लाडका भाऊ योजना अर्जप्रक्रिया सुरु 12वी पास साठी मिळणार 10 हजार महिना | Ladka Bhau Yojana Online Apply

Ladka Bhau Yojana Online Apply महाराष्ट्र सरकारच्या लाडक्या बहिणी योजनेनंतर आता भावांसाठी देखील माझा लाडका भाऊ या योजनेची घोषणा करण्यात आली असून या योजनेचा अधिकृत शासन निर्णय देखील प्रसिद्ध करण्यात आला आहे आणि या योजनेसाठी आता उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज देखील स्वीकारले जात आहे. यासाठी तुम्ही तुमचे मोबाईल वरून अथवा कम्प्युटर वरून घरबसल्या अर्ज करू शकणार आहेत आणि तुम्हाला महिन्याला 6000 रुपयांपासून 10000 रुपये मिळणार आहे. या योजनेची सविस्तर माहिती, अर्ज करण्याची प्रक्रिया, आवश्यक असणारी पात्रता याबद्दल सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे.

लाडका भाऊ योजना महाराष्ट्र सविस्तर जाहिरात :

राज्याच्या सुरू असलेल्या अधिवेशनामध्ये अनेक घटकांना विविध योजना जाहीर केल्या गेल्या यामधीलच सर्वाधिक बजेट असलेली योजना आणि ज्या योजनेला सर्वत्र मोठ्या प्रमाणात स्वीकारले गेले ती योजना म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि या योजनेमुळे राज्यातील सर्व महिलांना महिन्याला १५०० रुपये देणार असल्याचे सांगितले गेले आणि या योजनेचे देखील ऑनलाइन पद्धतीने अर्ज सध्या सुरू आहे.

योजना नावमुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना
लाभार्थी12वी पास | डिप्लोमा | पदवीधर
अर्ज प्रक्रियाऑनलाईन
मिळणारा लाभRs.6000-10000 महिना

लाडक्या बहिणी नंतर आता लाडक्या भावांसाठी माझा लाडका भाऊ योजना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे द्वारे आज आषाढी एकादशीच्या दिवशी घोषित करण्यात आली आणि या योजनेसाठी देखील आता सर्व पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारले जात आहेत. यामध्ये अर्ज करण्यासाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क घेतली जात नाही आणि तुम्ही तुमच्या मोबाईल वरून अथवा कम्प्युटर वरून घरबसल्या योजनेसाठी अर्ज करू शकणार आहात. या योजनेचा अधिकृत शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभाग यांच्याद्वारे प्रकाशित करण्यात आलेला आहे.

Ladka Bhau Yojana Maharashtra in Marathi :

लाडका भाऊ योजना महाराष्ट्र राज्यात अखेर राबविण्यात आली असून या योजनेसाठी तुम्ही किमान 12वी पास असणे आवश्यक असणार आहे.डिप्लोमा पास तसेच पदवीधर उमेदवार देखील या योजनेचा लाभ घेऊ शकणार आहेत.आणि यामध्ये महिन्याला वेतन दिले जाणार आहे.यासाठी तुम्ही लवकरात लवकर तुमचे अर्ज करणे आवश्यक आहे.राज्य सरकार द्वारे या योजनेसाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना असे नाव देण्यात आलेले आहे.

शासन निर्णयांमध्ये नमूद केल्याप्रमाणे यामध्ये युवक वर्ग शिक्षण पूर्ण पुरंदर वर्षी मोठ्या संख्येने नोकरी अथवा व्यवसाय यांच्या शोधात बाहेर पडत आहे परंतु युवकांना व्यवसाय व नोकरी संबंधित अनुभवाचा अभाव असल्याने व्यवसाय किंवा नोकरी प्राप्त करण्यामध्ये अडचणींना सामोरे जावे लागल्याचे दिसून येत आहे आणि याच समस्येमुळे युवक वर्गामध्ये बेरोजगारीचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढत आहे.Ladka Bhau Yojana Online Apply

👉महाराष्ट्र राज्यातील सर्व योजना पाहण्यासाठी – क्लिक करा

बारावी पास आणि आयटीआय यामध्ये जास्त प्रमाणात तसेच पदवीधर उमेदवारांना देखील नोकरी अभावी करावे लागत आहे आणि म्हणूनच अशा उमेदवारांना राज्यातील अनेक उद्योग क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर रोजगार संधी सरकार उपलब्ध करून देत आहे तरी देखील बेरोजगारीचे प्रमाण कमी होत नसल्याने राज्य सरकार द्वारे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना सुरू करण्यात आली आहे.

Ladka Bhau Yojana Maharashtra 2024 Apply Online :

योजना स्वरूप –

योजनेच्या स्वरूपाबद्दल बोलायचे झाल्यास यामध्ये महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य,रोजगार,उद्योजकता व नावीन्यता विभाग आणि मुख्यमंत्री जलकल्याण कक्ष यांच्यामार्फत ही योजना राबवली जाणार आहे आणि या उपक्रमा अंतर्गत विभागाच्या संकेतस्थळावर आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे ज्यामध्ये उमेदवाराची नोंदणी आस्थापनांची नोंदणी तसेच कार्य प्रशिक्षण व्यवसाय नोंदणी प्रशिक्षण रुजू व समाप्ती अहवाल अनुभव प्रमाणपत्र इत्यादी बाबी ऑनलाईन पद्धतीने करण्यात येणार आहेत आणि यासाठी आवश्यक सुविधा निर्माण करण्याची जबाबदारी आयुक्त कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विभाग यांची राहणार आहे.

योजनेचा अर्ज करण्यासाठी उमेदवार किमान बारावी पास असणे आवश्यक असणार आहे यासोबतच विविध ट्रेड मधून आयटीआय केलेले उमेदवार,डिप्लोमा पास उमेदवार तसेच पदविका पदवी आणि त्यासोबत पदवीधर शैक्षणिक पात्रता धारण केलेले रोजगार देखील यामध्ये उपलब्ध असल्याने सर्व इच्छुक उमेदवार अर्ज करू शकणार आहेत.

लाडका भाऊ योजना मिळणारा लाभ –

  • 12वी पास उमेदवारांना महिना ६००० रुपये
  • डिप्लोमा/आयटीआय पास उमेदवारांना महिना ८००० रुपये
  • पदवीधर उमेदवारांना महिना १०००० रुपये

योजनेच्या उद्देशाबद्दल बोलताना संबंधित विभागाकडून सांगण्यात आले आहे की या योजनेद्वारे राज्यातील तरुणांचे तांत्रिक आणि व्यावहारिक कार्य कौशल्य वाढवण्याच्या दिशेने पाऊल टाकण्यात आले आहे आणि यामुळेच तुम्ही देखील योजनेसाठी तुमचा अर्ज केला असल्यास तुमच्या ०६ महिन्याच्या प्रशिक्षणासाठी तुम्हाला सरकार द्वारे सदरील वेतनश्रेणी दिली जाणार आहे आणि याचा तुम्हाला चांगला लाभ होणार आहे.

लाडका भाऊ योजना आवश्यक पात्रता –

  • उमेदवार हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा.
  • लाभ घेणाऱ्या उमेदवाराचे वय किमान 18 व कमाल 35 वर्षे असावे.
  • उमेदवाराची किमान शैक्षणिक पात्रता बारावी पास,आयटीआय,डिप्लोमा पास अथवा पदवीधर असावे.
  • उमेदवाराकडे आधार कार्ड असणे आवश्यक आहे.
  • उमेदवाराचे बँक खाते आधार कार्डशी लिंक केलेले असावे.
  • उमेदवाराने कौशल्य रोजगार व उद्योजकता आयुक्तालयाच्या संकेतस्थळावर नोंदणी करून रोजगार नोंदणी क्रमांक देखील प्राप्त केलेला असणे आवश्यक आहे.Ladka Bhau Yojana Online Apply
Ladka Bhau Yojana Online Apply
Ladka Bhau Yojana Online Apply
लाडका भाऊ योजना GR पाहण्यासाठीयेथे क्लिक करा
लाडका भाऊ योजना अर्ज करण्यासाठीयेथे क्लिक करा
महाराष्ट्र योजना माहिती घेण्यासाठीयेथे क्लिक करा
योजना ग्रुप जॉईन करण्यासाठीयेथे क्लिक करा
Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठीयेथे क्लिक करा
Ladka Bhau Yojana Documents :

लाडका भाऊ योजना आवश्यक कागदपत्रे – लाडका भाऊ योजना या योजनेसाठी खालील कागदपत्रे आवश्यक असणार आहे.

  • लाभ घेणाऱ्या अथवा अर्ज करणाऱ्या व्यक्तीचे आधार कार्ड.
  • अर्ज करणाऱ्या व्यक्तीचे रहिवासी प्रमाणपत्र अथवा डोमासाईल.
  • शाळा सोडल्याचा दाखला.
  • उमेदवाराचे शैक्षणिक पात्रता साठी आवश्यक असणारे कागदपत्र.
  • अर्ज करणाऱ्या व्यक्तीचा पासपोर्ट साईज फोटो.
  • मागासवर्गीय असल्यास संबंधित प्रमाणपत्र देखील असणे आवश्यक आहे.

लाडका भाऊ योजना अर्जप्रक्रिया –

  • या योजनेचा अर्ज करण्यासाठी सर्व उमेदवारांनी महास्वयम याच्या अधिकृत वेबसाईटवर जायचे आहे.
  • अर्ज करण्यासाठी ची लिंक तुम्हाला वरती देखील देण्यात आलेली आहे.
  • लिंक वर जाऊन त्या ठिकाणी तुम्हाला विचारण्यात आलेली सर्व माहिती तुम्ही व्यवस्थित भरायची आहे.
  • सुरुवातीला यामध्ये तुम्हाला तुमचे अकाउंट तयार करण्यासाठी बेसिक सर्व माहिती द्यायची आहे.
  • पत्ता, शैक्षणिक पात्रता याबद्दल देखील सविस्तर माहिती तुम्ही यामध्ये भरायची आहे.
  • विचारण्यात आलेली सर्व कागदपत्रे व्यवस्थित रित्या अपलोड देखील तुम्हाला या ठिकाणी करावी लागणार आहे.
  • कागदपत्र अपलोड झाल्यानंतर तुमचे अर्ज सबमिट करून घेतले जाणार आहेत.
  • अर्ज करण्यासाठी कोणत्याही प्रकारची शुल्क आवश्यक नाही.Ladka Bhau Yojana Online Apply