लाडकी बहिण योजनेचे 3000 रुपये खात्यावर जमा तुम्हाला पैसे आले का ? लगेच पहा | Ladaki Bahin Yojana Installment

Ladaki Bahin Yojana Installment लाडकी बहीण योजनेचे 3000 रुपये महिलांच्या बँक खात्यावर जमा होण्यास सुरुवात झाली आहे आणि यामुळे रक्षाबंधनाच्या पूर्वीच राज्य सरकारच्या वतीने सर्व पात्र महिलांसाठी हे एक मोठे गिफ्ट देण्यात आले आहे. महिलांच्या बँक खात्यावर पैसे जमा झाल्याने महिलांमध्ये देखील आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अखेर राज्यात सुरू झाली आहे असे म्हणण्यास हरकत नाही.

या योजनेसाठी तुम्ही देखील अर्ज केला आहे आणि तुमचा अर्ज Approved झाला परंतु अजूनही तुम्हाला हप्ता आला नाही तर तुम्हाला काय करायचे आहे कोणते काम करावे लागणार आहे याबद्दलची सविस्तर माहिती तुम्हाला देण्यात आली आहे.

Ladaki Bahin Yojana लाभार्थी यादी :

लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी यादी बद्दल बोलायचे झाल्यास या योजनेसाठी जुलै महिन्यात अर्ज करण्यास सुरुवात झाली आणि त्यानंतर सर्व महिलांनी मोबाईल ॲप्लिकेशन मधून अथवा अंगणवाडी सेविकांद्वारे ऑफलाइन पद्धतीने अर्ज केले. जुलै महिन्यात केलेल्या अर्जांची छाननी ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्येच सुरू करण्यात आली आणि त्यानुसार महिलांना मेसेज द्वारे अथवा एप्लीकेशन मध्ये त्यांचे अर्ज स्वीकारले अथवा रिजेक्ट केल्याचे सांगण्यात आले.

ज्या महिलांचे अर्ज रिजेक्ट झाले होते अशा सर्व महिलांना अर्ज पुन्हा एकदा एडिट करण्यासाठी पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आणि त्यामुळे अर्ज करताना झालेल्या चुका सुधारून अशा महिलांनी पुन्हा एकदा आपला अर्ज केला आणि त्यामुळे यादेखील महिलांना आता योजनेचे पैसे जमा होणार आहेत.

याच महिलांना मिळणार पैसे –

17 ऑगस्ट पर्यंत या योजनेचा पहिला आणि दुसरा हप्ता असे मिळून तीन हजार रुपये महिलांच्या बँक खात्यावर जमा होणार आहेत. आता हे पैसे कोणाला मिळणार याबद्दल बोलायचे झाल्यास ज्या महिलांचे अर्ज 31 जुलै पर्यंत सबमिट झाले होते आणि ज्या महिलांच्या अर्जांची छाननी होऊन अर्ज पात्र झाले आहेत अशा महिलांना आणि त्यासोबत ज्या महिलांच्या आधार कार्ड ला बँक खाते लिंक आहे केवळ त्याच महिलांना हे हप्ते मिळणार आहेत.Ladaki Bahin Yojana Installment

Ladaki Bahin Yojana यादी महाराष्ट्र :

या महिलांना नाही मिळणार पहिला हफ्ता –

लाडकी बहीण योजनेच्या पहिल्या आणि दुसऱ्या हप्त्यासाठी राज्यभरातून सुमारे 01 कोटी ३५ लाख महिला पात्र झालेल्या आहेत या पात्र झालेल्या महिलांपैकी 27 लाख महिलांच्या आधार कार्ड ला बँक खाते लिंक नसल्याने या सत्तावीस लाख महिलांना 17 ऑगस्ट पर्यंत दिला जाणारा हप्ता मिळणार नाही. मग आता या महिलांनी काय करायचे तर या 27 लाख महिलांनी लवकरात लवकर आपल्या बँकेमध्ये जाऊन आपले आधार आणि बँक खाते एकमेकांशी संलग्न करणे आवश्यक असणारा आहे.

मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार ज्या महिला 17 ऑगस्ट नंतर आपल्या आधार कार्ड ला बँक खाते लिंक करणार अशा महिलांना सप्टेंबर महिन्यामध्ये जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर असे तिन्ही महिन्यांचे एकत्रित ४५०० रुपये दिले जाणार आहेत. आणि त्यामुळे महिलांनी कोणत्याही प्रकारची काळजी करण्याची आवश्यकता नाही आहे फक्त तुम्ही तुमचा अर्ज योग्यरित्या भरायचा आहे आणि त्यासोबतच तुमच्या आधार कार्ड ला बँक खाते लिंक करायचे आहे.

Ladaki Bahin Yojana New Registration Process :

लाडकी बहीण योजनेचे अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट पर्यंत मुदत देण्यात आली आहे परंतु अनेक महिला अर्ज होत नाही किंवा एप्लीकेशन चालत नाही म्हणून तक्रारी करत असल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे. यासाठी वेबसाईट सुरू करण्यात आली असून वेबसाईट देखील व्यवस्थित चालत नाही आणि त्यामुळे अनेक महिला अर्ज करण्यापासून अद्यापही वंचित आहेत.

17 ऑगस्ट पर्यंत महिलांना एकदा पैसे जमा झाल्यानंतर पुन्हा एकदा एप्लीकेशन व्यवस्थित चालण्याची शक्यता आहे त्यामुळे घाई न करता वाट पाहायची आहे आणि व्यवस्थित रित्या तुमचा अर्ज भरायचा आहे जेणेकरून कोणतीही चूक न होता तुम्हाला योजनेचे पैसे मिळणार आहेत.

लाडकी बहिण योजना हफ्ता जमा झाला का कसे समजणार ?

लाडकी बहीण योजनेचा हप्ता तुम्हाला मिळाला का नाही कसे पाहायचे झाल्यास यासाठी तुम्हाला तुमच्या बँकेद्वारे पैसे जमा झाल्यानंतर मेसेज येणार आहे हा मेसेज आल्यानंतर तुमच्या खात्यावर ही रक्कम जमा होणार आहे आणि अशा पद्धतीने तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होणार आहेत. यासाठी तुम्हाला घाई करण्याची आवश्यकता नाही कारण 17 ऑगस्ट पर्यंत तुम्हाला ही रक्कम जमा झाल्याचा मेसेज येणार आहे.Ladaki Bahin Yojana Installment

Ladaki Bahin Yojana Installment
📃लाडकी बहिण योजना लाभार्थी यादी पाहण्यासाठीयेथे क्लिक करा
💻लाडकी बहिण योजना ऑनलाईन अर्ज करण्यासाठीयेथे क्लिक करा
🟢योजना ग्रुप जॉईन करण्यासाठीयेथे क्लिक करा
Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठीयेथे क्लिक करा