Namo Shetkari Yojana 4th Installment Date : राज्यातील शेतकऱ्यांना एकाच दिवशी ४००० रु.जमा होणार ?

Namo Shetkari Yojana 4th Installment Date नमस्कार शेतकरी मित्रांनो राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी अजून एक आनंदाची बातमी येत आहे मित्रांनो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेऊन कार्यभार स्विकारल्या नंतर पहिल्याच दिवशी पीएम किसान योजनेचा १७वा हफ्ता शेतकऱ्यांना जारी करण्यासाठी फाईल वर सही केली आहे आणि त्यामुळे आता संपूर्ण देशातील शेतकऱ्यांना सरकार कडून गिफ्ट मिळाले आहे आणि आता येत्या काही दिवसांत शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा १७वा हफ्ता २००० रुपये जमा होणार आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

यातच आता महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांसाठी अजूनच चांगली बातमी मिळत आहे कारण राज्यातील शेतकऱ्यांना ४००० रु.मिळण्याची शक्यता आहे कारण नमो शेतकरी योजनेचा देखील आता तिसरा हफ्ता शेतकऱ्यांना जमा होणार असल्याचे बोलले जात आहे.राज्यात आत विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे आणि त्याच पार्श्वभुमीवर शेतकऱ्यांना खुश करण्यासाठी हा निर्णय घेतला गेल्याची चर्चा आहे.सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे.

शेतकरी मित्रांनो नमो शेतकरी महासन्मान निधी योजना हि राज्याच्या अत्यंत महत्वाच्या योजनांपैकी एक असल्याने नेहमीच सर्व शेतकऱ्यांकडून या योजनेचे स्वागत केले जाते.नमो शेतकरी महासन्मान निधी योजना महाराष्ट्र राज्याच्या महसूल व कृषी विभागाच्या अंतर्गत येते आणि २०२३ च्या हिवाळी अधिवेशनात या योजनेसाठी राज्य सरकार कडून मान्यता देण्यात आली होती.केंद्र सरकारच्या पीएम किसान शेतकरी सन्मान योजना या योजनेला अधिक व्यापक करण्यासाठी राज्य सरकारने हा निर्णय घेतला होता आणि याचा फायदा राज्यातील सुमारे ९० लाख शेतकऱ्यांना थेट होतो.

पीएम किसान या योजनेवर अवलंबून असलेल्या नमो शेतकरी योजनेसाठी शेतकऱ्यांकडून कोणत्याही प्रकारचे अर्ज भरून घेण्यात आले नाहीत.ज्या शेतकऱ्यांना पीएम किसान सन्मान या योजनेचा लाभ मिळतो अशा शेतकऱ्यांना थेट नमो शेतकरी योजनेचा लाभ देण्यात आला.२८ ऑक्टोबर २०२४ रोजी या योजनेचा पहिला हफ्ता राज्यातील सर्व पात्र शेतकऱ्यांना जमा करण्यात आला आणि त्यानंतर एकाच दिवशी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे २ हफ्ते शेतकऱ्यांना देण्यात आले.Namo Shetkari Yojana 4th Installment Date

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

नमो शेतकरी योजनेसाठी सुरुवातीला अधिकृत वेबसाईट किंवा पोर्टल प्रसिद्ध करण्यात आले नव्हते आणि त्यामुळे अनेक शेतकरी आपल्याला हफ्ता जमा झाला का नाही हे पाहू शकत नव्हते कारण पीएम किसान च्या पोर्टल वर गेल्यानंतर त्याठिकाणी केवळ पीएम किसान योजनेचा स्टेटस पाहता येत होता परंतु पहिला हफ्ता जमा केल्यानंतर काही महिन्यातच नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे देखील पोर्टल जारी करण्यात आले आहे.

त्यामुळे आता www.nsnmy.mahait.org या वेबसाईटवर जाऊन तुम्ही तुमचा नमो शेतकरी योजनेचा देखील स्टेटस पाहू शकणार आहात. नमो शेतकरी योजनेसाठी वेगळी केवायसी करण्याची आवश्यकता नसते जर तुम्ही पीएम किसान योजनेसाठी तुमची ई केवायसी आणि तुमचे लँड सीडींग अपडेट केले असेल तसेच तुमच्या आधार कार्ड ला बँक खाते लिंक असल्यास त्याच बँक खात्यावर तुम्हाला नमो शेतकरी योजनेचे देखील हप्ते जमा केले जातात. पी एम किसान योजनेचा सतरावा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर येत्या दोन ते तीन दिवसात जमा होण्याची शक्यता असतानाच नमो शेतकरी योजनेचा देखील हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर लवकरात लवकर जमा करण्यात येणार आहे.

कारण येथे काही महिन्यात विधानसभेच्या निवडणुका लागणार आहेत आणि त्यामुळे राज्य सरकारला राज्यातील सर्व शेतकऱ्यांना खुश करण्यासाठी ही एक चांगली संधी असणार आहे आणि त्यामुळेच आचारसंहिता लागण्याच्या आधी राज्यभरातील शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा हप्ता देण्याचे सरकारने ठरवले असल्याचे देखील बोलले जात आहे आणि त्यामुळेच आता मागील हत्या सारखेच पुन्हा एकदा पीएम किसान योजनेचा व नमो शेतकरी योजनेचा हप्ता एकाच दिवशी शेतकऱ्यांना जमा होणार का याबाबत सर्व तर्क वितर्क लडवले जात आहेत.Namo Shetkari Yojana 4th Installment Date

नमो शेतकरी सन्मान योजनेसाठी नवीन ऑनलाईन नोंदणी कशी करायची ?

नमो शेतकरी योजनेसाठी वरती सांगितल्याप्रमाणे तुम्हाला कोणत्याही प्रकारे नव्याने अर्ज भरण्याची आवश्यकता नाही परंतु तुम्ही पी एम किसान या योजनेचा देखील लाभ घेत नसाल तर तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा देखील लाभ घेता येत नाही बघ कारण या दोन्ही योजना एकमेकांशी संलग्न असल्याने नमो शेतकरी योजनेसाठी राज्य सरकारच्या वतीने ऑनलाईन पद्धतीने किंवा ऑफलाइन पद्धतीने सेपरेट नोंदणी प्रक्रिया घेण्यात येत नाही.

तुम्ही नमो शेतकरी व पीएम किसान या दोन्ही योजनेसाठी अद्याप रजिस्ट्रेशन किंवा नोंदणी केली नसल्यास त्यासाठी तुम्हाला पीएम किसान यांच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन सर्व नोंदणी करता येणार आहे. ही नोंदणी करताना कोणत्याही प्रकारचे शुल्क घेतले जाणार नाही आणि तुम्ही तुमच्या मोबाईलवरून, कम्प्युटर वरून या योजनेसाठी अर्ज करू शकणार आहात. सीएसटी सेंटर, आपले सरकार सेवा केंद्र, महा-ई-सेवा केंद्रात जाऊन देखील तुम्ही तुमची नोंदणी करू शकणार आहात आणि यासाठी खालील प्रक्रिया तुम्हाला करायची आहे.

  • योजनेचा नवीन अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाईट pmkisan.gov.in या वेबसाईटवर जाऊन शेतकऱ्यांनी न्यू रजिस्ट्रेशन या बटनावर किंवा लिंक वर क्लिक करायचे आहे.
  • अर्ज करण्याआधी शेतकऱ्यांनी त्यांच्या आधार कार्डला नंबर लिंक आहे का याची खात्री करून घ्यायची आहे आणि लिंक नसल्यास आधार कार्ड ला मोबाईल नंबर लिंक करणे आवश्यक असणार आहे.
  • यानंतर पुढील टॅब वर ग्रामीण भागातील शेतकऱ्यांनी रुरल फार्मर रजिस्ट्रेशन वर क्लिक करायचे आहे आणि शहरी भागातील शेतकऱ्यांनी अर्बन फार्मर रजिस्ट्रेशन वर क्लिक करायचे आहे.
  • तुमचा आधार कार्ड चा नंबर टाकून त्या शेजारी आधार कार्ड ला लिंक असलेला मोबाईल नंबर टाकायचा आहे.
  • राज्य निवडून त्यासमोर असलेला कॅपच्या कोड टाकून गेट ओटीपी या बटणावर क्लिक करायचे आहे.
  • यानंतर तुमचा आधार कार्ड ला लिंक असलेल्या मोबाईल नंबर वर तुम्हाला ०६ अंकी ओटीपी येणार आहे तो ओटीपी टाकून तुम्ही प्रोसेस करायचे आहे.
  • पुढील ओपन झालेल्या टॅब वर तुम्हाला तुमचे नाव, गाव, पत्ता यासंदर्भातील सर्व माहिती दिसणार आहे ती योग्य असल्यास खाली येऊन तुम्ही तुमच्या शेती विषयीची माहिती भरायची आहे.
  • यामध्ये लँड रजिस्ट्रेशन आयडी भरताना तुमचा फेरफार नंबर टाकायचा आहे.
  • क्षेत्राबद्दल सर्व सविस्तर माहिती भरून आधार कार्ड, 7/12 तुम्हाला व्यवस्थित स्कॅन करून अपलोड करायचा आहे.
  • सर्व माहिती व्यवस्थित भरल्यानंतर तुम्ही अमित बटनावर क्लिक करून तुमचा अर्ज सबमिट करायचा आहे. अर्ज सबमिट केल्यानंतर त्याची प्रिंट देखील घ्यायची आहे.
Namo Shetkari Yojana 4th Installment Date
नमो शेतकरी योजना लाभार्थी यादी पाहण्यासाठीयेथे क्लिक करा
नमो शेतकरी नवीन नोंदणी करण्यासाठीयेथे क्लिक करा

Que : नमो शेतकरी योजनेचा आणि पीएम किसान योजनेचा पुढील हफ्ता एकाच दिवशी मिळणार का ?

Ans – मिळू शकतो पीएम किसान योजनेसाठी हफ्ता जारी करण्यात आला आहे नमो शेतकरी योजनेसाठी अद्याप अधिकृत माहिती नाही.

Que : पुढील हफ्ता मिळण्यासाठी पुन्हा ekyc करावी लागणार आहे का ?

Ans – नाही.एकदा ekyc केल्यानंतर पुन्हा करण्याची आवश्यकता नाही.

Que : या योजनेसाठी नवीन नोंदणी सुरु आहे का ?

Ans – होय.तुम्ही ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीने नोंदणी करू शकणार आहात.Namo Shetkari Yojana 4th Installment Date