लाडकी बहिण योजना उर्वरित महिलांना पैसे कधी मिळणार याच बँकेत येणार पैसे | Ladaki Bahin Yojana List

Ladaki Bahin Yojana List मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे हप्ते आता पात्र असलेल्या महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात आले आहेत. राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार दिनांक 14 ऑगस्ट ते 17 ऑगस्ट 2024 पर्यंत राज्यभरातून सुमारे 01 कोटी ०५ लाख महिलांच्या बँक खात्यामध्ये जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्यांचे मिळून 3000 रुपये जमा करण्यात आले आहेत.

आणि राज्य सरकारच्या या महत्त्वाकांक्षी असलेल्या योजनेचा महिलांना थेट लाभ मिळाल्यामुळे महिलांमध्ये देखील आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे यामध्ये आता उर्वरित असलेल्या महिलांना कधी पैसे मिळणार ? यासोबतच नवीन अर्ज करण्याची प्रक्रिया व्यवस्थित कधी सुरू होणार आणि नवीन अर्ज जे की पेंडिंग मध्ये आहेत ते अप्रुव्हल वगैरे कधी होणार याबद्दल सर्व माहिती सांगण्यात आली आहे.

Ladaki Bahin Yojana Maharashtra 2024 List :

मित्रांनो महाराष्ट्र राज्य सरकारने अधिवेशनामध्ये घोषित केल्यानुसार महाराष्ट्र राज्यातील सर्व पात्र महिलांसाठी महिन्याला 1500 रुपये थेट बँक खात्यात जमा करण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राज्यभरात लागू करण्यात आली. या योजनेसाठी सर्व महिलांना ऑनलाइन आणि ऑफलाइन या दोन्ही पद्धतीने अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली.

योजनेसाठी महिला मोबाईल ॲप्लिकेशन मधून अथवा जवळील अंगणवाडी सेविका किंवा ग्रामपंचायत कार्यालयामध्ये जाऊन आपले अर्ज करू शकणार होत्या आणि याद्वारे जुलै महिन्यामध्ये लाडकी बहीण योजनेमध्ये तब्बल 01 कोटी 40 लाख महिलांना ज्यांनी व्यवस्थित अर्ज केले होते आणि सर्व पात्रतेमध्ये बसत होते अशा महिलांना पात्र करण्यात आले.

लाडकी बहीण योजनेसाठी रक्षाबंधनापूर्वीच महिलांना गिफ्ट स्वरूपात राज्य सरकारच्या वतीने हप्ता वितरित करण्याचे घोषित करण्यात आले आणि त्यानुसार दिनांक 17 ऑगस्ट पर्यंत महिलांच्या बँक खात्यावर जुलै आणि ऑगस्ट असे दोन्ही महिन्यांचे मिळून 3000 रुपये महिलांच्या बँक खात्यावर जमा देखील करण्यात आले.Ladaki Bahin Yojana List

Ladki Bahin Yojana Last Date 2024 :

लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्याकरिता आता महिलांना मुदत वाढ देण्यात आली आहे आणि त्यामुळे आता सर्व महिला या योजनेसाठी सप्टेंबर महिन्यापर्यंत आपला अर्ज करू शकणार आहेत योजनेचे अर्ज भरण्यासाठी महिलांकडे 30 सप्टेंबर 2024 पर्यंत मुदत देण्यात आली आहे. आणि त्यामुळे सर्व पात्र व इच्छुक महिला आता लवकरात लवकर वेबसाईटवर जाऊन अथवा एप्लीकेशन वरून आपले अर्ज करू शकणार आहेत.

या महिलांना मिळणार ४५०० रुपये –

लाडकी बहीण योजनेसाठी तुम्ही ऑगस्ट महिन्यामध्ये अथवा सप्टेंबर महिन्यामध्ये जरी तुमचा अर्ज केला तरी देखील तुमचा अर्ज सुरुवातीपासूनच ग्राह्य धरला जाणार असल्याने तुम्हाला जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर असे तीन महिन्यांचे मिळून ४५०० रुपये जमा केले जाणार आहेत आणि त्यामुळे तुम्ही कोणत्याही प्रकारचे काळजी करण्याची आवश्यकता नाही तुमचा अर्ज तुम्ही उशिरा जरी भरला तरी देखील तुम्हाला सर्व पैसे जमा केले जाणार असल्याचे सरकारच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.

उर्वरित महिलांना कधी मिळणार पैसे –

योजनेसाठी वरवर नवीन नोंदणी झाल्यानंतर आणि छाननी करून पात्र झाल्यास अशा महिलांना देखील ही रक्कम मिळतच राहणार असल्याचे सरकार कडून सांगण्यात आले आहे आणि त्यामुळे तुम्ही देखील उशिरा अर्ज केला असेल तरी तुम्हाला 30 ऑगस्टपर्यंत देखील या योजनेद्वारे तुमच्या बँक खात्यावर पैसे दिले जाणार आहेत.

Ladaki Bahin Yojana Adhar Bank Seeding Status :

लाडकी बहिण योजना लिंक असलेले बँक खाते पाहण्यासाठी हे करा –

लाडकी बहीण योजनेचे पैसे महिलांच्या आधार कार्ड ला लिंक असलेल्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहेत आणि त्यामुळे तुम्ही अर्ज भरताना दुसरे बँक खाते दिले असले परंतु तुमच्या आधार कार्ड ला वेगळे बँक खाते लिंक असल्यास तुमच्या आधार कार्ड ला लिंक असलेल्या बँक खात्यामध्येच ही रक्कम जमा केली जाणार आहे.

हे पाहण्यासाठी तुम्हाला आधार कार्ड च्या वेबसाईटवर जायचे आहेत आणि त्या ठिकाणी बँक सीडींग स्टेटस तुम्हाला चेक करायचा आहे यामध्ये तुमच्या आधार कार्ड ला लिंक असलेल्या बँक खात्याचे नाव येणार आहे आणि त्याखाली ते खाते चालू आहे की बंद आहे हे देखील तुम्ही पाहू शकणार आहात.

तुमचे आधार कार्ड लिंक असलेले बँक खाते चालू असणे देखील आवश्यक असणारा आहे तरच तुम्हाला योजनेचे पैसे दिले जाणार आहेत आणि त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर तुमच्या आधार कार्ड ला लिंक असलेले बँक खाते पाहायचे आहे हे पाहण्यासाठी ची लिंक तुम्हाला खाली देण्यात आली आहे.Ladaki Bahin Yojana List

Ladaki Bahin Yojana List
🏪लाडकी बहिण योजना बँक लिंक पाहण्यासाठीयेथे क्लिक करा
📃लाडकी बहिण योजना लाभार्थी यादी पाहण्यासाठीयेथे क्लिक करा
💻लाडकी बहिण योजना ऑनलाईन अर्ज करण्यासाठीयेथे क्लिक करा
🟢योजना ग्रुप जॉईन करण्यासाठीयेथे क्लिक करा
Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठीयेथे क्लिक करा