माझी लाडकी बहिण या 04 कागदपत्रांद्वारे भरा तुमचा अर्ज मोबाईल मधून | Majhi Ladki bahin Yojana Documents

Majhi Ladki bahin Yojana Documents नमस्कार मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सध्या राज्यात सुरू झाली असून या योजनेसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची प्रक्रिया देखील आता सुरू झाली आहे. यामध्ये पात्र व लाभार्थी महिला मोबाईल ॲप्लिकेशन द्वारे आपले अर्ज करू शकणार आहेत आणि यासाठी आवश्यक असणारे ०४ कागदपत्रांची माहिती तुम्हाला देण्यात आली आहे. यामध्ये तुम्ही कागदपत्रे अपलोड करत असताना कोणत्या ठिकाणी कुठले कागदपत्र अपलोड करायचे याबद्दलची सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अधिवेशनामध्ये या योजनेची घोषणा केल्यानंतर या योजनेसाठी आवश्यक असणाऱ्या कागदपत्रांची यादी मोठी देण्यात आली आणि त्यामुळे परिणामी अनेक लाभार्थी व पात्र महिला या योजनेच्या लाभांपासून वंचित राहण्याचे चिन्ह होते. यावरच अधिवेशनामध्येच विरोधी पक्ष असेल किंवा राज्यभरातून नागरिकांनी तीव्र अशा भावना व्यक्त केल्या.

योजनेसाठी दिलेला पंधरा दिवसांचा कालावधी आणि त्यामध्ये कागदपत्रांची पूर्तता करणे शक्य नसल्याचे सांगण्यात येत होते यावरच राज्य सरकारने देखील सकारात्मकपणे बदल करून नवीन शासन निर्णय प्रसिद्ध केला आणि त्या शासन निर्णयानुसार यामध्ये कागदपत्रांची पूर्तता असेल किंवा अर्ज करण्याची मुदत असेल अथवा योजनेसाठी पात्र असणाऱ्या महिलांच्या वयाची मर्यादा असेल या सर्वांमध्येच मोठ्या प्रमाणावर सूट देण्यात आल्याचे आपण पाहत आहे.Majhi Ladki bahin Yojana Documents

योजनेच्या नवीन शासन निर्णयानुसार या योजनेमध्ये आता पात्र असणाऱ्या महिलांची यादी मोठ्या प्रमाणावर वाढणार आहे कारण यामध्ये घातलेल्या जाचक अटी आता काढून टाकण्यात आलेल्या आहेत आणि त्यानुसार नव्याने आता पात्रता प्रसिद्ध करण्यात आली आहे.

  • लाभ घेणाऱ्या महिलाचे वय २१ ते 65 वर्ष असावे.
  • लाभ घेणारी महिला महाराष्ट्रातील रहिवासी असावी.
  • लाभ घेणाऱ्या महिलांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न २.50 लाखांपेक्षा कमी असावे.
  • लाभ घेणाऱ्या महिलांच्या कुटुंबातील व्यक्ती इन्कम टॅक्स रिटर्न भरणारा नसावा.
  • लाभ घेणाऱ्या महिलांच्या कुटुंबातील व्यक्ती सरकारी नोकरदार अथवा पर्मनंट खाजगी नोकरदार नसावा.
  • लाभ घेणाऱ्या महिलाच्या कुटुंबातील व्यक्तीच्या नावावर ट्रॅक्टर वगळता इतर कोणतेही चार चाकी वाहन नसावे.

पूर्वीच्या शासन निर्णयानुसार या योजनेचा लाभ घेण्यासाठी ०५ एकर संपूर्ण कुटुंबाच्या नावावर शेत जमीन असल्यास देखील महिला अपात्र ठरत होत्या. आणि या अटीवर देखील तीव्र अशी नाराजी व्यक्त करण्यात आली आणि त्यामुळेच आता ही अट देखील काढून टाकण्यात आली आहे.Majhi Ladki bahin Yojana Documents

हेही वाचा : मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना अर्ज करण्याची सविस्तर प्रक्रिया पहा

मित्रांनो या योजनेच्या सर्वात आधी प्रकाशित करण्यात आलेल्या शासन निर्णयांमध्ये योजनेचा अर्ज करताना उमेदवारांकडून अधिवास प्रमाणपत्र म्हणजेच डोमासाईल प्रमाणपत्र मागवले होते यासोबतच तहसीलदार चा उत्पन्नाचा दाखला देखील या योजनेच्या अर्ज करण्यासाठी आवश्यक सांगण्यात आला होता परंतु ही कागदपत्रे काढायला जास्त वेळ जातो आणि यामध्ये मोठी दगदग देखील महिलांची होते हे सरकारला समजल्यानंतर कागदपत्रांमध्ये देखील मोठ्या प्रमाणावर आता सूट देण्यात आली आहे आणि तुमच्याकडे केवळ चार कागदपत्र असल्यास तुम्ही या भरतीचा अर्ज करण्यास पात्र आहात.(Majhi Ladki bahin Yojana Apply Online)

  1. लाभार्थी व्यक्तीचे आधार कार्ड एप्लीकेशन मध्ये तुम्हाला आधार कार्ड अपलोड करण्यासाठी पर्याय आहे यामध्ये जाऊन तुम्ही आधार कार्ड चा क्लिअर फोटो काढून तो अपलोड करायचा आहे.
  2. यानंतर तुम्हाला अधिवास/ जन्म प्रमाणपत्र विचारले जाणार आहे मित्रांनो या ठिकाणी तुम्ही पंधरा वर्षांपूर्वी पत्त्याचा पुरावा असलेले कागदपत्र म्हणून तुमचे रेशनिंग कार्ड, 15 वर्षांपूर्वी जुने मतदान कार्ड, अथवा पंधरा वर्षांपूर्वीचा शाळा सोडल्याचा दाखला देखील अपलोड करू शकणार आहात.
  3. उत्पन्न प्रमाणपत्र या पर्यायावर क्लिक केल्यानंतर त्या ठिकाणी तुम्ही तुमच्याकडील असलेले केशरी अथवा पिवळे रेशन कार्ड अपलोड करायचे आहे.
  4. बँक पासबुक अपलोड करून तुम्ही तुमचा अर्ज सबमिट करू शकणार आहात.
व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
Majhi Ladki bahin Yojana Documents

म्हणजेच मित्रांनो तुमच्याकडे आधार कार्ड, रेशनिंग कार्ड, बँक पासबुक आणि हमीपत्र एवढी चार कागदपत्र असल्यास तुम्ही माझी लाडकी बहीण योजनेसाठी तुमच्या मोबाईल मधून घरबसल्या कोणतीही शुल्क न भरता अर्ज करू शकणारा आहात. अर्ज करण्याची सविस्तर प्रक्रिया पाहण्यासाठी तुम्ही खालील व्हिडिओचा देखील रेफरन्स घेऊ शकणार आहात.Majhi Ladki bahin Yojana Documents

हमीपत्र डाउनलोड करण्यासाठीयेथे क्लिक करा
अर्ज करण्याची प्रक्रिया पाहण्यासाठीयेथे क्लिक करा
योजनेचा अधिकृत शासननिर्णय पाहण्यासाठीयेथे क्लिक करा
योजना ग्रुप जॉईन करण्यासाठीयेथे क्लिक करा