लाडकी बहिण योजना या महिलांना मिळणार 4500 रुपये मुख्यमंत्र्यांची घोषणा | Ladaki Bahin Yojana Website

Ladaki Bahin Yojana Website लाडकी बहीण योजनेसाठी आता काही महिलांच्या बँक खात्यावर एकाच दिवशी 4500 रुपये जमा केले जाणार आहेत. योजनेच्या पहिल्या आणि दुसऱ्या हप्त्यासाठी महिलांच्या बँक खात्यावर 3000 रुपये आता पैसे देखील जमा होण्यास सुरुवात झाली असून रक्षाबंधनापूर्वी बँक खात्यामध्ये थेट रक्कम जमा झाल्याने राज्यभरातील महिलांच्या वतीने आनंदाचे वातावरण आणि त्यासोबतच सरकारचे आभार मानले जात आहेत.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

आणि यामध्येच आता मुख्यमंत्र्यांकडून काही महिलांच्या बँक खात्यावर थेट 4500 रुपये जमा केले जाणार असल्याची घोषणा करण्यात आल्यामुळे हा आनंद द्विगुणीत झालेला आहे आता कोणत्या महिलांना हे पैसे मिळणार याबाबतची आणि इतर सर्व सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे.

लाडकी बहिण योजना लाभार्थी यादी महाराष्ट्र :

लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी यादी बद्दल बोलायचे झाल्यास या योजनेसाठी जुलै महिन्यात अर्ज करण्यास सुरुवात झाली आणि त्यानंतर सर्व महिलांनी मोबाईल ॲप्लिकेशन मधून अथवा अंगणवाडी सेविकांद्वारे ऑफलाइन पद्धतीने अर्ज केले. जुलै महिन्यात केलेल्या अर्जांची छाननी ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्येच सुरू करण्यात आली आणि त्यानुसार महिलांना मेसेज द्वारे अथवा एप्लीकेशन मध्ये त्यांचे अर्ज स्वीकारले अथवा रिजेक्ट केल्याचे सांगण्यात आले.

ज्या महिलांचे अर्ज रिजेक्ट झाले होते अशा सर्व महिलांना अर्ज पुन्हा एकदा एडिट करण्यासाठी पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आणि त्यामुळे अर्ज करताना झालेल्या चुका सुधारून अशा महिलांनी पुन्हा एकदा आपला अर्ज केला आणि त्यामुळे यादेखील महिलांना आता योजनेचे पैसे जमा होणार आहेत.

17 ऑगस्ट पर्यंत या योजनेचा पहिला आणि दुसरा हप्ता असे मिळून तीन हजार रुपये महिलांच्या बँक खात्यावर जमा होणार आहेत. आता हे पैसे कोणाला मिळणार याबद्दल बोलायचे झाल्यास ज्या महिलांचे अर्ज 31 जुलै पर्यंत सबमिट झाले होते आणि ज्या महिलांच्या अर्जांची छाननी होऊन अर्ज पात्र झाले आहेत आणि ज्या महिलांच्या आधार कार्डला बँक लिंक आहे केवळ त्याच महिलांना हा लाभ देण्यात आलेला आहे.Ladaki Bahin Yojana Website

लाडकी बहिण योजना महाराष्ट्र List 2024 :

लाडकी बहिण योजनेचा पहिला व दुसरा हफ्ता 01 कोटी 03 लाख महिलांना जमा –

लाडकी बहीण योजनेचा पहिला व दुसरा हप्ता राज्यभरातून सुमारे 01 कोटी 03 लाख महिलांच्या बँक खात्यावर 14 ऑगस्ट ते 17 ऑगस्ट 2024 च्या दरम्यान जमा करण्यात आला आहे. लाडकी बहीण योजनेसाठी ऑनलाइन व ऑफलाइन पद्धतीने नोंदणी करून जुलै महिन्यातून सुमारे 01 कोटी 33 लाख महिला योजनेच्या निकषांमध्ये आणि अर्जाच्या छाननी नंतर लाभ घेण्यासाठी पात्र ठरल्या.

२७ लाख महिलांच्या बँक खात्यावर पैसे जमा करण्यात आले नाहीत कारण या महिलांच्या आधार कार्डला बँक खाते लिंक नव्हते आणू त्यामुळेच संपूर्ण राज्यभरातून २७ लाख महिला अर्ज करून आणि छाननी मध्ये पात्र झाले तरीदेखील पैसे जमा करण्यात आले नाहीत.याबद्दल बोलताना सरकार कडून दिलेल्या माहितीनुसारऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात ज्या महिला आपल्या आधार कार्डला बँक खाते लिंक करतील त्यांना हे पैसे दिले जानार आहेत.

Ladaki Bahin Yojana Online Registration :

लाडकी बहीण योजनेचे अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट पर्यंत मुदत देण्यात आली आहे परंतु अनेक महिला अर्ज होत नाही किंवा एप्लीकेशन चालत नाही म्हणून तक्रारी करत असल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे. यासाठी वेबसाईट सुरू करण्यात आली असून वेबसाईट देखील व्यवस्थित चालत नाही आणि त्यामुळे अनेक महिला अर्ज करण्यापासून अद्यापही वंचित आहेत.

17 ऑगस्ट पर्यंत महिलांना एकदा पैसे जमा झाल्यानंतर पुन्हा एकदा एप्लीकेशन व्यवस्थित चालण्याची शक्यता आहे त्यामुळे घाई न करता वाट पाहायची आहे आणि व्यवस्थित रित्या तुमचा अर्ज भरायचा आहे जेणेकरून कोणतीही चूक न होता तुम्हाला योजनेचे पैसे मिळणार आहेत.

लाडकी बहिण योजना या महिलांना मिळणार ४५०० रुपये –

लाडकी बहिण योजनेसाठी ज्या महिला ऑगस्ट महिन्यामध्ये आपला अर्ज करणार आहेत त्यांचे अर्ज सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये स्वीकारले जाणार आहेत आणि त्यानंतर अशा महिलांना जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर असे तीनही महिन्यांचे मिळून एकत्रित पैसे दिले जाणार असल्याने महिलांच्या बँक खात्यावर एकाच दिवशी ४५०० रुपये जमा करण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे आणि त्यामुळेच ही महिलांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे. राज्य सरकारच्या वतीने महिलांनी लवकरात लवकर आपले अर्ज करण्यासाठी आवाहन करण्यात येत आहे.Ladaki Bahin Yojana Website

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
Ladaki Bahin Yojana Website
📃लाडकी बहिण योजना लाभार्थी यादी पाहण्यासाठीयेथे क्लिक करा
💻लाडकी बहिण योजना ऑनलाईन अर्ज करण्यासाठीयेथे क्लिक करा
🟢योजना ग्रुप जॉईन करण्यासाठीयेथे क्लिक करा
Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठीयेथे क्लिक करा