लाडकी बहिण योजना या महिलांना नाही मिळणार 3000 रुपये यादी पहा | Ladli Behna Yojana Maharashtra List

Ladli Behna Yojana Maharashtra List मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे आता महिलांच्या बँक खात्यावर जमा होण्यास सुरुवात झाली आहे. आणि दिनांक 17 ऑगस्ट पर्यंत सर्व महिलांच्या बँक खात्यावर हे पैसे जमा होणार आहेत. राज्यभरातून सुमारे 01 कोटी 35 लाख महिला पहिल्या दोन हप्त्यासाठी पात्र ठरले असून आता त्यापैकी 27 लाख महिलांना योजनेचे पहिले दोन हप्ते दिले जाणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

आता या कोण महिला आहेत ज्यांना पैसे मिळणार नाहीत किंवा ज्या पात्र असून देखील ज्यांच्या बँक खात्यावर ही रक्कम येणार नाही याबाबतची माहिती आणि यादी सरकारच्या वतीने प्रसिद्ध करण्यात आली असून महिलांना अपडेट करण्यासाठी मुदत देखील देण्यात आली आहे याबद्दलची सर्व सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे.

Ladli Behna Yojana Beneficiery List Maharashtra

याच महिलांना मिळणार लाडकी बहिण योजनेचा हफ्ता –

लाडकी बहीण योजनेसाठी पात्र झालेल्या महिलांना देखील राज्य सरकारकडून धक्कादायक बातमी देण्यात आली आहे कारण 31 जुलै 2024 पर्यंत अर्ज केलेल्या महिलांपैकी सुमारे 27 लाख महिलांच्या आधार कार्ड ला बँक खाते लिंक नसल्याने आता या सत्तावीस लाख महिलांना 17 ऑगस्ट रोजी पैसे दिले जाणार नाहीत आणि त्यामुळे लवकरात लवकर सर्व महिलांनी आपल्या आधार कार्ड ला बँक खाते लिंक करून घेण्यासाठी राज्य सरकारच्या वतीने आवाहन करण्यात येत आहे.

14 ऑगस्ट पासून महिलांच्या बँक खात्यावर पैसे येण्यास सुरुवात झाली आहे आणि 70 लाख महिलांच्या बँक खात्यावर योजनेअंतर्गत तीन हजार रुपये जमा करण्यात आल्याची माहिती सरकारकडून देण्यात आली आहे उर्वरित देखील महिलांना येत्या एक ते दोन दिवसांमध्ये त्यांच्या बँक खात्यावरील रक्कम जमा करण्याचे सरकारकडून काम सुरू असल्याचे देखील सांगण्यात आले आहे.Ladli Behna Yojana Maharashtra List

Ladli Behna Yojana Maharashtra Registration :

वेबसाईट वरून अर्ज भरलेल्या महिलांना कधी मिळणार पैसे ?

17 ऑगस्ट पर्यंत च्या हप्त्यामध्ये ज्या महिलांनी 31 जुलै च्या आधी या योजनेसाठी आपला अर्ज केला आहे किंवा त्याच महिलांना पात्र करण्यात आले आहे आणि अशाच महिलांना 17 ऑगस्ट रोजी हप्ता मिळणार आहे. परंतु ज्या महिलांनी वेबसाईटवरून अथवा मोबाईल ॲप्लिकेशन वरून दिनांक 01 ऑगस्ट नंतर अर्ज केला आहे अशा महिलांचे अर्ज अद्याप पेंडिंग किंवा रिव्ह्यू मध्ये दाखवत आहे.

हे अर्ज Approved झाल्यानंतर या देखील महिलांना ऑगस्ट महिन्याच्या शेवटी अथवा सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर या तिन्ही महिन्यांचे मिळून 4500 रुपये जमा करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री यांनी सांगितल्यामुळे महिलांनी घाबरून जाण्याची कोणतीही आवश्यकता नाही. तुम्ही उशिरा जरी अर्ज केला तरी तुम्हाला सर्व पैसे दिले जाणार आहेत.

लाडकी बहीण योजनेचे अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट पर्यंत मुदत देण्यात आली आहे परंतु अनेक महिला अर्ज होत नाही किंवा एप्लीकेशन चालत नाही म्हणून तक्रारी करत असल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे. यासाठी वेबसाईट सुरू करण्यात आली असून वेबसाईट देखील व्यवस्थित चालत नाही आणि त्यामुळे अनेक महिला अर्ज करण्यापासून अद्यापही वंचित आहेत.

Ladli Behna Yojana Maharashtra Last Date :

लाडकी बहिण योजना हफ्ता जमा झाला का कसे समजणार ?

लाडकी बहीण योजनेचा हप्ता तुम्हाला मिळाला का नाही कसे पाहायचे झाल्यास यासाठी तुम्हाला तुमच्या बँकेद्वारे पैसे जमा झाल्यानंतर मेसेज येणार आहे हा मेसेज आल्यानंतर तुमच्या खात्यावर ही रक्कम जमा होणार आहे आणि अशा पद्धतीने तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होणार आहेत. यासाठी तुम्हाला घाई करण्याची आवश्यकता नाही कारण 17 ऑगस्ट पर्यंत तुम्हाला ही रक्कम जमा झाल्याचा मेसेज येणार आहे.

लाडकी बहिण योजना आधार लिंक नसल्यावर पैसे येणार का ?

ज्या महिलांच्या आधार कार्ड ला बँक खाते लिंक नाही असे महिलांना या योजनेचा हप्ता दिला जमा असल्याचे स्पष्ट सांगण्यात आले आहे त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर तुमच्या बँकेमध्ये जाऊन अथवा तुमच्या जवळील पोस्ट ऑफिस मध्ये जाऊन तुमच्या आधार कार्ड ला बँक खाते लिंक करून घ्यायचा आहे ज्यामुळे डीबीटी द्वारे येणारे पैसे तुमच्या त्या बँक खात्यात जमा होणार आहेत आणि तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही.

Ladli Behna Yojana Maharashtra List
📃लाडकी बहिण योजना लाभार्थी यादी पाहण्यासाठीयेथे क्लिक करा
💻लाडकी बहिण योजना ऑनलाईन अर्ज करण्यासाठीयेथे क्लिक करा
🟢योजना ग्रुप जॉईन करण्यासाठीयेथे क्लिक करा
Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठीयेथे क्लिक करा