Mukhyamantri Yojana Doot 2024 महाराष्ट्र राज्य सरकार द्वारे मुख्यमंत्री योजनादूत कार्यक्रमाद्वारे योजना दूत या पदासाठी तब्बल 50 हजार जागांची भरती संपूर्ण राज्यात राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात, जिल्ह्यातील तालुक्यात आणि तालुक्यातील प्रत्येक गावात देखील तुम्हाला नोकरीची संधी मिळणार आहे. यामध्ये राज्य सरकारकडून दर महिना पगार दिला जाणार आहे आणि योजनेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
सदरील भरतीसाठी कोणत्याही प्रकारची परीक्षा अथवा मुलाखत घेतली जाणार नाही आणि उमेदवारांची निवड ही थेट केली जाणार आहे तुम्ही देखील नोकरीच्या शोधात असल्यास तुम्हाला या राज्य सरकारच्या कार्यक्रमाचा लाभ घेऊन तुमच्या गावात, किंवा तुमच्या शहरात राहूनच काम करता येणार आहे. या योजनेबद्दल ची सविस्तर माहिती, आवश्यक पात्रता, वेतनश्रेणी, अर्ज करण्याची प्रक्रिया याबद्दल सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे.
Mukhyamantri Yojana Doot 2024 Maharashtra :
मित्रांनो महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री योजनादूत कार्यक्रमाच्या अंमलबजावणीसाठी महाराष्ट्र राज्य सामान्य प्रशासन विभाग यांच्याद्वारे प्रसिद्ध करण्यात आलेल्या शासन निर्णयामध्ये नमूद केल्यानुसार राज्याच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता विभाग आणि मुख्यमंत्री जनकल्याण कक्षा यांच्यामार्फत ही योजना राबवण्यासाठी अंमलबजावणी करण्यात आली आहे.
या योजनेच्या शासन निर्णयानुसार यामध्ये महाराष्ट्र शासनाच्या विविध योजनांचा प्रचार, तसेच या योजनांची प्रसिद्धी करणे व या योजनांचा जास्तीत जास्त नागरिकांना लाभ मिळण्याच्या दृष्टीने त्यांना सहाय्य करण्यासाठी राज्यभरातून सुमारे ५०००० योजनादूत निवडले जाणार आहेत. आणि या निवडीसाठी राज्य शासनाच्या कडून मान्यता देखील देण्यात आलेली आहे.
योजनाच्या उद्दिष्टा बद्दल बोलायचे झाल्यास गावापासून ते शहरापर्यंत आणि वार्डापासून ते विभागापर्यंत जास्तीत जास्त नागरिकांना राज्य सरकार द्वारे प्रसिद्ध करण्यात आलेल्या योजनांचा लाभ देण्याचे काम करावे लागणार आहे.
Mukhyamantri Yojana Doot वेतनश्रेणी व सविस्तर माहिती :
या कार्यक्रमाच्या रूपरेषा बद्दल बोलायचे झाल्यास यामध्ये ग्रामीण भागामध्ये प्रत्येक ग्रामपंचायत साठी 01 तसेच शहरी भागात ५००० लोकसंख्येसाठी 01 योजनादूत याप्रमाणे राज्यभरातून एकूण ५०००० उमेदवारांची निवड केली जाणार आहे.
योजनेचे नाव | मुख्यमंत्री योजनादूत कार्यक्रम |
पदसंख्या | 50,000 |
मिळणारा लाभ | 10,000 रुपये महिना |
करार मुदत | 06 महिने |
यामध्ये निवड झाल्यानंतर राज्य सरकारच्या वतीने या सर्व उमेदवारांना महिन्याला १०००० रुपये वेतनश्रेणी दिली जाणार आहे. निवड झालेल्या उमेदवारांचा ०६ महिन्यांसाठीचा करार केला जाणार आहे आणि या करारामध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये वाढ करण्यात येणार नाही. अथवा निवड झालेल्या उमेदवारांना सरकारी सुविधांचा लाभ देखील दिला जाणार नाही याची सर्व अर्जदारांनी नोंद घेणे आवश्यक आहे.
Mukhyamantri Yojana Doot पात्रता व आवश्यक कागदपत्रे :
योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक पात्रता –
या योजनेच्या पात्रतेबद्दल बोलायचे झाल्यास योजनेचा अर्ज करण्यासाठीचा उमेदवार 18 ते 35 वर्षे वयोगटातील असावा.
उमेदवार हा महाराष्ट्र राज्याचा अधिवासी असणे आवश्यक आहे.
उमेदवाराचे मान्यता प्राप्त विद्यापीठातून कोणत्याही क्षेत्रातून पदवीधर शिक्षण पूर्ण झालेले असावे.
उमेदवाराकडे संगणक चालवण्याचे कौशल्य असणे देखील आवश्यक आहे.
उमेदवाराकडे अद्ययावत असलेला मोबाईल म्हणजेच स्मार्टफोन असणे आवश्यक आहे.
उमेदवाराकडे आधार कार्ड असणे आवश्यक आहे.
उमेदवाराच्या आधार कार्ड ला बँक खाते देखील लिंक असणे आवश्यक असणार आहे.
योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे –
विहित नमुन्यातील मुख्यमंत्री योजनादूत कार्यक्रमासाठी केलेला ऑनलाइन अर्ज असावा.
अर्जदाराचे आधार कार्ड देखील असणे आवश्यक आहे.
शैक्षणिक पुरावा म्हणून पदवी उत्तीर्ण असलेले प्रमाणपत्र असावे.
उमेदवाराचा रहिवासी दाखला असावा.
वैयक्तिक बँक खात्याचा तपशील देखील असणे आवश्यक आहे.
उमेदवाराकडे पासपोर्ट साईज फोटो असावा. आणि उमेदवाराचे हमीपत्र असावे. Mukhyamantri Yojana Doot 2024
Mukhyamantri Yojana Doot अधिकृत शासननिर्णय व करावे लागणारे काम :
निवड झालेल्या उमेदवारांना करावी लागणारी कामे –
निवड झालेल्या उमेदवारांना संबंधित जिल्हा माहिती अधिकारी यांच्या संपर्कात राहून जिल्ह्यातील योजनांची सर्व माहिती दिली जाणार आहे.
प्रशिक्षित योजनादूतांनी त्यांना नेमून दिलेल्या ठिकाणी समक्ष जाऊन त्यांना ठरवून दिलेले काम पार पाडणे बंधनकारक असणार आहे.
योजनादूतांनी राज्य शासनाच्या विविध योजनांचा प्रचार आणि प्रसिद्धी करताना ग्राम पातळीवरील यंत्रणाची समन्वय करून शासनाच्या योजनांची घरोघरी माहिती होईल यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत.
योजनादूत दर दिवशी त्यांनी दिवसभर केलेल्या कामाचा विहित नमुन्यातील अहवाल तयार करून तो ऑनलाइन अपलोड करतील.
योजनादूत त्यांना सोपवलेल्या जबाबदारीचे स्वतःच्या स्वार्थासाठी अथवा नियमबाह्य कामासाठी उपयोग करणार नाही तसेच गुन्हेगारी स्वरूपाचे आणि गैरवर्तन देखील करणार नाहीत असे निदर्शनास आल्यास त्यांच्यासोबत करण्यात आलेला संपुष्टात आणण्यात येऊन त्यांना जबाबदारीतून मुक्त करण्यात येणार आहे.
📃या भरतीचा अधिकृत GR पाहण्यासाठी | येथे क्लिक करा |
✅महाराष्ट्र चालू नोकरभरती जाहिराती पाहण्यासाठी | येथे क्लिक करा |
🟢Whatsapp Group जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा |
⏺️Telegram Group जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा |
टीप – भरती बद्दल अधिक ची माहिती घेण्यासाठी उमेदवारांनी जाहिरात पाहायचे आहे.
नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र राज्यातील सर्व खाजगी व सरकारी नोकर भरती अपडेट सर्वात आधी मिळविण्यासाठी साठी आजच आमचा ग्रुप जॉईन करा.
ही माहिती नक्कीच तुमच्या मित्रांना आणि गरजूंना पोहोचवा तुमच्या सर्व व्हाट्सअप ग्रुप वर शेअर करायला विसरू नका धन्यवाद.Mukhyamantri Yojana Doot 2024