ती योग्य असल्यास खाली येऊन तुम्ही तुमच्या शेती विषयीची माहिती भरायची आहे.
  • यामध्ये लँड रजिस्ट्रेशन आयडी भरताना तुमचा फेरफार नंबर टाकायचा आहे.
  • क्षेत्राबद्दल सर्व सविस्तर माहिती भरून आधार कार्ड, 7/12 तुम्हाला व्यवस्थित स्कॅन करून अपलोड करायचा आहे.
  • सर्व माहिती व्यवस्थित भरल्यानंतर तुम्ही अमित बटनावर क्लिक करून तुमचा अर्ज सबमिट करायचा आहे. अर्ज सबमिट केल्यानंतर त्याची प्रिंट देखील घ्यायची आहे.
Namo Shetkari Yojana Installment Date
नमो शेतकरी योजना लाभार्थी यादी पाहण्यासाठीयेथे क्लिक करा
योजनेचा नवीन अर्ज भरण्यासाठीयेथे क्लिक करा
योजनेच्या अधिकच्या माहितीसाठीयेथे क्लिक करा

नमो शेतकरी योजनेच्या पुढील हप्त्याच्या तारखे बद्दल बोलायचे झाल्यास नुकतेच संपूर्ण देशभरात सुरू असलेल्या निवडणूक आचारसंहिता संपुष्टात आल्यानंतर महाराष्ट्र राज्यात देखील येत्या दोन ते तीन महिन्यांमध्ये विधानसभा निवडणुका लागणार आहेत सध्या राज्यात अटीतटीच्या लढती होण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांना खुश करण्यासाठी नमो शेतकरी योजनेचा पुढील हप्ता आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर लवकरात लवकर जमा केले जाणार असल्याची माहिती मिळत आहे.

एवढेच नाही तर जे शेतकरी काही तांत्रिक बाबींमुळे किंवा अडचणीमुळे या योजनेच्या लाभापासून वंचित राहिले होते अशा सर्व शेतकऱ्यांना पुन्हा एकदा नव्याने अर्ज करण्यासाठी संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. शेतकरी वर्गामध्ये असलेली नाराजी दूर करण्यासाठी येत्या दोन-तीन महिन्यांमध्ये अनेक वेगवेगळ्या योजना शेतकऱ्यांसाठी आणल्या जाण्याची देखील शक्यता आहे आणि त्यामुळेच तुम्ही अजूनही या योजनेसाठी आपला अर्ज केला नसल्यास आज तुम्ही ऑनलाईन आणि ऑफलाइन या दोन्ही पद्धतीने तुमचा अर्ज करू शकणार आहात.

Q : नमो शेतकरी योजनेसाठी पती-पत्नी दोघेही लाभ घेऊ शकतात का ?

A – नाही.पती-पत्नी दांपत्यांपैकी एकच या योजनेचा लाभ घेऊ शकतो.

Q : नमो शेतकरी योजनेचे वर्षाला किती हप्ते मिळणार आहेत ?

A – नमो शेतकरी योजनेचे वर्षाला 03 हफ्ते मिळणार आहेत.

Q : नमो शेतकरी योजनेचा अर्ज करण्याची मुदत काय आहे ?

A – अर्ज करण्याची मुदत लवकरच संपणार आहे.

Q : वडिलांच्या नावावर क्षेत्र असल्यास मुलाला या योजनेचा लाभ घेता येईल का ?

A – नाही.लाभ घेण्यासाठी वैयक्तिक नावावर शेतजमीन हवी.Namo Shetkari Yojana Installment Date