Pik Vima Form Pdf Download : पिक पेरा आणि पिक विमा स्वयंघोषना पत्र pdf डाउनलोड करा

Pik Vima Form Pdf Download शेतकरी मित्रांनो 2024 च्या खरीप हंगामासाठी पिक विमा भरण्यासाठी सुरुवात झाली आहे आणि हा पिक विमा 2023 नुसार केवळ 01 रुपयांमध्ये शेतकरी भरू शकणार आहेत. हा पिक विमा तुम्ही तुमच्या मोबाईलवरून किंवा कम्प्युटर वरून घरच्या घरी देखील भरू शकणार आहात आणि यासाठीच तुम्हाला लागणारे पीक पेरा पीडीएफ आणि त्यासोबतच पिक विमा साठी आवश्यक स्वयंघोषणापत्र देखील पीडीएफ स्वरूपात तुम्हाला खाली देण्यात आले आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

पिक विमा सबमिट करत असताना तुम्हाला हे स्वयंघोषणापत्र तसेच पीक पेरा पीडीएफ देखील प्रिंट काढून त्यावर तुमच्या पिकांची माहिती भरून सबमिट करावे लागणार आहे आणि हे सबमिट झाल्यानंतरच तुमचा पिक विमा बरोबर आणि व्यवस्थितरित्या सबमिट केला जाणार आहे. पिक विमा तुम्ही तुमच्या मोबाईलवरून घरच्या घरी कसा भरायचा याची देखील सविस्तर प्रक्रिया तुम्हाला खाली सांगण्यात आली आहे ज्याद्वारे तुम्ही केवळ दहा ते पंधरा मिनिटांमध्ये तुमचा पिक विमा भरू शकणार आहात.

नमस्कार शेतकरी मित्रांनो खरीप हंगाम 2024 चा पिक विमा भरण्यासाठी ची मुदत मागील काही दिवसांपासून सुरू करण्यात आली असून यासाठीच काही आवश्यक कागदपत्रांची पूर्तता तुम्हाला करावी लागत आहे. तुम्हाला तुम्ही तुमच्या मोबाईलवरून अर्ज करताना देखील आणि सीएससी सेंटर किंवा आपले सरकार सेवा केंद्र मधून अर्ज करताना देखील आवश्यक असणार आहे.

यामधीलच अत्यंत महत्त्वाचे असणारे कागदपत्र म्हणजे पीक पेरा स्वयंघोषणापत्र खरीप हंगाम यासाठी तुम्हाला आम्ही खाली लिंक दिली आहे ज्यावरून तुम्ही लगेच एका क्लिकद्वारे हे स्वयंघोषणापत्र डाऊनलोड करू शकणार आहात आणि याची प्रिंट देखील तुम्ही अगदी सहजरीत्या घेऊ शकणार आहात.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

स्वयंघोषणापत्र मध्ये विचारण्यात आलेली सविस्तर माहिती तुम्हाला भरायची आहे आणि त्याची स्कॅन केलेली कॉपी किंवा तुम्ही तुमच्या मोबाईल मधून कोणत्याही स्कॅनर एप्लीकेशन द्वारे भरलेली माहिती स्कॅन करून हे पीक पेरा स्वयंघोषणापत्र तुम्ही सहजरित्या अपलोड करू शकणार आहात. पीक पेरा स्वयंघोषणापत्र हे आवश्यक असल्याने ते भरल्याशिवाय तुमचा अर्ज सबमिट होणार नाही याची देखील नोंद सर्व शेतकऱ्यांनी घ्यायची आहे.

पिक पेरा स्वयंघोषणा पत्र माहिती कशी भरायची –

पिक पेरा स्वयंघोषणापत्र डाऊनलोड केल्यानंतर तुम्हाला त्यामध्ये तुमची सर्व माहिती सविस्तरित्या भरायचे आहे ज्यामध्ये सुरुवातीला तुम्हाला तुमचे संपूर्ण नाव त्यानंतर तुमचे गाव तालुका आणि जिल्हा अशी माहिती भरून त्यानंतर तुमच्या आठ अ उताऱ्याप्रमाणे ज्या गावांमध्ये तुमचे क्षेत्र आहे ती माहिती तुम्हाला हेक्टर किंवा आर म्हणजेच एकर प्रमाणे भरायचे आहे.

यानंतर खाली तुम्हाला गट क्रमांक तसेच खाता नंबर खाता नंबर माहिती नसल्यास तुम्ही तुमच्या आठ अ उताऱ्यावर किंवा सातबारा उताऱ्यावर हे पाहू शकणार आहात. यातील खाते नंबर भरून तुम्हाला पुढे तुमचे क्षेत्र त्यामध्ये असणाऱ्या पिकाचे नाव आणि पुढे त्यापैकी किती क्षेत्रात तुम्ही पेरणी केली आहे ही माहिती लिहायची आहे ही माहिती लिहून झाल्यास त्यानंतर पुढे तुम्हाला तुमचा लागवड दिनांक देखील टाकायचा आहे आणि असेच तुमची जेवढी पिकी आहेत किंवा गाव आहेत त्याची सविस्तर माहिती तुम्ही भरायची आहे.

सविस्तर माहिती भरून झाल्यानंतर तुम्हाला खाली दिनांक टाकायचा आहे आणि यासोबत तुम्हाला तुमचा सातबारा उतारा, आठ अ उतारा आणि ज्या बँक खात्याला तुमचा आधार कार्ड लिंक आहे ते बँक खाते जोडायचे आहे. ज्या दिवशी तुम्ही हा अर्ज सबमिट करणारा हात तो दिनांक टाकायचा आहे आणि खाली मोबाईल नंबर टाकून तुम्हाला याचा फोटो काढून किंवा स्कॅन करून हे स्वयंघोषणापत्र अपलोड करायचे आहे.Pik Vima Form Pdf Download

कोणत्या पिकासाठी किती रुपये पिक विमा मिळणार ?

पिकाचे नावविमा संरक्षित रक्कम (हेक्टरी)
बाजरी33913/-
मुग20000/-
उडीद20000/-
तूर36802/-
कापूस59983/-
मका35598/-
कांदा80000/-
Pik Vima Form Pdf Download

पिक विमा 2024 ऑनलाईन फॉर्म भरण्याची सविस्तर प्रक्रिया –

शेतकरी लॉगीन करण्याची प्रक्रिया :

  • पिक विमा योजनेचा अर्ज करण्यासाठी तुम्हाला पिक विमा योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जायचे आहे आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर रजिस्टर बटनावर क्लिक करून तुम्हाला फार्मर कॉर्नर हा पर्याय निवडायचा आहे
  • यानंतर गेस्ट फार्मर या बटणावर क्लिक करून तुम्हाला त्या ठिकाणी ओपन झालेली सर्व माहिती भरायची आहे.
  • यामध्ये सुरुवातीला तुम्हाला शेतकऱ्याचे संपूर्ण नाव टाकायचे आहे त्यानंतर वडिलांचे किंवा पतीचे नाव टाकून मोबाईल नंबर जेंडर वय,जात, आणि शेतकरी पर्याय म्हणजेच शेतकरी हा अल्पभूधारक मध्यम भूधारक की बहुभूधारक आहे हे निवडायचे आहे
  • हे निवडून झाल्यानंतर फार्मर कॅटेगिरी मध्ये तुम्हाला तीन पर्याय दिसणार आहेत यामध्ये स्वतंत्र सातबारा व आठ असलेल्या शेतकऱ्यांनी ओनर हा पर्याय निवडायचा आहे तर सामायिक क्षेत्र असल्यास शेअर क्रॉपर हा पर्याय निवडायचा आहे.
  • त्यानंतर रेसिडेन्शिअल डिटेल्स मध्ये तुमचे राज्य, जिल्हा, तालुका आणि गाव इत्यादी सर्व माहिती निवडायची आहे.
  • हे झाल्यानंतर खाली असलेल्या फार्मर आयडी या पर्यायांमध्ये खाता नंबर टाकून ( खाते नंबर हा तुम्हाला तुमच्या आठ अ उताऱ्यावर पहायला मिळणार आहे, सातबारावर देखील तुम्ही पाहू शकता).
  • यानंतर खाली गेल्यानंतर बँक अकाउंट ची सर्व माहिती शेतकऱ्यांनी भरायची आहे ज्यामध्ये आयएफएससी कोड, बँकेचे नाव, ब्रांच नाव आणि खाते नंबर देखील टाकायचा आहे सर्व माहिती व्यवस्थित भरल्यानंतर क्रियेट यूजर हा खाली असलेला पर्याय निवडून शेतकऱ्यांनी लॉगिन करून घ्यायचे आहे.
  • यानंतर नेक्स्ट वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुम्ही भरलेली बँक डिटेल्स सर्व दिसणार आहेत ती तुम्ही तपासून खाली असलेल्या नेक्स्ट या पर्यायावर क्लिक करायचे आहे.
  • यामध्ये आता तुम्हाला तुमच्या शेतीची माहिती भरावी लागणार आहे आणि त्यामुळे तुमची शेती ज्या राज्यात आहे ते राज्य निवडायचे आहे नंतर पुढील पर्यायांमध्ये तुम्हाला प्रधानमंत्री फसल बीमा योजना निवडायची आहे.
  • सीझनमध्ये तुम्हाला खरीप हा पर्याय निवडायचा आहे आणि वर्षांमध्ये 2024 ला निवडायचे आहे.
  • यानंतर तुम्हाला तुम्ही भरलेली जमिनीची माहिती दिसणार आहे आणि माहिती न दिसल्यास तुम्ही पुन्हा एकदा ही माहिती भरू शकता.Pik Vima Form Pdf Download
पिक पेरा स्वयंघोषणा पत्र डाऊनलोड करण्यासाठीयेथे क्लिक करा
सामाईक क्षेत्र असल्यास स्वयंघोषणा पत्रयेथे क्लिक करा
पिक विमा अर्ज करण्यासाठीयेथे क्लिक करा
पिक विमा अधिकच्या माहितीसाठीयेथे क्लिक करा
Whatsapp Group जॉईन करण्यासाठीयेथे क्लिक करा