Mazi Ladki Bahin Yojana Online Form मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी संपूर्ण राज्यभरातून पात्र महिलांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून हे अर्ज करत असताना अनेक महिलांना वेगवेगळ्या अडचणी येत आहेत आणि त्यामुळेच अनेकदा काही चुकीच्या पद्धतीने अर्ज केल्यास तुमचे अर्ज बाद होण्याची देखील शक्यता असणार आहे अर्ज करत असताना कोणती काळजी घ्यायची आहे तसेच कागदपत्र अपलोड करत असताना कशा पद्धतीने कागदपत्रे अपलोड करायची आणि याबद्दलची सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे त्यामुळेच अर्ज करण्यापूर्वी तुम्ही ही माहिती सविस्तर वाचूनच तुमचा अर्ज करायचा आहे.
माझी लाडकी बहिण योजना काय आहे ?
राज्य सरकारच्या सुरू असलेल्या अधिवेशन मध्ये महिलांना बळकट करण्यासाठी तसेच जीवनमान सुधारण्यासाठी, पोषक करण्यासाठी आर्थिक मदत म्हणून राज्यभरातील महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा करण्यात आली आणि या योजनेद्वारे राज्यभरातून सुमारे २.५ कोटी महिलांच्या बँक खात्यावर प्रत्येक महिन्याला १५०० रुपये जमा होणार असल्याची घोषणा करण्यात आली आणि याच घोषणेनुसार शासन निर्णय देखील प्रसिद्ध करण्यात आला. योजनेसाठी दरवर्षाला राज्य सरकारच्या वतीने 46 हजार कोटींचा निधी देखील तरतूद करण्याचे राज्य सरकारने आश्वासन दिले. आणि दिनांक २८ जून 2024 ला या योजनेचा शासन निर्णय देखील प्रसिद्ध करण्यात आला.Mazi Ladki Bahin Yojana Online Form
माझी लाडकी बहिण योजना पात्रता काय आहेत ? Mazi Ladki Bahin Yojana Eligibility Criteria :
या योजनेचा लाभ घेण्यासाठी पूर्वीच्या असणाऱ्या सर्व जाचक अटी दूर करून आता नवीन अटी जाहीर करण्यात आल्या आहेत आणि त्यामुळेच या योजनेचा लाभ घेणाऱ्या लाभार्थींची संख्या देखील आता मोठ्या प्रमाणावर वाढणार आहे. योजनेचा लाभ घेण्यासाठी असणाऱ्या अटी खालील प्रमाणे आहेत :
- लाभ घेणारी महिला महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असावी. लाभ घेणाऱ्या महिलाचे वय 21 ते 65 वर्ष असावे.
- लाभ घेणाऱ्या महिलांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असावे.
- योजनेचा लाभ घेणारी महिला किंवा तिच्या कुटुंबातील व्यक्ती आयकर दाता नसावा.
- महिलेच्या कुटुंबातील व्यक्ती सरकारी नोकरदार अथवा पेन्शन धारक नसावा.
- महिलेच्या कुटुंबातील व्यक्ती खासदार, आमदार नसावा.
- कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीच्या नावावर ट्रॅक्टर सोडून चार चाकी वाहन नसावे.
- एका कुटुंबातील १ विवाहित आणि १ कुमारिका या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र आहेत.Mazi Ladki Bahin Yojana Online Form
माझी लाडकी बहिण योजना आवश्यक कागदपत्रे : Mazi Ladki Bahin Yojana Required Documents
योजनेचा अर्ज करण्यासाठी खालील कागदपत्रांची पूर्तता करायची आहे –
- आधार कार्ड
- डोमासाईल दाखला/शाळा सोडल्याचा दाखला/रेशनकार्ड/मतदान कार्ड
- २.५ लाख पेक्षा कमी उत्पन्न दाखला/पिवळे अथवा केशरी रेशनकार्ड
- बँकेचे पासबुक
- अर्जदाराचे सही केलेले हमीपत्र
माझी लाडकी बहिण योजना अर्ज करत असताना करू नका या चुका :
- मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज करत असताना सर्व माहिती व्यवस्थित भरायची आहे. या योजनेचा अर्ज करत असताना सुरुवातीला तुम्हाला एप्लीकेशन ओपन केल्यानंतर त्यामध्ये तुमची प्रोफाइल अपडेट करून घ्यायची आहे आणि प्रोफाइल अपडेट करत असताना चालू मोबाईल नंबर भरायचा आहे.
- यामध्ये जन्म ठिकाणाचे विचारलेली माहिती यामध्ये तुमचा जन्म झाल्याचे गाव त्याच गावाचा जिल्हा आणि तालुका तुम्हाला निवडायचा आहे यामध्ये पिन कोड देखील तुमचा जन्म ज्या गावांमध्ये झाला त्याच गावाचा अथवा नगरपंचायत किंवा महानगरपालिकेचा प्रभागाचा पिनकोड तुम्हाला टाकायचा आहे.
- योजनेचा अर्ज करत असताना चुकीची माहिती भरल्यास तुमचे अर्ज बाद केले जाणार आहेत.
- यामध्ये लग्नापूर्वीचे नाव आणि लग्नानंतरचे नाव ही देखील माहिती व्यवस्थित भरायची आहे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुमच्या बँक खात्याचा तपशील भरत असताना कोणत्याही प्रकारची चूक होणार नाही याची काळजी घ्यायची आहे यामध्ये आयएफएससी कोड असेल अथवा बँक खाते नंबर असेल तो तपासायचा आहे.
- कागदपत्रे अपलोड करत असताना ते व्यवस्थित रित्या स्कॅन झाले आहेत का किंवा त्यांचा फोटो क्लिअर आहे का याबाबतची खात्री करूनच तुम्हाला पुढे जायचे आहे.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे अनेक जण अर्ज करत असताना फोटो अपलोड करताना पासपोर्ट साईज फोटोचा मोबाईल वरून फोटो घेत आहेत आणि सबमिट करत आहेत असे न करता महिलेचा लाईव्ह फोटो तुम्हाला काढायचा आहे अन्यथा तुमचे अर्ज बाद होऊ शकतात याची सर्वांनी महत्त्वाची नोंद घ्यायची आहे.
योजनेचा अधिकृत शासननिर्णय पाहण्यासाठी | येथे क्लिक करा |
मोबाईल एप्लिकेशन डाउनलोड करण्यासाठी | येथे क्लिक करा |
योजना ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा |
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना मुदत | Mazi Ladki Bahin Yojana Last Date
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना या योजनेचा अर्ज करण्यासाठी दिनांक 01 जुलै 2024 पासून 30 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदत देण्यात आली आहे. यासाठी दोन्ही महिन्यातून ज्या काही लाभार्थी महिला पात्र होणार आहेत त्यांना दोन महिन्याचे मिळून एकत्रित 3000 रुपये बँक खात्यावर दिले जाणार आहेत. यासाठी अर्ज सबमिट केल्यानंतर त्याची छाननी केली जाईल आणि त्यातून जे अर्ज पात्र ठरणार आहेत केवळ त्याच महिलांना या योजनेचा लाभ देण्यास सुरुवात होणार आहे. आणि यामुळेच तुमच्याकडे अजूनही कागदपत्रे नसल्यास वेळ आहे या वेळात तुम्ही जाऊन तुमच्या सर्व कागदपत्रांची पूर्तता करून तुमचा अर्ज भरू शकणार आहात.Mazi Ladki Bahin Yojana Online Form
माझी लाडकी बहिण योजना महत्वाची माहिती –
लाडकी बहिण योजना या नवीन एप्लिकेशन मधून करा तुमचा अर्ज 10 मिनिटांत | Majhi Ladki Bahin Yojana Form