Ladka Bhau Yojana Maharashtra 2024 माझा लाडका भाऊ योजना महाराष्ट्र राज्यात सुरू झाली असून या योजनेसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्जदार अर्ज करू शकणार आहेत या योजनेद्वारे राज्य सरकार सुशिक्षित तरुणांना महिन्याला शैक्षणिक पात्रतेनुसार 6000 रुपये ते 10000 रुपये महिना देणार आहे. योजनेसाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क घेतले जाणार नाही आणि तुम्ही तुमच्या मोबाईलवरून अथवा कम्प्युटर वरून घरबसल्या या योजनेसाठी अर्ज करू शकणार आहात. अर्ज करण्याची सविस्तर प्रक्रिया त्यासोबतच आवश्यक कागदपत्रांची माहिती, पात्रता, शासन निर्णय आणि इतर सर्व सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे.
Ladka Bhau Yojana 2024 :
लाडका भाऊ या योजनेअंतर्गत सुशिक्षित आणि बेरोजगार तरुणांना विद्यावेतन देऊन बेरोजगारी कमी करण्यासाठी राज्य सरकार द्वारे हे प्रशिक्षण सुरू करण्यात आले आहे. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना म्हणजेच माझा लाडका भाऊ योजनेसाठी शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आलेला असून तुम्ही देखील पात्र असल्यास तुम्हाला वेबसाईटवर जाऊन तुमची नोंदणी करणे आवश्यक असणार आहे. यामध्ये महाराष्ट्र राज्यातील तरुणांनाच या योजनेचा फायदा घेता येणार आहे.
शैक्षणिक पात्रता | मिळणारा लाभ |
12वी पास | ६००० रुपये |
आयटीआय/डिप्लोमा पास | ८००० रुपये |
पदवीधर | १०००० रुपये |
लाडक्या बहिणी नंतर माझा लाडका भाऊ ही योजना राज्य सरकार द्वारे सुरू केल्याने तरुणांकडून देखील या योजनेचे मोठ्या प्रमाणावर स्वागत केले जात आहे तसेच कागदपत्र घेऊन तुम्हाला कुठे देखील जाण्याची आवश्यकता नसणार आहे फक्त तुम्हाला पोर्टल किंवा वेबसाईटवर जाऊन तुमची सर्व माहिती भरावी लागणार आहे आणि त्या ठिकाणी विचारण्यात आलेली आवश्यक कागदपत्रे तुम्ही व्यवस्थितरित्या अपलोड केल्यानंतर तुम्हाला या योजनेचा थेट लाभ घेता येणार आहे.Ladka Bhau Yojana Maharashtra 2024
Ladka Bhau Yojana 2024 Maharashtra Qualifications :
- लाडका भाऊ योजनेच्या पात्रतेबद्दल बोलायचे झाल्यास यामध्ये अर्जदार उमेदवाराचे शिक्षण बारावी पास, आयटीआय पास, डिप्लोमा तसेच विविध क्षेत्रातून पदवीधर असलेले उमेदवार देखील या योजने साठी अर्ज करू शकणार आहेत
- अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणे अनिवार्य आहे.
- अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे वय हे 18 ते 35 वर्षे वयोगटातील असावे.
योजनेमध्ये जास्तीत जास्त तरुणांनी फायदा घेण्यासाठी अटी घातल्या गेल्या नाहीत आणि त्यामुळेच तुम्ही देखील या प्रशिक्षण योजनेचा लाभ घ्यायचा असल्यास लवकरात लवकर तुमचा अर्ज सबमिट करायचा आहे.
Ladka Bhau Yojana 2024 Maharashtra Documents List :
पात्रतेप्रमाणेच योजनेचा अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडून जास्त कागदपत्र देखील घेतले जाणार नाहीत कागदपत्रांच्या यादी बद्दल बोलायचे झाल्यास खालील सर्व कागदपत्रे तुम्हाला अपलोड करावी लागणार आहेत.
- अर्जदाराचे आधार कार्ड
- अर्जदाराचे पासपोर्ट साईज फोटो
- आधार कार्ड ला लिंक असलेल्या बँकेचे पासबुक
- शैक्षणिक पात्रतेसाठी गुणपत्रिका देखील अपलोड करावी लागेल
- अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे चालू मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी असावा.
Ladka Bhau Yojana 2024 Maharashtra Online Apply :
- योजनेचा अर्ज करण्यासाठी तुम्हाला खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करायचे आहे त्यानंतर तुम्हाला महास्वयमचे पोर्टल ओपन होणार आहे.
- या पोर्टल वर गेल्यानंतर तुम्हाला न्यू रजिस्ट्रेशन वर क्लिक करून तुमचे रजिस्ट्रेशन पूर्ण करून घ्यायचे आहे.
- यामध्ये तुम्हाला तुमचे नाव, ई-मेल आयडी, मोबाईल नंबर इत्यादी माहिती द्यावी लागणार आहे.
- नोंदणी पूर्ण झाल्यानंतर क्लिक करून योजनेसाठी ओपन झालेला फॉर्म सविस्तर भरायचा आहे.
- यानंतर तुम्हाला तुमची शैक्षणिक माहिती सविस्तर भरायची आहे.
- सर्व माहिती भरल्यानंतर तुम्हाला सबमिट करा या बटणावर क्लिक करून तुमचा अर्ज सबमिट करून द्यायचा आहे.
- आणि अशा पद्धतीने तुम्हाला सबमिट केल्यानंतर एक रेसिप्ट आणि नंबर मिळणार आहे तो तुम्ही तुमच्याकडे ठेवून घ्यायचा आहे.
लाडका भाऊ योजना अर्ज करण्यासाठी | येथे क्लिक करा |
लाडका भाऊ योजना GR पाहण्यासाठी | येथे क्लिक करा |
महाराष्ट्र योजना माहिती घेण्यासाठी | येथे क्लिक करा |
योजना ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा |
Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा |
FAQ (सतत विचारले जाणारे प्रश्न)
Q : माझा लाडका भाऊ योजना अर्ज करण्यासाठी शुल्क लागणारे का ?
A – लाडका भाऊ योजना अर्ज करण्यासाठी शुल्क लागणार नाही.
Q : माझा लाडका भाऊ योजना 10वी पास साठी असणार आहे का ?
A – लाडका भाऊ योजना अर्ज करण्यासाठी उमेदवार किमान 12वी पास असणे आवश्यक आहे.
Q : लाडका भाऊ योजनेसाठी ऑफलाईन अर्ज करता येणारेत का ?
A – लाडका भाऊ योजनेसाठी फक्त ऑनलाईनच अर्ज करता येणार आहेत.