राज्यातील शेतकऱ्यांना दुष्काळ अनुदान मंजूर गावनिहाय यादी प्रसिद्ध | Dushkal Yadi 2024 Maharashtra

Dushkal Yadi 2024 Maharashtra नमस्कार शेतकरी मित्रांनो महाराष्ट्र राज्यात 2023 वर्षी अत्यंत कमी प्रमाणात पाऊस पडल्याने बहुतांश भागात भयंकर दुष्काळ परिस्थिती निर्माण झाल्याची आपण पाहिले आणि यामुळेच अनेक शेतकऱ्यांचे पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होऊन शेतकऱ्यांच्या हातून खरीप आणि त्याचबरोबर रब्बी हंगामातील पिके देखील गेली आणि परिणामी शेतकऱ्यावर मोठा संकटाचा डोंगर कोसळला.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

या सर्व परिस्थितीतून शेतकऱ्यांना बाहेर काढण्यासाठी आर्थिक मदत म्हणून राज्य सरकारच्या वतीने दुष्काळ जाहीर झालेल्या मंडळांमध्ये किंवा तालुक्यांमध्ये सरसकट शेतकऱ्यांना नुकसान भरपाई अनुदान देण्याची घोषणा करण्यात आली आणि त्यानुसार महाराष्ट्र राज्यातील दुष्काळी ठरलेल्या 40 तालुक्यांसाठी सर्व 22 लाख 34 हजार शेतकऱ्यांना दुष्काळ नुकसान भरपाई अनुदान जाहीर करण्यात आले आणि त्यानुसार या अनुदानाचे वाटप देखील सुरू आहे.

शेतकरी मित्रांनो राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी त्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे आणि नुकसानाची तीव्रता अधिक स्वरूपात आहे अशा तालुक्यातील शेतकऱ्यांना यामुळे मोठा लाभ होणार आहे. यासाठी पिक विमा भरलेला असणे देखील आवश्यक नसणार आहे ज्या शेतकऱ्यांनी आपल्या शेताची चालू वर्षाची पीक पाणी ई पिक पाहणी एप्लीकेशन द्वारे नोंदवली होती अशाच शेतकऱ्यांना हा निधी दिला जाणार आहे.

राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभाग यांच्या अंतर्गत प्रसिद्ध करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार दुष्काळाची किंवा दुष्काळ अनुदानाची पूर्वीची असणारी ०२ हेक्टरची मर्यादा राज्य सरकारने आता 03 हेक्टर केली असून यामुळे जे शेतकरी या लाभापासून वंचित राहत होते त्यांना देखील मोठ्या प्रमाणावर दिलासा मिळत आहे.

महाराष्ट्र राज्य महसूल व वन विभाग यांच्याद्वारे नुकसान भरपाईच्या रक्कमेच्या वितरणासाठी शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आला आहे आणि यानुसार संपूर्ण राज्यभरातील मध्यम आणि गंभीर दुष्काळात असलेल्या चाळीस तालुक्यांसाठी सुमारे २४४३ कोटींचा निधी वितरित करण्यास मान्यता देण्यात आली असून शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर पैसे देखील जमा झाले आहेत. उर्वरित देखील शेतकऱ्यांना येणाऱ्या सर्व अडचणी दुरुस्त करून संबंधित रक्कम शेतकऱ्यांना देण्याचे आश्वासन देखील कृषी विभागातील अधिकाऱ्यांनी दिले आहेत.

या जाहीर करण्यात आलेल्या चाळीस तालुक्यांमध्ये मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र आणि त्याचबरोबर विदर्भातील देखील तालुक्यांचा समावेश करण्यात आला आहे. 2023 मध्ये राज्याच्या अनेक विभागात पावसाचे प्रमाण हे अत्यल्प राहिले पश्चिम महाराष्ट्र हा ऊस पट्ट्याचा भाग म्हणून ओळखला जातो परंतु या पट्ट्यात देखील कमी झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांची पिके करपून गेली.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

ज्या शेतकऱ्यांच्या पिकांचे 33 टक्के पेक्षा जास्त नुकसान आहे अशा सर्व शेतकऱ्यांच्या पिकांचा सर्वे करण्याचे आदेश देखील गाव कामगार तलाठी आणि कृषी यांना देण्यात आले होते आणि त्यानुसार डेटा तयार करून कृषी विभागाकडे पाठवण्यात आला होता. दिनांक 29 फेब्रुवारी 2024 ला राज्य सरकारच्या अधिकृत वेबसाईटवर दुष्काळ निधी मंजुरीसाठीचा अधिकृत शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आला होता.

हा शासन निर्णय सर्वस्वी राज्य सरकार यांच्या अतिवृष्टी, दुष्काळ, पूर, चक्रीवादळ यांसारख्या अनेक नैसर्गिक संकटांमुळे ज्या शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होते अशा सर्व शेतकऱ्यांना राज्य सरकारच्या वतीने आपली प्रतिसाद निधीमधून आर्थिक स्वरूपात मदत देण्यात येत असते. शेतकऱ्यांना देण्यात येणारे नुकसान भरपाईचे रक्कम येईल डायरेक्ट बेनिफिशरी ट्रान्सफर म्हणजेच डीबीटी द्वारे बँक खात्यावर वर्ग करण्यात येत असते. यासाठी पात्र झालेल्या शेतकऱ्यांच्या आधार कार्ड ला बँक खाते लिंक असणे अनिवार्य असणार आहे.Dushkal Yadi 2024 Maharashtra

महाराष्ट्र राज्यातील दुष्काळ अनुदानास पात्र ठरलेल्या तालुक्यांची यादी खालील प्रमाणे आहे –

  • मिरज
  • कडेगाव
  • करमाळा
  • माढा
  • सांगोला
  • खानापूर विटा
  • सिन्नर
  • मालेगाव
  • सिंदखेडा
  • येवला
  • नंदुरबार
  • चाळीसगाव
  • बुलढाणा
  • लोणार
  • छत्रपती संभाजीनगर
  • भोकरदन
  • सोयगाव
  • जालना
  • बदनापूर
  • मंठा
  • अंबड
  • धारूर
  • वडवणी
  • अंबाजोगाई
  • धाराशिव
  • वाशी
  • लोहारा
  • पुरंदर
  • इंदापूर
  • बारामती
  • शिरूर घोडनदी
  • दौंड
  • वाई
  • हातकणंगले
  • बार्शी
  • गडहिंग्लज
  • खंडाळा

वरील सर्व तालुक्यातील सरसकट शेतकऱ्यांना ज्या शेतकऱ्यांनी आपल्या पिकाची चालू वर्षाची पिक पाणी नोंद केली होती अशा सर्व शेतकऱ्यांना सरसकट हेक्‍टरी रक्कम दिली जाणार आहे.गावनिहाय पात्रता किंवा लाभार्थी यादी पाहण्यासाठी तुम्ही तुमच्या गावातील तहसील कार्यालयात जाऊन सर्व याद्या पाहू शकणार आहात. यामध्ये यादीत तुमचे नाव असल्यास तुम्ही तुमचा आधार कार्ड घेऊन तहसील कार्यालयात किंवा महा-ई-सेवा केंद्रात जाऊन तुमचे आधार प्रमाणीकरण करणे आवश्यक असणार आहे. आधार प्रमाणे करण यशस्वीरित्या केल्यानंतर काही दिवसातच लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर दुष्काळी अनुदान रक्कम जमा करण्यात येणार आहे.Dushkal Yadi 2024 Maharashtra

हेही वाचा – नमो शेतकरी योजना ३रा हफ्ता लाभार्थी यादी प्रसिद्ध

या योजनेच्या लाभापासून जे शेतकरी वंचित आहेत अशा सर्व शेतकऱ्यांना अद्यापही संधी देण्यात आली आहे याबद्दल बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले की जे शेतकरी दुष्काळ अनुदानास पात्र आहेत परंतु काही तांत्रिक त्रुटींमुळे अथवा नोंदणीमुळे प्रलंबित राहिले आहेत अशा सर्व शेतकऱ्यांना लवकरात लवकर उर्वरित रक्कम जमा करण्यात येणार आहे यासाठी सर्व शेतकऱ्यांनी लवकरात लवकर आपल्या शेतात जाऊन आपली ई पिक पाहणी करून घ्यायची आहे.

दुष्काळ अनुदान रक्कम बँक खात्यात येण्यासाठी शेतकऱ्यांना आधार प्रमाणीकरण करून घेणे आवश्यक असणार आहे. आधार प्रमाणे करून मोबाईलवरून किंवा स्वतः शेतकरी करू शकत नाहीत यासाठी शेतकऱ्यांना तहसील कार्यालयात जावे लागणार आहे अथवा महा-ई-सेवा केंद्रात जाऊन स्वतः शेतकऱ्यांनी आपल्या बोटांचे ठसे देऊन संबंधित आधार प्रमाणे करून घ्यायचे आहे.

Dushkal Yadi 2024 Maharashtra

आधार प्रमाणीकरण झाल्यानंतर ज्या बँक खात्याशी आधार कार्ड लिंक आहे त्याच बँक खात्यात शेतकऱ्यांना दुष्काळ अनुदान रक्कम जमा होणार आहे. यासाठी बागायत पिकांसाठी हेक्टरी 17-22 हजार रुपये अनुदान शेतकऱ्यांना मिळणार आहे. तालुका निहाय शेतकऱ्यांची यादी आणि मंजूर झालेले अनुदान तुम्ही वर दिलेल्या पीडीएफ मध्ये पाहू शकणार आहात आणि गाव निहाय पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांची यादी पाहण्यासाठी तुम्हाला केवळ तहसील कार्यालयात जावे लागणार आहे.

या योजनेच्या किंवा अनुदानाच्या लाभापासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना देखील पुढील यादी येऊपर्यंत वाट पहावी लागणार आहे. पुढील यादीमध्ये ज्या शेतकऱ्यांचे नाव येईल त्या सर्व शेतकऱ्यांनी लवकरात लवकर सर्व प्रक्रिया करून घ्यायची आहे. परंतु सर्वात महत्त्वाचे म्हणजे ज्या शेतकऱ्यांची पीक पाहणी प्रलंबित असेल अशा शेतकऱ्यांचे जमीन पडीक म्हणून ग्राह्य धरली जात असल्याने अशा शेतकऱ्यांना ही रक्कम किंवा अनुदान दिले जाणार नाही याची नोंद घ्यायची आहे.

दुष्काळ अनुदान यादी पाहण्यासाठीइथे क्लिक करा
शेतकरी योजना पाहण्यासाठीइथे क्लिक करा
Telegram Group जॉईन करण्यासाठीइथे क्लिक करा
Whatsapp Group जॉईन करण्यासाठीइथे क्लिक करा

Q : दुष्काळ अनुदान रक्कम शेतकऱ्यांना जमा झाली आहे का ?

A – होय.पहिल्या टप्प्यातील सर्व पात्र शेतकऱ्यांना दुष्काळ अनुदान रक्कम जमा झाली आहे.

Q : या योजनेची पुढील यादी येणार आहे का ?

A – याबद्दल अद्याप अधिकृत कोणतीही माहिती देण्यात आली नाही.

Q : ई पिक पाहणी चालू वर्षाची असणे अनिवार्य आहे का ?

A – होय.तुमच्या सात बारा उताऱ्यावर चालू वर्षाची पिक पाहणी नोंद असणे अनिवार्य आहे.

Q : ऑनलाईन गावनिहाय पात्रता यादी पाहू शकतो का ?

A – लाभार्थी यादी गावनिहाय केवळ तहसील कार्यालयात तुम्ही पाहू शकणार आहात.Dushkal Yadi 2024 Maharashtra