Ladki Bahin Yojana Hamipatra Pdf Download मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी ऑनलाईन पद्धतीने मोबाईल ॲप्लिकेशन द्वारे अर्ज नोंदणी प्रक्रिया सुरू झाली असून अर्ज करताना अनेक महिलांना एप्लीकेशन मध्ये विविध प्रकारच्या अडचणी येत आहेत आणि त्यामुळेच आपले अर्ज सबमिट होणार का नाही अशी शंका सर्व महिलांच्या मनात उपस्थित झाल्याची परिस्थिती आहे. परंतु यावर घाबरून न जाता खाली दिलेले काम केल्यास तुमचे अर्ज लवकरात लवकर आणि कोणत्याही अडचणी विना सबमिट होणार आहेत याची सविस्तर माहिती देण्यात आली आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना अर्ज प्रक्रिया :
या योजनेसाठी सध्या फक्त मोबाईल ॲप्लिकेशन द्वारे नोंदणी सुरू आहे आणि त्यासाठी तुम्ही तुमच्या जवळील सेतू केंद्र असेल अथवा ग्राम पंचायत किंवा अंगणवाडी सेविकांकडे जाऊन तुमचे अर्ज करू शकणार आहात. परंतु अनेकदा अंगणवाडी सेविकांकडे देखील मोठ्या प्रमाणावर गर्दी पाहायला मिळत आहे आणि त्यासाठीच स्वतः महिला एका मोबाईल ॲप्लिकेशन द्वारे घरबसल्या आपले अर्ज करू शकणार आहेत.
या योजनेचा अर्ज करण्यासाठी सर्व महिलांनी नारीदूत शक्ती या मोबाईल एप्लिकेशन ला डाऊनलोड करून घेयचे आहे.या मोबाईल एप्लीकेशन द्वारे सुरुवातीला तुम्हाला तुमची प्रोफाइल तयार करून किंवा अपडेट करावी लागणार आहे आणि त्यानंतर तुम्हाला उपलब्ध असणारा योजनांसाठी अर्ज करता येणार आहेत. यामधील होम पेजवर तुम्ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना पाहू शकणार आहात आणि या योजनेसाठी अगदी काही मिनिटांमध्ये मोबाईलद्वारे अर्ज करू शकणार आहात. अर्ज करताना येणाऱ्या ज्या काही अडचणी आहेत त्यावर काय करायचे याबाबत देखील माहिती खाली तुम्हाला दिली आहे.
योजनेचे नाव | मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना |
लाभार्थी संख्या | 2.5 कोटी |
अर्ज प्रक्रिया | ऑनलाईन |
अर्ज मुदत | 30 ऑगस्ट २०२४ |
माझी लाडकी बहिण योजना अर्ज करताना येणाऱ्या अडचणी :
अर्ज सबमिट करताना एप्लिकेशन जर चालत नसल्यास यासाठी तुम्ही प्लेस्टोर मध्ये जाऊन एप्लिकेशन Unisntall करून पुन्हा Install करायचे आहे अन्यथा हे चालणार नाही.कारण मित्रांनो यामध्ये एकाच वेळी राज्यभरातील सर्व महिला अर्ज करत असल्याने सर्व्हर डाऊन होत आहेत.
मित्रांनो या योजनेचा अर्ज करण्यासाठी तुमच्याकडे ०२ महिन्यांची मुदत देण्यात आली असल्याने तुम्ही घाई नाही करायची वाट बघून व्यवस्थित अर्ज करायचा आहे.सर्व माहिती नीट असल्यावरच तुमचे अर्ज भरले जाणार आहेत अन्यथा तुमचे अर्ज बाद देखील होण्याची शक्यता आहे.यासाठी तुम्ही तुमच्या जवळील अंगणवाडी सेविकांकडे जाऊन तुमचे अर्ज ऑफलाईन पद्धतीने देखील सबमिट करू शकणार आहात.Ladki Bahin Yojana Hamipatra
माझी लाडकी बहिण योजना हमीपत्र डाऊनलोड Pdf :
योजनेचा अर्ज करण्यासाठी खालील कागदपत्रांची पूर्तता करायची आहे –
- आधार कार्ड
- डोमासाईल दाखला/शाळा सोडल्याचा दाखला/रेशनकार्ड/मतदान कार्ड
- २.५ लाख पेक्षा कमी उत्पन्न दाखला/पिवळे अथवा केशरी रेशनकार्ड
- बँकेचे पासबुक
- अर्जदाराचे सही केलेले हमीपत्र
सर्वात महत्त्वाचे म्हणजे अनेक जण अर्ज करत असताना फोटो अपलोड करताना पासपोर्ट साईज फोटोचा मोबाईल वरून फोटो घेत आहेत आणि सबमिट करत आहेत असे न करता महिलेचा लाईव्ह फोटो तुम्हाला काढायचा आहे अन्यथा तुमचे अर्ज बाद होऊ शकतात याची सर्वांनी महत्त्वाची नोंद घ्यायची आहे.Ladki Bahin Yojana Hamipatra
हमीपत्र डाऊनलोड करण्यासाठी | येथे क्लिक करा |
योजनेचा ऑनलाईन अर्ज प्रक्रिया | येथे क्लिक करा |
योजना सविस्तर पात्रता व अटी GR पहा | येथे क्लिक करा |
माझी लाडकी बहिण योजना सविस्तर माहिती –
लाडकी बहिण योजना या नवीन एप्लिकेशन मधून करा तुमचा अर्ज 10 मिनिटांत | Majhi Ladki Bahin Yojana Form