Namo Shetkari Yojana 4th Installment | नमो शेतकरी योजनेचा चौथा हफ्ता यादिवशी होणार जमा पहा यादी

Namo Shetkari Yojana 4th Installment राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आणि अपडेट समोर येत आहे दिनांक 18 जून 2024 रोजी राज्यभरातून सुमारे 90 लाख शेतकऱ्यांना पीएम किसान सन्मान योजनेचा सतरावा हप्ता प्रति शेतकरी 2000 रुपये प्रमाणे बँक खात्यावर जमा करण्यात आला आहे. पी एम किसान योजनेच्या मिळालेल्या हप्त्यानंतर नमो शेतकरी योजनेचा देखील पुढील हप्ता कधी येणार याबद्दल शेतकरी चौकशी करत असल्याचे पाहायला मिळत आहे आणि त्यामुळेच सर्व लाभार्थी शेतकऱ्यांसाठी ही महत्त्वाची अपडेट असणार आहे.

नमो शेतकरी महासन्मान निधी योजना या योजनेचे आजवर राज्यभरातील सर्व शेतकऱ्यांना 03 हप्ते मिळाले आहेत. यामध्ये पहिला हप्ता 28 ऑक्टोबर 2024 रोजी तर फेब्रुवारी महिन्यात एकाच दिवशी नमो शेतकरी योजनेचे दोन हप्ते सर्व शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात आले होते. लोकसभेच्या आचारसंहितेच्या आधी शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेची सलग दोन हप्ते देण्यात आले होते आणि त्यामुळे आता पुढील हप्ता कधी येणार याबाबत देखील अपडेट समोर येत आहेत.

शेतकरी मित्रांनो नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता या महिन्यात किंवा पुढील महिन्याच्या मध्यावधीत सर्व शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे कारण आता राज्य सरकारचे शेवटचे अधिवेशन पार पडणार असून त्यानंतर विधानसभेची आचारसंहिता लागणार आहे आणि याच्यापूर्वीच शेतकऱ्यांना खुश करण्यासाठी नमो शेतकरी योजनेचा हप्ता वितरित करण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे.

शेतकरी मित्रांनो तुम्ही अजूनही नमो शेतकरी योजनेसाठी किंवा पीएम किसान योजनेसाठी तुमचे रजिस्ट्रेशन केले नसल्यास तुमच्यासाठी अजूनही संधी असणार आहे कारण या दोन्ही योजनांसाठी नव्याने रजिस्ट्रेशन प्रक्रिया सुरू आहे आणि यापैकी एकाही योजनेचा तुम्हाला लाभ मिळत असल्यास दुसऱ्या योजनेसाठी तुम्ही थेट पात्र ठरतात म्हणजेच पीएम किसान योजनेचा लाभ तुम्हाला मिळत असल्यास तुम्हाला नमो शेतकरी योजनेसाठी कोणत्याही प्रकारे वेगळे अर्ज भरण्याची आवश्यकता नसणार आहे.

परंतु या दोन्ही योजनांसाठी तुम्ही अद्यापही अर्ज केला नसल्यास तुम्ही ऑनलाईन आणि ऑफलाइन या दोन्ही पद्धतीने या योजनेसाठी आपले रजिस्ट्रेशन करू शकणार आहात. ऑनलाईन पद्धतीने तुम्ही तुमच्या मोबाईलवरून, सीएससी सेंटरवर जाऊन किंवा आपले सरकार सेवा केंद्र मध्ये जाऊन देखील हे अर्ज करू शकता आणि होत नसल्यास ऑफलाइन पद्धतीने करायचे झाल्यास तुम्ही तुमच्या गावातील तहसील कार्यालयात किंवा कृषी यांना भेटून तुमची सर्व कागदपत्र देऊन ऑफलाइन पद्धतीने देखील या योजनेसाठी तुमचा अर्ज करू शकणार आहात अर्जाची छाननी करून पात्र असलेल्या उमेदवारांना त्यानंतर लगेच पुढील सर्व हप्ते मिळण्यास सुरुवात होणार आहे.Namo Shetkari Yojana 4th Installment

नव्याने रजिस्ट्रेशन केल्यानंतर पूर्वीचे हफ्ते मिळणार का ?

मित्रांनो नव्याने रजिस्ट्रेशन केल्याने शेतकऱ्यांना पूर्वीचे हप्ते दिले जाणार नाहीत कारण ज्या दिवशी तुम्ही रजिस्ट्रेशन करणार आहात त्या दिवसापासून तुम्ही या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र ठरणार आहात आणि त्यामुळेच तुम्हाला पूर्वीचे हप्ते मिळणार नाही परंतु काही अनेक शेतकरी आहेत की ज्यांनी खूप दिवसांपूर्वी या योजनेसाठी अर्ज केला होता परंतु त्यांचा अर्ज अद्यापही स्वीकारला गेला नाही अशा शेतकऱ्यांना ज्या दिवशी त्यांनी अर्ज केला होता त्या दिवसापासूनचे पुढील चे सर्व हप्ते हे दिले जाणार आहेत.Namo Shetkari Yojana 4th Installment

नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याचा स्टेटस चेक करण्यासाठी तुम्हाला आता योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जाता येणार आहे आणि त्यामध्ये जाऊन तुम्ही तुम्हाला आलेले हप्ते किंवा कोणत्या बँक खात्यामध्ये पैसे जमा झाले आहेत कोणत्या तारखेला तुम्हाला हप्ता मिळाला आहे ही सर्व माहिती पाहू शकणार आहात. सुरुवातीला नमो शेतकरी योजनेकडून सेपरेट पोर्टल सुरू करण्यात आले नव्हते आणि त्यामुळे हप्ता मिळाला की नाही हे बघण्यात अनेक शेतकऱ्यांना अडचणी येत होत्या या अडचणी लक्षात घेऊनच नमो शेतकरी योजनेचे आता पोर्टल देखील सुरू करण्यात आले आहे.

नमो शेतकरी योजना स्टेटस पाहण्यासाठी – इथे क्लिक करा

वरील दिलेल्या वेबसाईटवर जाऊन तुम्ही बेनीफिशरी स्टेटस यावर क्लिक करून तुमचा रजिस्ट्रेशन नंबर अथवा मोबाईल नंबर टाकून ओटीपी द्वारे तुमचा संपूर्ण स्टेटस पाहू शकणार आहात यामध्ये तुम्हाला किती हप्ते मिळाले आहे, कोणत्या बँक खात्यामध्ये पैसे जमा झाले आहेत याबद्दल सर्व माहिती मिळणार आहे. पुढील देखील सर्व हप्ते पाहण्यासाठी तुम्हाला याच वेबसाईटवर यायचे आहे कारण नमो शेतकरी योजनेची ही अधिकृत वेबसाईट असणार आहे.

नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता कोणाला येणार याबाबत बोलायचे झाल्यास ज्या शेतकऱ्यांना आजपर्यंत तीन हप्ते आले आहेत त्या सर्वांना चौथा हप्ता देखील मिळणार आहे कारण यामध्ये कोणतीही वेगळे अपडेट देण्यात आले नाही परंतु ज्या शेतकऱ्यांनी मागील काही महिन्यांमध्ये आपले खाते अपडेट केले आहे, लँड सीडींग अपडेट केले आहे तसेच केवायसी पूर्ण केली आहे आणि हे सर्व करून जे शेतकरी पीएम किसान योजनेचा सतरावे हप्त्याला पात्र झाले होते अशा शेतकऱ्यांना नव्याने नमो शेतकरी योजनेचा देखील हप्ता दिला जाणार आहे.

त्यामुळेच ज्या शेतकऱ्यांना दिनांक 18 जून 2024 रोजी पीएम किसान योजनेचा हप्ता मिळाला होता अशा सर्व शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा देखील पुढील हप्ता जमा होणार आहे आणि यासाठी यादी पाहायचे झाल्यास तुम्ही पीएम किसान यांच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन बेनिफिशरी लिस्ट मध्ये जाऊन तुमच्या गावाची संपूर्ण यादी देखील पाहू शकणार आहात.

Namo Shetkari Yojana 4th Installment
नमो शेतकरी लाभार्थी यादी पाहण्यासाठीयेथे क्लिक करा
नमो शेतकरी योजना सविस्तर माहिती पाहण्यासाठीयेथे क्लिक करा
पीएम किसान हफ्ता मिळाला नसल्यासयेथे क्लिक करा
Whatsapp Group जॉईन करण्यासाठीयेथे क्लिक करा

नमो शेतकरी योजनेसाठी वेगळी ईकेवायसी करावी लागणार आहे का ?

नमो शेतकरी योजनेसाठी वेगळी केवायसी करण्याची आवश्यकता नसणार आहे तुम्ही पी एम किसान योजनेसाठी इ केवायसी केली असल्यास यासाठी तुम्हाला वेगळ्या प्रकारची केवायसी करण्याची आवश्यकता नसणार आहे. आणि ज्या बँक खात्याशी तुमचे आधार कार्ड संलग्न असणार आहे त्याच बँक खात्यामध्ये तुमचा नमो शेतकरी योजनेचा देखील हप्ता जमा होणार आहे त्यामुळेच हप्ता जमा होण्याआधी तुम्ही तुमच्या आधार कार्ड ला कोणते बँक खाते लिंक आहे याची खात्री करून घ्यायची आहे जेणेकरून तुम्हाला तुमचा हप्ता सहज काढता येणार आहे.

FAQ (सतत विचारले जाणारे प्रश्न)

Q : नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता कधी जमा होणार आहे ?

A – नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता जुलै महिन्यात शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा होण्याची शक्यता आहे.

Q : नमो शेतकरी योजनेच्या चौथ्या हप्त्याची लाभार्थी यादी तुम्ही पाहू शकणार आहात का ?

A – होय पी एम किसान यांच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन तुम्ही यादी पाहू शकणार आहात.

Q : नमो शेतकरी योजनेसाठी नव्याने रजिस्ट्रेशन प्रक्रिया सुरू आहे का ?

A – हो या योजनेसाठी ऑनलाईन ऑफलाइन दोन्ही पद्धतीने नवीन रजिस्ट्रेशन प्रक्रिया सुरू आहे.

Q : पी एम किसान योजनेचा लाभ मिळत असल्यास नमो शेतकरी योजनेचा लाभ आपोआप मिळतो का ?

A – होय पी एम किसान योजनेचा लाभ मिळणाऱ्या शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजना लाभ आपोआप दिला जातो.Namo Shetkari Yojana 4th Installment