Bank of Maharashtra Bharti Pune 2024 बँक ऑफ महाराष्ट्र यांच्या मुख्य शाखा असलेल्या पुणे मध्ये विविध पदांसाठी नोकरीच्या संधी उपलब्ध झाल्या असून या भरतीसाठी सर्व पात्र व इच्छुक उमेदवारांकडून ऑफलाइन पद्धतीने अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू झाली असून या भरती अंतर्गत एकूण 195 जागांसाठी उमेदवारांची निवड केली जाणार आहे. मित्रांनो तुम्ही देखील या भरतीचा अर्ज करण्यासाठी पात्र व इच्छुक असल्यास तुम्ही आजच तुमचा नमुना अर्ज, त्यासोबत सर्व आवश्यक कागदपत्र खाली दिलेल्या पत्त्यावर पाठवणे अनिवार्य आहे.
सदरील अर्ज पाठवण्यासाठी उमेदवारांकडे 10 जुलै 2024 पासून २६ जुलै 2024 पर्यंत मुदत देण्यात आलेली आहे आणि अंतिम मुदत संपल्यानंतर या भरतीसाठी कोणत्याही प्रकारचे अर्ज स्वीकारले जाणार नसल्याची माहिती जाहिरातीमध्ये नमूद करण्यात आली आहे. त्यामुळेच तुम्ही लवकरात लवकर तुमचे अर्ज पाठवायचे आहेत आणि या भरतीची अधिकृत जाहिरात, आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, शुल्क याबद्दल सविस्तर माहिती खाली देण्यात आलेली आहे.
Bank Of Maharashtra Bharti 2024 Notification :
बँक ऑफ महाराष्ट्र या राज्याच्या सरकारी बँक अंतर्गत उमेदवारांना सरकारी नोकरीच्या सुवर्णसंधी उपलब्ध झालेल्या आहेत या भरती अंतर्गत विविध उपलब्ध पदांसाठी उमेदवारांकडून अर्ज स्वीकारले जात आहेत. यामध्ये उपलब्ध पदाबद्दल बोलायचे झाल्यास डेप्युटी जनरल मॅनेजर, असिस्टंट जनरल मॅनेजर, चीफ मॅनेजर, सीनियर मॅनेजर, मॅनेजर, बिझनेस डेव्हलपमेंट ऑफिसर यांसारख्या विविध पदांसाठी उमेदवारांची निवड केली जाणार आहे.
Bank Of Maharashtra released a notification for recruitement of various posts.To apply for this post candidates needs to submit their application offline.There are total 795 vacant posts for which candidates will get selected.The last date for registration is 26 July 2024 and hence all interested candidates must submit their application before the last date.Official advertisement,Link for application,website,criteria and all details given below.
बँक ऑफ महाराष्ट्र यांच्या अधिकृत वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आलेल्या या अधिसूचनेनुसार यामध्ये सर्व उमेदवारांकडून केवळ ऑफ लाईन पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार आहेत आणि ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची प्रणाली उपलब्ध करून देण्यात आलेली नाही. उमेदवारांचे अर्ज स्वीकारल्यानंतर त्याची संपूर्ण छाननी केली जाणार आहे आणि त्यानंतर पोलीस प्रक्रिया घेतली जाणार आहे. भरती संदर्भातील सर्व अधिकार संस्थेकडे असणार आहेत.
👉दररोज नवनवीन जॉब अपडेट्स पाहण्यासाठी – इथे क्लिक करा
Bank Of Maharashtra Bharti Pune 2024 Posts & Educational Qualification :
पदाचे नाव व शैक्षणिक पात्रता –
- डेप्युटी जनरल मॅनेजर – या पदाचा अर्ज करण्यासाठी उमेदवार वित्त, अर्थशास्त्र अथवा व्यवसाय प्रशासन मधून पदव्युत्तर पदवीधर असावा. उमेदवाराकडे ग्लोबल असोसिएशन ऑफ रिस्क प्रोफेशनल कडून आर्थिक जोखीम व्यवस्थापनातील व्यावसायिक प्रमाणपत्रे किंवा PRIMA या संस्थेकडून व्यावसायिक जोखीम व्यवस्थापन प्रमाणपत्र असावे आणि सोबतच संबंधित क्षेत्रातील 12 वर्षांचा अनुभव असावा.
- असिस्टंट जनरल मॅनेजर – या पदाचा अर्ज करण्यासाठी उमेदवार अर्थशास्त्र, वित्त किंवा व्यवसाय प्रशासन यातून पदव्युत्तर पदवीधर (CA/CFM/CFA/B.Tech,BE Computer Science,IT/CTP,MCA,MBA,ICSI) पदवीधर असावा आणि सोबत उमेदवाराकडे संबंधित क्षेत्रातील 10 वर्षांचा अनुभव असावा.
- सीनियर मॅनेजर या पदाचा अर्ज करण्यासाठी उमेदवार पदवीधर सोबतच ग्लोबल असोसिएशन ऑफ रिस्क प्रोफेशनल कडून आर्थिक जोखीम पनातील व्यावसायिक प्रमाणन. फायनान्स/ इंटरनॅशनल बिझनेस मधील स्पेशल सह पदवीधर पदवीधर उमेदवार किंवा कम्प्युटर सायन्स माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातून अभियंता पदवीधर आणि सोबत संबंधित क्षेत्रातील 10 वर्षांचा अनुभव.
- चीफ मॅनेजर या पदाचा अर्ज करण्यासाठी उमेदवार पदवीधर असावा सोबत ग्लोबल असोसिएशन ऑफ रिस्क प्रोफेशनल कडून आर्थिक जोखीम व्यवस्थापनातील व्यावसायिक प्रमाणपत्र/PRIMA संस्थेकडून व्यवसायिक जोखीम व्यवस्थापन प्रमाणपत्र किंवा फायनान्स अथवा इंटरनॅशनल बिझनेस मध्ये स्पेशल सह पदवीत्तर पदवी त असावी किंवा B.Tech,B.E (CS/IT) आणि सोबत 03 वर्षांचा अनुभव असावा.
- मॅनेजर या पदाचा अर्ज करण्यासाठी उमेदवार 60% गुणांसह पदवीधर असावा सोबत उमेदवाराने रिस्क मॅनेजमेंट डिप्लोमा/ परकीय चलन/ व्यापार वित्त मध्ये 02 वर्षांचा अनुभव असावा.
- बिझनेस डेव्हलपमेंट ऑफिसर या पदाचा अर्ज करण्यासाठी उमेदवार 60% गुणांसह पदवीधर असावा उमेदवाराकडे MBA (Marketing) झालेले असावे सोबत संबंधित क्षेत्रातील 03 वर्षांचा अनुभव असावा.
टीप – शैक्षणिक पात्रता बद्दल सविस्तर माहिती पाहण्यासाठी उमेदवारांनी अधिकृत जाहिरात पहायची आहे.
Bank Of Maharashtra Bharti Pune 2024 Age Limit :
वयोमर्यादा – 30 जून २०२४ रोजी (OBC : 03 वर्ष सूट SC/ST : 05 वर्ष सूट)
- डेप्युटी जनरल मॅनेजर 50 वर्षापर्यंत
- असिस्टंट जनरल मॅनेजर 45/50 वर्षापर्यंत
- सीनियर मॅनेजर 40 वर्षापर्यंत
- चीफ मॅनेजर 38 वर्षापर्यंत
- मॅनेजर 35 वर्षापर्यंत
- बिझनेस डेव्हलपमेंट ऑफिसर 35 वर्षापर्यंत
नोकरीचे ठिकाण – या भरती मध्ये निवड झाल्यानंतर उमेदवारांना पुणे,मुंबई मध्ये नोकरी मिळणार आहे.
वेतनश्रेणी – पदानुसार (जाहिरात पहा)
Bank Of Maharashtra Bharti Pune 2024 Important Dates & Apply Link :
अर्ज करण्यास सुरुवात – 10 जुलै २०२४
अर्ज करण्याची मुदत – २६ जुलै २०२४
अर्ज करण्याची प्रक्रिया – सदरील भरतीसाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज स्विकारले जाणार आहेत.
अर्ज करण्यासाठी शुल्क –
- खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी : Rs.1180/-
- मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांसाठी Rs.180/-
अर्ज पाठविण्याचा पत्ता – जनरल मॅनेजर बँक ऑफ महाराष्ट्र, एच आर एम डिपार्टमेंट, हेड ऑफिस, लोकमंगल १५०१, शिवाजीनगर, पुणे 411 005
सदरील भरतीची निवड प्रक्रिया – या भरतीमध्ये उमेदवारांची निवड परीक्षेद्वारे आणि मुलाखतीद्वारे केली जाणार आहे.
भरती अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी | येथे क्लिक करा |
नमुना अर्ज डाऊनलोड करण्यासाठी | येथे क्लिक करा |
महाराष्ट्र चालू नोकरभरती जाहिराती पाहण्यासाठी | येथे क्लिक करा |
नोकरी ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा |
Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा |
अर्ज करण्यासाठी महत्वाच्या सूचना –
अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी अर्जाची प्रिंट काढून त्यामध्ये सर्व माहिती सविस्तर भरून वरती दिलेल्या पत्त्यावर अंतिम मुदत संपण्याआधी पाठवायचे आहे.
अर्जांची छाननी करून पात्र ठरलेल्या अर्जांना नंतर परीक्षा देण्यात येणार आहे.
परीक्षा झाल्यानंतर उमेदवारांची मुलाखत देखील घेतली जाऊ शकते आणि त्यानंतर अंतिम निवड केली जाणार आहे.
तुम्ही लवकरात लवकर या भरतीसाठी तुमचे अर्ज पाठवणे आवश्यक आहे.