Namo Shetkari 4th Installment राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर येत आहे महाराष्ट्र राज्यातील सुमारे 01 कोटी शेतकऱ्यांना नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत चौथा हप्ता वितरित करण्यात आला आहे आणि यामुळेच ऐन खरीप हंगामात राज्यातील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर या हप्त्यामुळे फायदा होणार आहे.राज्य सरकारच्या वतीने शेतकऱ्यांना हा अचानक सुखद धक्का देण्यात आला आहे.
आज दिनांक २१ ऑगस्ट २०२४ रोजी परळी येथे कृषी विषयक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता आणि या कार्यक्रमाला राज्याचे मुख्यमंत्री,दोन्ही उपमुख्यमंत्री तसेच केंद्रीय कृषिमंत्री आणि राज्याचे कृषिमंत्री देखील उपस्थित होते आणि या सर्वांच्या उपस्थितीत आजच शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर नमो शेतकरी योजनेचा चौथा हफ्ता जमा करण्यात आला आहे.याबद्दलची सविस्तर माहिती तुम्हाला खाली देण्यात आली आहे.
Namo Shetkari Yojana Maharashtra 2024 :
राज्यभरातील शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य देण्यासाठी केंद्र सरकारच्या पीएम किसान सन्मान योजनेची संलग्न असलेली नमो शेतकरी महासंघ निधी योजनेची घोषणा केली आणि या योजनेची 2023 यावर्षीपासून अंमलबजावणी देखील करण्यात आली. योजनेअंतर्गत पीएम किसान सन्मान योजनेप्रमाणेच केवळ महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांसाठी नमो शेतकरी योजनेद्वारे 6000 रुपये देण्यास सुरुवात झाली आणि या योजनेचे आता ४ हफ्ते राज्यातील शेतकऱ्यांना जमा करण्यात आले आहेत.
योजना नाव | नमो शेतकरी महासन्मान योजना महाराष्ट्र |
लाभार्थी शेतकरी संख्या | 01 कोटी शेतकरी |
एकूण वितरीत निधी | 2063 कोटी |
४था हफ्ता वितरण तारीख | 21 ऑगस्ट २०२४ |
योजना विभाग | कृषी व महसूल विभाग |
नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर लाभार्थी यादी पाहता येत नसल्याने अनेक शेतकऱ्यांना लाभार्थी यादी बद्दल विविध प्रश्न पडतात परंतु शेतकऱ्यांना तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो की पी एम किसान सन्मान योजनेची लाभार्थी यादी नमो शेतकरी योजनेसाठी ग्राह्य धरले जात असल्याने तुम्हाला काळजी करण्याची कोणतीही आवश्यकता नसणार आहे. याची लाभार्थी यादी पाहण्यासाठी तुम्ही पीएम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊ शकता या वेबसाईटवरून तुम्ही बेनेफिशरी लिस्ट हा पर्याय निवडून त्यामध्ये तुमचा जिल्हा तसेच तुमचा तालुका आणि गावाचे नाव निवडून तुम्ही सर्व लाभार्थी यादी सहज पाहू शकणार आहात.Namo Shetkari 4th Installment
Namo Shetkari 4th Installment Beneficiery List :
नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर अचानक वितरित करून शेतकऱ्यांना हा राज्य सरकारच्या वतीने एक सुखद धक्का दिला आहे. आणि यामुळे राज्यभरातील शेतकरी आता आनंदी असल्याचे पाहायला मिळत आहे. शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर 2000 रुपये जमा होण्यास आता सुरुवात झाली आहे आणि उद्यापर्यंत या योजनेमध्ये पात्र असलेल्या सर्व शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरील रक्कम जमा केली जाणार आहे.
नमो शेतकरी योजनेचा लाभार्थी स्टेटस पाहण्यासाठी तुम्हाला नमो शेतकरी योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जायचं आहे आणि त्या ठिकाणी लॉगिन करून तुमचा स्टेटस ओपन झाल्यानंतर तुमच्या कोणत्या बँक खात्यामध्ये हे पैसे जमा झालेत आणि याबद्दलची सर्व सविस्तर माहिती तुम्ही पाहू शकणार आहात.
Namo Shetkari 4th Installment Date 2024 :
नमो शेतकरी योजनेचा चौथ्या हप्ता च्या वितरणाबद्दल कालच राज्य सरकारच्या अधिकृत वेबसाईटवर शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आला होता आणि त्यानुसार या योजनेचा निधी वितरित करण्यासाठी प्रशासकीय मान्यता कालच देण्यात आली होती परंतु त्यावरून येत्या काही दिवसांमध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरील रक्कम जमा केली जाईल असे बोलले जात होते.
आज परळीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय कृषिमंत्री शिवराज चव्हाण, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार त्यासोबतच कृषी मंत्री धनंजय मुंडे आणि इतर सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये कार्यक्रम आयोजित केला होता आणि या कार्यक्रमांमध्ये बोलत असतानाच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घोषणा करून योजनेचा चौथा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर वितरित करण्यात येणार असल्याचे सांगितले.
आणि त्यामुळे हा शेतकऱ्यांना एक सुखद धक्का म्हणावा लागेल. आणि आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर देखील ही रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे तुम्ही अजूनही या योजनेचा अर्ज केला नसल्यास लवकरात लवकर या योजनेसाठी तुमचा अर्ज करायचा आहे जेणेकरून तुम्हाला हा लाभ मिळणार आहे
📃योजनेची लाभार्थी यादी पाहण्यासाठी | येथे क्लिक करा |
💻बेनिफिशरी स्टेटस पाहण्यासाठी | येथे क्लिक करा |
🟢योजना ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा |
⏺️Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा |