Namo Shetkari Yojana Ekyc Online : नमो शेतकरी योजनेच्या पुढील हफ्त्यासाठी करा हे काम

Namo Shetkari Yojana Ekyc Online शेतकरी मित्रांनो तुमच्या सर्वांसाठीच एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे आता लवकरच राज्यभरातील सर्व शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर नमो शेतकरी महासंघ निधी योजनेचा चौथा हप्ता जमा होण्यासाठी सरकारकडून हालचाली सुरू झाल्या आहेत आणि त्यामुळेच पुढील हप्त्यासाठी आता लवकरच लाभार्थी यादी देखील प्रसिद्ध केली जाणार असून एकदा यादी प्रसिद्ध झाल्यानंतर आणि पैसे वितरित झाल्यानंतर वंचित असलेल्या लाभार्थ्यांना हप्ता दिला जाणार नाही आणि त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर हे काम करणे आवश्यक असणार आहे.

टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

नमस्कार शेतकरी मित्रांनो नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता जुलै महिन्यामध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा होण्याबाबत सूत्रांकडून माहिती देण्यात आली आहे कारण आता लवकरच राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होऊन राज्याचे अधिवेशन देखील घेण्यात येणार आहे आणि या अधिवेशनानंतर राज्यात विधानसभा निवडणुकीचे देखील वारे सुरू होणार असल्याने शेतकऱ्यांना खुश करण्यासाठी नमो शेतकरी योजनेचा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करण्याबाबत हालचाली सुरू झाल्या आहेत.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

या हप्त्यामध्ये राज्यभरातून सुमारे 90 लाख शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा सतरा व हप्ता देण्यात आला असल्याने नमो शेतकरी योजनेसाठी देखील या लाभार्थ्यांना हप्ता दिला जाणार आहे परंतु पीएम किसान च्या 17 व्या हप्त्यापासून देखील राज्यातील अनेक शेतकरी वंचित राहिल्याचे लक्षात आल्याने तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा पुढील हप्ता घेण्यासाठी देखील केवायसी करणे बंधनकारक असणारा आहे

शेतकरी मित्रांनो देशामध्ये 2019 या वर्षापासून शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य देण्यासाठी आणि शेतीस प्रोत्साहन म्हणून पीएम किसान सन्मान योजना केंद्र सरकार द्वारे घोषित करण्यात आली आणि या योजनेद्वारे सर्व अल्पभूधारक शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपये थेट बँक खात्यात मिळण्यास सुरुवात झाली.

या योजनेसाठी सुरुवातीला ऑफलाइन पद्धतीने तहसील कार्यालयामध्ये जाऊन शेतकरी नोंदणी करू शकत होते आणि यामध्ये अपडेट करून पुन्हा ऑनलाईन पोर्टल देखील सुरू करण्यात आले आणि ज्याद्वारे अधिकाधिक शेतकऱ्यांनी पीएम किसान योजनेचा लाभ घेण्यास सुरुवात केली. या योजनेलाच अधिक व्यापक करण्यासाठी 2023 मध्ये महाराष्ट्र राज्य सरकारने देखील पीएम किसान या योजनेला समतोल असणारी नमो शेतकरी महासन्मान निधी योजना सुरू केली आणि या योजनेला पी एम किसान योजनेचा असणारा सर्व डेटाबेस घेण्यात आला आणि त्यामुळे शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारची ऑनलाइन नोंदणी करण्याची आवश्यकता नसणार आहे

नमो शेतकरी योजना स्टेटस कसा पहायचा –

नमो शेतकरी योजनेचा स्टेटस पाहण्यासाठी तुम्हाला या योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन त्या ठिकाणी बेनिफिशरी स्टेटस मध्ये तुमचा रजिस्ट्रेशन नंबर अथवा मोबाईल नंबर टाकून तुमचा स्टेटस तुम्ही पाहू शकणार आहात ज्या शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेत 17 व हप्ता मिळाला आहे अशांना यामध्ये काहीच करण्याची आवश्यकता नाही परंतु ज्या शेतकऱ्यांना हा हप्ता मिळाला नाही त्यांनी लवकरात लवकर आपल्या मोबाईलवरून किंवा जवळील सीएससी सेंटर अथवा आपले सरकार सेवा केंद्र मध्ये जाऊन आपली ई केवायसी पूर्ण करायची आहे.Namo Shetkari Yojana Ekyc Online

शेतकरी मित्रांनो नमो शेतकरी योजनेसाठी ईकेवायसी करायला देखील तुम्हाला पीएम किसान च्या अधिकृत वेबसाईटवर जाऊनच करावे लागणार आहे कारण या योजनेसाठी कोणत्याही प्रकारची वेगळी केवायसी शेतकऱ्यांकडून मागितली नाही. जर तुम्ही पीएम किसान योजनेसाठी तुमची ई-केवायसी पूर्ण केली असल्यास तुम्हाला यासाठी वेगळ्या काही करायची गरज नाही.

ईकेवायसी करण्याची संपूर्ण प्रक्रिया –

  • पीएम किसान च्या वेबसाईटवर जायचे आहे आणि त्या ठिकाणी ई-केवायसी हा पर्याय तुम्हाला निवडायचा आहे.
  • ई-केवायसी पर्याय निवडल्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला तुमचा आधार नंबर टाकायचा आहे हा नंबर टाकल्यानंतर तुमच्या आधार कार्ड ला लिंक असलेल्या मोबाईलवर ओटीपी येणार आहे आणि तो ओटीपी तुम्हाला टाकून पुढे जायचे आहे.
  • त्यानंतर तुम्हाला आधार व्हेरिफिकेशन साठी अजून एक ओटीपी सहा अंकी येणार आहे तो टाकून तुम्हाला वेरीफाय करून घ्यायचे आहे आणि ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तुमची एक केवायसी अगदी काही मिनिटांमध्ये पूर्ण होणार आहे.
  • आधार कार्ड ला मोबाईल नंबर लिंक नसल्यास सीएससी सेंटर किंवा आपले सरकार सेवा केंद्र मध्ये जाऊन शेतकऱ्यांनी आधी लिंक करून घ्यायचा आहे

ईकेवायसी पूर्ण नसलेल्या शेतकऱ्यांना पुढील हफ्ते दिले जाणार नसल्याने सर्व शेतकऱ्यांनी लवकरात लवकर आपली ईकेवायसी करण्यासाठी सरकारच्या वतीने आवाहन करण्यात येत आहे.तसेच नमो शेतकरी योजनेचा पुढील हफ्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होण्यासाठी लवकरच प्रक्रिया सुरु होणार आहे.आणि प्रक्रिया सुरु झाल्यानंतर एकदा यादी फायनल झाल्यास पुन्हा हा हफ्ता लाभार्थी शेतकऱ्यांना दिला जाणार नाही.

Namo Shetkari Yojana Ekyc Online
नमो शेतकरी योजना लाभार्थी यादी पाहण्यासाठीयेथे क्लिक करा
नमो शेतकरी योजना अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठीयेथे क्लिक करा
Whatsapp Group जॉईन करण्यासाठीयेथे क्लिक करा
Telegram Group जॉईन करण्यासाठीयेथे क्लिक करा

नमो शेतकरी योजना लाभ घेण्यासाठी पात्रता व अटी –

  • नमो शेतकरी योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकरी अल्पभूधारक असावा.
  • शेतकऱ्यांच्या नावावर स्वतंत्र ७/12 उतारा असावा.
  • पती-पत्नीपैकी एकच व्यक्ती या योजनेचा लाभ घेऊ शकणार आहेत.
  • लाभ घेणारा शेतकरी खासदार,आमदार,जि.प.सदस्य नसावा.
  • लाभ घेणारा शेतकरी सरकारी नोकरदार नसावा.
  • लाभ घेणारा शेतकरी ITR भरणारा नसावा.
  • सामाईक क्षेत्र असलेला शेतकरी लाभ घेण्यासाठी पात्र नाही.Namo Shetkari Yojana Ekyc Online