Namo Shetkari Yojana 4nd Installment Date राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे शेतकरी ज्याची वाट पाहत आहेत त्याच नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा चौथा हप्ता आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर लवकरच जमा होणार आहे. तीन हप्ते जमा झाल्यानंतर बरेच दिवस झाले तरी देखील योजनेसाठीचा चौथा हप्ता अजूनही शेतकऱ्यांना मिळाला नसल्याने शेतकरी आता या हप्त्याबाबत चौकशी करत होते आणि याबाबत महत्त्वाची अपडेट समोर आली आहे याची सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे.
नमो शेतकरी निधी योजना सविस्तर माहिती :
नमो शेतकरी महासंघ निधी योजनेबद्दल बोलायचे झाल्यास महाराष्ट्र राज्य सरकारने 2023 मध्ये अधिवेशनात नमो शेतकरी महसन्मान निधी योजनेची घोषणा केली आणि या योजनेची त्वरित अंमलबजावणी करण्यासाठी राज्य सरकारच्या वतीने बजेट देखील घोषित करण्यात आले. ही योजना संपूर्णपणे केंद्र सरकारच्या पी एम किसान या योजनेची निगडित असल्याने या योजनेसाठी राज्य सरकारच्या वतीने कोणत्याही प्रकारचे वेगळे अर्ज भरण्याची आवश्यकता देखील नसल्याचे स्पष्ट करण्यात आले.
योजनेसाठी पहिला हप्ता दिनांक 28 ऑक्टोबर 202३ रोजी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात आला आणि या हप्त्यामध्ये राज्यभरातून सुमारे 87 लाख शेतकऱ्यांना लाभ देण्यात आला. पीएम किसान च्या तुलनेत नमो शेतकरी योजनेसाठी ०६ लाख शेतकऱ्यांना पहिले हप्त्यातून वंचित राहावे लागले कारण अनेक शेतकऱ्यांचा डेटा अपडेट नसल्यामुळे पहिला हप्ता शेतकऱ्यांना देण्यात आला नाही.
परंतु दुसरा व तिसरा हे दोन्ही हप्ते राज्यातील सुमारे 90 लाख शेतकऱ्यांना एकाच दिवशी जमा करण्यात आले आणि त्यानंतर आता चौथ्या हप्त्यासाठी देखील प्रक्रिया सुरू करण्यात आली असून शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर लवकरात लवकर चौथ्या हप्त्याचे देखील दोन हजार रुपये जमा करण्यात येणार असल्याचे संबंधित विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.Namo Shetkari Yojana 4nd Installment Date
नमो शेतकरी महासन्मान निधी योजना लाभार्थी यादी | Namo Shetkari Yojana 4th Installment List :
नमो शेतकरी योजनेच्या लाभार्थी यादी बद्दल बोलायचे झाल्यास चौथ्या हप्त्यांमध्ये लाभार्थी यादीमध्ये अनेक शेतकऱ्यांची वाढ देखील केली जाणार आहे ज्या शेतकऱ्यांचा डेटा अपडेट नव्हता त्यांचा डेटा अपडेट झाला असल्याने चौथ्या हप्त्यामध्ये लाभार्थी संख्या मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. लाभार्थी यादी पाहण्यासाठी नमो शेतकरी योजनेची वेबसाईट देखील अपडेट नसल्यामुळे तुम्हाला पीएम किसान योजनेच्या वेबसाईटवर जाऊन लाभार्थी यादी पाहता येणार आहे किंवा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून तुम्ही लाभार्थी यादी पाहू शकणार आहात.
योजना नाव | नमो शेतकरी महासन्मान निधी योजना |
विभाग | महाराष्ट्र राज्य कृषी विभाग |
लाभार्थी संख्या | 90 लाख शेतकरी |
४था हफ्ता जमा होण्याची तारीख | ऑगस्ट महिन्याचा पहिला आठवडा |
मागील काही दिवसांपूर्वी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर पीएम किसान योजनेचा सतरावा जमा करण्यात आला आहे यामधील ज्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर २००० रुपये जमा झाले आहेत अशा शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता मिळण्यास कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही परंतु ज्या शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा हप्ता मिळाला नाही त्यांनी मात्र त्यांचा स्टेटस तपासून त्यामध्ये असणाऱ्या त्रुटी दूर करून मगच त्यांना नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता देण्यात येणार असल्याची नोंद घ्यायची आहे.Namo Shetkari Yojana 4nd Installment Date
नमो शेतकरी महासन्मान निधी योजना हफ्ता जमा होण्याची तारीख | Namo Shetkari Yojana 4th Installment Date :
पी एम किसान योजनेच्या 17 व्या आपल्यानंतर आता राज्यभरातील शेतकरी नमो शेतकरी योजनेचा पुढील हप्ता कधी जमा होणार याबाबत चौकशी करत असल्याचे पाहायला मिळत आहे. सध्याच राज्याच्या अधिवेशनामध्ये याबद्दल चर्चा झाल्याची माहिती मिळत असून सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार लवकरात लवकर नमो शेतकरी योजनेचा हप्ता वितरित करण्यासाठी देखील आता संबंधित विभागाला आदेश देण्यात येईल माहिती मिळत आहे.
महाराष्ट्र राज्य सरकारची म्हणजेच विधानसभा इलेक्शन देखील आता दोन-तीन महिन्यांवर येऊन ठेपल्याने शेतकऱ्यांना खुश करण्यासाठी राज्य सरकारच्या वतीने नमो शेतकरी योजनेचा हप्ता लवकरात लवकर शेतकऱ्यांना दिला जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे. पिक विमा योजनेचे पैसे तसेच नुकसान भरपाई असे सर्व शेतकऱ्यांशी निगडित असणाऱ्या निधीबद्दल मुख्यमंत्र्यांनी लवकरात लवकर वितरित करण्यात यावे असे आदेश देखील दिले असल्याने शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे
नमो शेतकरी महासन्मान निधी योजना नवीन अर्जप्रक्रिया | Namo Shetkari Yojana New Registration :
नमो शेतकरी योजनेसाठी तुम्ही अद्यापही रजिस्ट्रेशन केलं नसल्यास तुमच्याकडे अजूनही या योजनेसाठी ऑनलाईन ऑफलाइन या दोन्ही पद्धतीने अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू आहे. मित्रांनो या दोन्ही योजना बद्दल बोलायचे झाल्यास या दोन्ही योजना एकमेकांशी संलग्न असल्याने एका योजनेचा लाभ तुम्हाला मिळत असल्यास दुसऱ्या योजनेचा लाभ तुम्हाला आपोआप दिला जातो आणि यामुळेच नमो शेतकरी योजनेसाठी नव्याने किंवा वेगळे कोणतेही रजिस्ट्रेशन प्रक्रिया ठेवण्यात आलेले नाही.
पी एम किसान योजनेचा अर्ज करायला म्हणजेच तुम्ही नमो शेतकरी योजनेचा अर्ज देखील केला असा त्याचा अर्थ होतो ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्यासाठी तुम्ही पीएम किसान च्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन त्या ठिकाणी न्यू रजिस्ट्रेशन यावर क्लिक करून तुमचे सर्व माहिती भरून आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करून तुमचे अर्ज भरू शकणार आहात यासाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारचे शुल्क देखील आवश्यक नाही आणि यासाठी तुमच्या आधार कार्ड ला मोबाईल नंबर लिंक असणे आवश्यक असणार आहे आणि त्यासोबतच तुमच्या आधार कार्ड ला बँक खाते देखील लिंक असणे आवश्यक आहे.
या योजनेसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करण्याच्या प्रक्रियेबद्दल बोलायचे झाल्यास यासाठी तुम्हाला तुमच्या गावातील गाव कामगार तलाठी असेल अथवा कृषी असेल यांच्याकडे जाऊन तुमची सर्व आवश्यक असणारी कागदपत्रे जमा करायची आहेत या कागदपत्रांमध्ये खालील कागदपत्रे महत्त्वाची असणार आहेत.
- आधार कार्ड
- बँक पासबुक
- सातबारा उतारा
- 8अ उतारा
- रेशनिंग कार्ड झेरॉक्स
यासर्व कागदपत्रांसह तुम्ही तुमच्या तहसील कार्यालयामध्ये जाऊन तुमच्या अर्ज सबमिट करू शकणार आहात.
नमो शेतकरी योजना लाभार्थी यादी पाहण्यासाठी | येथे क्लिक करा |
राज्यातील सर्व शेतकरी योजना पाहण्यासाठी | येथे क्लिक करा |
योजना Whatsapp Group जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा |
FAQ (सतत विचारले जाणारे प्रश्न)
Q : नमो शेतकरी योजनेचा चौथा हफ्ता कधी जमा होणार आहे ?
A – नमो शेतकरी योजनेचा चौथा हफ्ता ऑगस्ट महिन्या मध्ये शेतकऱ्यांना जमा होणार आहे.
Q : नमो शेतकरी योजनेची अधिकृत वेबसाईट काय आहे ?
A – https://nsmny.mahait.org/
Q : नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेची लाभार्थी यादी कशी पहायची ?
A – या योजनेची लाभार्थी यादी तुम्हाला पीएम किसानच्या वेबसाईट वर जाऊनच पहावी लागणार आहे.