Pik Vima Form Kasa Bharava शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी पिक विमा खरीप हंगाम 2024 साठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली असून तुम्ही तुमच्या मोबाईलवरून किंवा कम्प्युटर वरून घरबसल्या तुमचा अर्ज आता सबमिट करू शकणार आहात. यासाठी संपूर्ण प्रक्रिया आता मोबाईल वरून देखील तुम्हाला करता येणार आहे आणि केवळ 01 रुपयांमध्ये तुम्ही तुमचा पीक विमा भरू शकणार आहात याबद्दलची संपूर्ण प्रक्रिया खाली देण्यात आली आहे.
Pik Vima Form Pdf Marathi 2024
राज्यभरातील सर्व शेतकऱ्यांना कळविण्यात येते की यावर्षी देखील राज्य सरकारने संपूर्ण राज्यातील शेतकऱ्यांना फक्त 01 रुपयांमध्ये पिक विमा योजना सुरू केली आहे आणि याचे ऑनलाइन पद्धतीने अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया देखील सुरुवात आहे. पिक विम्याच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन तुम्ही तुमच्या मोबाईल मधून देखील यावेळी अर्ज करू शकणार आहात तसेच सीएससी सेंटर मध्ये आणि आपले सरकार सेवा केंद्र मध्ये देखील हे अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया आता सुरू झाली आहे.
शेतकरी मित्रांनो 2023 या वर्षापासून शेतकऱ्यांना सहकार्य करण्यासाठी महाराष्ट्र राज्य सरकारच्या वतीने 01 रुपयांमध्ये पिक विमा योजना सुरू करण्यात आली आणि या योजनेला मागील वर्षी उदंड असा प्रतिसाद सर्व जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या वतीने पाहायला मिळाला. अनेक शेतकऱ्यांनी आपला पिक विमा उतरवला आणि यामुळे शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान झाल्यानंतर त्यांना नुकसान भरपाई रक्कम देखील जमा करण्यात आली.
योजनेचे नाव | प्रधानमंत्री पिक विमा योजना २०२४ |
विभाग | महाराष्ट्र राज्य महसूल व कृषी विभाग |
शुल्क | १ रुपया |
नोंदणी प्रक्रिया | ऑनलाईन (मोबाईल किंवा कम्प्युटर) |
मागील वर्षी दुष्काळजन्य परिस्थिती असल्याने अनेक भागात पाऊस नाही पडला आणि परिणामी पिके देखील करपून गेली आणि अशाच परिस्थितीमध्ये हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांना या पीक विम्याच्या रकमेमुळे नक्कीच काही प्रमाणात आधार देखील मिळाला. आणि त्यामुळेच या वर्षी देखील खरीप हंगामा मधील पिक विमा साठी संपूर्ण राज्यभरातून मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळण्याची राज्य सरकारला आशा असल्याचे संबंधित अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे.
Pik Vima Online Form 2024 Maharashtra
पिक विमा 2024 ऑनलाईन फॉर्म भरण्याची सविस्तर प्रक्रिया –
शेतकरी लॉगीन करण्याची प्रक्रिया :
- पिक विमा योजनेचा अर्ज करण्यासाठी तुम्हाला पिक विमा योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जायचे आहे आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर रजिस्टर बटनावर क्लिक करून तुम्हाला फार्मर कॉर्नर हा पर्याय निवडायचा आहे
- यानंतर गेस्ट फार्मर या बटणावर क्लिक करून तुम्हाला त्या ठिकाणी ओपन झालेली सर्व माहिती भरायची आहे.
- यामध्ये सुरुवातीला तुम्हाला शेतकऱ्याचे संपूर्ण नाव टाकायचे आहे त्यानंतर वडिलांचे किंवा पतीचे नाव टाकून मोबाईल नंबर जेंडर वय,जात, आणि शेतकरी पर्याय म्हणजेच शेतकरी हा अल्पभूधारक मध्यम भूधारक की बहुभूधारक आहे हे निवडायचे आहे
- हे निवडून झाल्यानंतर फार्मर कॅटेगिरी मध्ये तुम्हाला तीन पर्याय दिसणार आहेत यामध्ये स्वतंत्र सातबारा व आठ असलेल्या शेतकऱ्यांनी ओनर हा पर्याय निवडायचा आहे तर सामायिक क्षेत्र असल्यास शेअर क्रॉपर हा पर्याय निवडायचा आहे.
- त्यानंतर रेसिडेन्शिअल डिटेल्स मध्ये तुमचे राज्य, जिल्हा, तालुका आणि गाव इत्यादी सर्व माहिती निवडायची आहे.
- हे झाल्यानंतर खाली असलेल्या फार्मर आयडी या पर्यायांमध्ये खाता नंबर टाकून ( खाते नंबर हा तुम्हाला तुमच्या आठ अ उताऱ्यावर पहायला मिळणार आहे, सातबारावर देखील तुम्ही पाहू शकता).
- यानंतर खाली गेल्यानंतर बँक अकाउंट ची सर्व माहिती शेतकऱ्यांनी भरायची आहे ज्यामध्ये आयएफएससी कोड, बँकेचे नाव, ब्रांच नाव आणि खाते नंबर देखील टाकायचा आहे सर्व माहिती व्यवस्थित भरल्यानंतर क्रियेट यूजर हा खाली असलेला पर्याय निवडून शेतकऱ्यांनी लॉगिन करून घ्यायचे आहे.
- यानंतर नेक्स्ट वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुम्ही भरलेली बँक डिटेल्स सर्व दिसणार आहेत ती तुम्ही तपासून खाली असलेल्या नेक्स्ट या पर्यायावर क्लिक करायचे आहे.
- यामध्ये आता तुम्हाला तुमच्या शेतीची माहिती भरावी लागणार आहे आणि त्यामुळे तुमची शेती ज्या राज्यात आहे ते राज्य निवडायचे आहे नंतर पुढील पर्यायांमध्ये तुम्हाला प्रधानमंत्री फसल बीमा योजना निवडायची आहे.
- सीझनमध्ये तुम्हाला खरीप हा पर्याय निवडायचा आहे आणि वर्षांमध्ये 2024 ला निवडायचे आहे.
- यानंतर तुम्हाला तुम्ही भरलेली जमिनीची माहिती दिसणार आहे आणि माहिती न दिसल्यास तुम्ही पुन्हा एकदा ही माहिती भरू शकता.pik vima form 2024 maharashtra
हेही महत्वाचे :
राज्यातील या शेतकऱ्यांना मिळणार एकाच दिवशी ४००० रुपये पहा यादी
पीएम किसान योजना १७वा हफ्ता लाभार्थी यादी पाहण्यासाठी क्लिक करा
पिकांची माहिती भरण्याची प्रक्रिया :
- पिकांची माहिती भरताना तुम्हाला सुरुवातीला मिक्स क्रॉपिंग या पर्याय निवडायचा आहे मिश्र शेती जर तुम्ही केली नसल्यास तुम्ही नो देखील म्हणू शकता.
- त्यानंतर तुम्हाला खाली उपलब्ध असलेल्या यादीमधून तुमच्या पिकाचे नाव निवडायचे आहे यामध्ये भुईमूग, बाजरी असे दोन्ही पर्याय निवडू शकणार आहात.
- यानंतर डिफाइन रेशिओ बघण्यासाठी तुम्हाला किती क्षेत्रांमध्ये तुम्ही लागवड केली आहे ते क्षेत्र खाली दिलेल्या एक्सेल फाईल मध्ये टाकायचे आहे याची लिंक तुम्हाला खाली देण्यात आली आहे.
- यानंतर शेतकऱ्यांना आवश्यक असलेले कागदपत्र जोडायचे आहेत यामध्ये सर्वात प्रथम बँक पासबुक अपलोड करायचे आहे नंतर लँड रेकॉर्ड मध्ये तुम्हाला तुमच्या सातबारा आणि आठ उतारा अपलोड करायचा आहे.
- यानंतर सोयिंग रेकॉर्ड म्हणजेच स्वयंघोषणापत्र मध्ये तुम्हाला खाली देण्यात आलेली पिक पेराची फाईल डाऊनलोड करून त्यामध्ये माहिती भरायचे आहे प्रिंट काढून त्याला स्कॅन करून अपलोड करायचे आहे आणि अशा पद्धतीने तुम्ही तुमचा अर्ज सबमिट करू शकणार आहात.Pik Vima Form Kasa Bharava
Pik Vima Form Last Date
पिक विमा योजनेसाठी अंतिम मुदत अद्याप जाहीर करण्यात आली नाही परंतु या योजनेसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी लवकरात लवकर स्वतःच्या मोबाईलवर किंवा कम्प्युटरवर केवळ 01 रुपयांमध्ये आपल्या खरीप पिकाचा पिक विमा भरू शकणार आहात. स्वतः जमत नसल्यास तुम्ही तुमच्या जवळील सीएससी सेंटर किंवा आपले सरकार सेवा केंद्र मध्ये जाऊन देखील हे अर्ज सबमिट करू शकणार आहात.
पिक विमा केव्हा मिळतो –
पिक विमा हा नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना त्या पिकाची नुकसान भरपाई दिली जाते यामध्ये पीक पेरणी पासून काढणी पर्यंतच्या कालावधीमध्ये दुष्काळ,वीज पडणे,चक्रीवादळ,पूर,कीड व रोग यांसारख्या बाबींमुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर होणारे परिणाम तसेच स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना त्यांच्या पिकाची नुकसान भरपाई दिले जाते.Pik Vima Form Kasa Bharava
पिक विमा अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
पिक विमा योजना अधिकृत शासननिर्णय पहा | येथे क्लिक करा |
पिक विमा रेशिओ फाईल डाउनलोड करण्यासाठी | येथे क्लिक करा |
पिक पेरा स्वयंघोषणा पत्र डाऊनलोड करण्यासाठी | येथे क्लिक करा |
सामाईक क्षेत्र असल्यास स्वयंघोषणा पत्र | येथे क्लिक करा |
या योजनेच्या अधिकच्या माहितीसाठी | येथे क्लिक करा |
Whatsapp Group जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा |