लाडकी बहिण योजनेचे 3000 रुपये केवळ याच महिलांना मिळणार तुमचे नाव आहे का ? | Ladaki Bahin Yojana Yadi Maharashtra

Ladaki Bahin Yojana Yadi Maharashtra महाराष्ट्र राज्य सरकारच्या सर्वात महत्त्वाच्या योजना पैकी असलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे 02 हप्ते आता पात्र महिलांच्या बँक खात्यावर दिनांक 17 ऑगस्ट 2024 रोजी जमा केले जाणार आहेत. या दोन हप्त्यांद्वारे महिलांच्या बँक खात्यामध्ये 3000 रुपये जमा होणार आहेत आणि यासाठी आता प्रक्रिया सुरू झाली असून महिलांची यादी देखील तुम्ही आता पाहू शकणार आहात.

लाडकी बहीण योजनेचे पैसे केवळ याच महिलांच्या बँक खात्यावर जमा होणार आहे तुम्हाला पैसे जमा होणार का ? कोणत्या बँक खात्यामध्ये तुमचे पैसे येणार ? उर्वरित महिलांचे काय होणार ? तसेच नवीन अर्ज आता भरू शकता का नाही याबद्दलची आणि इतर सर्व सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे.

Ladaki Bahin Yojana Maharashtra 2024 :

महाराष्ट्र सरकारने अधिवेशनामध्ये महिलांसाठी घोषित केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेसाठी दिनांक 01 जुलै 2024 पासून अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. या योजनेसाठी ऑनलाईन आणि ऑफलाइन या दोन्ही पद्धतीने महिलांना अर्ज करण्यासाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती आणि याद्वारे जास्तीत जास्त महिलांनी योजनेसाठी आपला अर्ज करावा यासाठी सरकार द्वारे आणि संबंधित विभागाद्वारे वारंवार आवाहन करण्यात येत होते.

योजनेसाठी महिलांनी देखील उदंड असा प्रतिसाद देत मोठ्या प्रमाणावर आपले रजिस्ट्रेशन किंवा नोंदणी करून घेतली आणि आता नोंदणी करून जवळपास सर्व अर्जांची छाननी देखील विभागाकडून करण्यात आली असून अंतिम याद्या तयार करून आता महिलांच्या बँक खात्यावर संबंधित रक्कम जमा केली जाणार आहे. परंतु याबाबत महिलांमध्ये शासन कथा पाहायला मिळत आहे नक्की पैसे कोणाला येणार आणि पैसे येणार तर कोणत्या बँक खात्यामध्ये येणार याबाबतची सर्व सविस्तर माहिती तुम्ही पाहू शकणार आहात.

Ladaki Bahin Yojana List Maharashtra :

लाडकी बहिण योजनेचा हफ्ता याच महिलांना मिळणार –

लाडकी बहीण योजनेचा 17 ऑगस्ट 2024 रोजी जमा होणारा हप्ता ज्या महिलांचे अर्ज दिनांक 14 ऑगस्ट २०२४ पर्यंत Approved झाले आहेत केवळ त्याच महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा केला जाणार आहे. याचाच अर्थ ज्या महिलांनी एप्लीकेशन मध्ये अथवा वेबसाईटवरून आपले अर्ज भरले होते आणि त्या अर्जांची छाननी पूर्ण होऊन दिलेल्या मोबाईल नंबर वर तुमचा अर्ज Approved झाला असा मेसेज आला असेल अथवा एप्लीकेशन वर किंवा वेबसाईटवर जाऊन तुम्ही तुमचा स्टेटस पाहून त्यामध्ये तुमचा अर्ज Approved दिसत आहे अशा महिलांना योजनेचे पैसे जमा होणार आहेत.Ladaki Bahin Yojana Yadi Maharashtra

आधार-बँक सीडिंग स्टेटस Active असणे अनिवार्य –

यासोबतच अत्यंत महत्त्वाचे म्हणजे ज्या महिलांचे आधार कार्ड आणि बँक सीडिंग ऍक्टिव्ह आहे म्हणजेच ज्या महिलांच्या आधार कार्ड ला बँक खाते NPCI द्वारे लिंक आहे केवळ त्याच महिलांना 17 ऑगस्ट 2024 रोजी योजनेचे हप्ते मिळणार आहेत.आधार-बँक सीडिंग ऍक्टिव्ह असणे आवश्यक असणार आहे कारण लाडकी बहीण योजनेसाठी वितरित होणारा निधी हा डीबीटी द्वारे महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार असल्याने यासाठी आधार कार्ड ला बँक खाते लिंक असणे अनिवार्य आहे. सदरील बँक खाते आधारशी संलग्न नसल्यास महिलांना 17 ऑगस्ट रोजी मिळणार हप्ता दिला जाणार नाही.

Ladaki Bahin Yojana यादी महाराष्ट्र :

ज्या महिलांचे अर्ज अद्याप भरले नाहीत किंवा पेंडिंग आहेत अशा महिलांचे काय –

तसेच ज्या महिलांचे अर्ज अद्याप पेंडिंगला आहेत, किंवा रिजेक्ट झाले आहेत तसेच काही महिलांनी अद्याप अर्ज देखील भरले नाहीत त्यांचे काय होणार तर ज्या महिला 31 ऑगस्टपर्यंत आपले अर्ज भरणार आहेत त्या सर्व महिलांना सप्टेंबर महिन्यामध्ये जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर असे तीनही महिन्यांची मिळून एकत्रित हप्ते दिले जाणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे.

आणि त्यामुळेच तुम्ही परत लवकरात लवकर तुमचे अर्ज सबमिट करायचे आहेत आणि सर्व माहिती व्यवस्थितरित्या भरायचे आहे त्यासोबतच तुमचे आधार आणि बँक देखील एकमेकांशी लिंक करून घ्यायचे आहे जेणेकरून तुम्हाला पुढील सर्व हप्ते मिळण्यासाठी कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही.

Ladaki Bahin Yojana Yadi Maharashtra
📃लाडकी बहिण योजना लाभार्थी यादी पाहण्यासाठीयेथे क्लिक करा
💻लाडकी बहिण योजना ऑनलाईन अर्ज करण्यासाठीयेथे क्लिक करा
🟢योजना ग्रुप जॉईन करण्यासाठीयेथे क्लिक करा
Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठीयेथे क्लिक करा