Majhi Ladki Bahin Yojana 2024 : मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना महिना 1500 रु.अर्ज सुरु

Majhi Ladki Bahin Yojana 2024 नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र राज्याच्या अर्थसंकल्पात यावर्षी विविध योजनांची घोषणा करण्यात आली आणि यामध्ये सर्वाधिक पसंती मिळालेली योजना म्हणजेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी घोषणा केल्याप्रमाणे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेद्वारे राज्यातील सुमारे २.५ कोटी महिलांना अर्थसाहाय्य देण्यासाठी त्यांच्या बँक खात्यावर महिन्याला १५०० रुपये देण्याची घोषणा झाली आणि याच योजनेबद्दलची सविस्तर माहिती, पात्रता, अर्ज करण्याची प्रक्रिया यासोबतच अधिकृत शासन निर्णय आणि सर्व अटींची माहिती खाली देण्यात आली आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

अधिवेशनात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जाहीर केल्यानंतर दिनांक 01 जुलै 2024 पासून या योजनेची अंमलबजावणी देखील करण्यात येणार असल्याचे शासन निर्णयांमध्ये स्पष्ट करण्यात आले आहे आणि त्यानुसारच राज्यभरातून सर्व पात्र असलेल्या महिलांना या योजनेचा लाभ दिला जाणार आहे. महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी ही योजना राबवत असल्याचे राज्य सरकारच्या वतीने सांगण्यात आले आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
योजना नावमुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना
मिळणारा लाभमहिना 1500 रुपये
अर्ज करण्याची प्रक्रियाऑनलाईन व ऑफलाईन
अर्ज करण्यास सुरुवात01 जुलै 2024

या योजनेचा लाभ घेण्यासाठी जास्त अटी दिल्या गेल्या नसल्याचे देखील सांगण्यात आले असल्याने राज्यभरातून अनेक महिला या योजनेसाठी पात्र ठरणार आहेत आणि परिणामी या सर्व महिलांच्या बँक खात्यामध्ये डीबीटी म्हणजेच डायरेक्ट बेनिफिशरी ट्रान्सफर द्वारे सदरची रक्कम दर महिन्याला जमा केली जाणार असल्याचे शासन निर्णयाद्वारे स्पष्ट करण्यात आले आहे.

महाराष्ट्र शासनाच्या महिला व बालविकास विभागाअंतर्गत महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यास मान्यता देण्याबाबतचा शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आला आहे आणि या शासन निर्णयामध्ये नमूद केल्यानुसार राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी महिलांच्या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करणे आणि कुटुंबातील त्यांचे निर्णय भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्यात सदरील योजना लागू करण्यास मान्यता देण्यात येत आहे.

या योजनेच्या उद्देशाबद्दल बोलायचे झाल्यास यामध्ये राज्यातील महिला व मुलींना पुरेशी सोयी सुविधा उपलब्ध करून रोजगार निर्मितीस चालना देणे हा या योजनेचा प्रमुख उद्देश असणार आहे. यासोबतच महिलांचे आर्थिक आणि सामाजिक पुनर्वसन करण्याचे सरकार पुढे उद्देश असणार आहे. राज्यातील महिलांच्या व मुलींच्या सशक्तिकरणास या योजनेद्वारे चालना मिळणे आणि महिला आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्या मुलांच्या आरोग्य आणि पोषण स्थितीत सुधारणा करणे हे या योजनेचे उद्देश असणार आहेत.

या योजनेचे स्वरूपाबद्दल बोलायचे झाल्यास यामध्ये पात्र महिलांना त्यांच्या आधार कार्ड ला बँक खाते लिंक करणे अनिवार्य असणार आहे. आणि योजनेमध्ये पात्र ठरणाऱ्या महिलांना थेट लाभ हस्तांतरण देण्यात येणार आहे यामध्ये महिलांच्या सक्षम बँक खात्यामध्ये दरमहा १५०० रुपये जमा केले जाणार आहेत.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी दिनांक एक जुलै पासून अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे आणि या योजनेसाठी लाभार्थी ऑनलाईन व ऑफलाईन या दोन्ही पद्धतीने अर्ज करू शकणार आहेत. प्रामुख्याने या योजनेसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची आवाहन संबंधित विभागाकडून करण्यात आले आहे आणि यासाठी लाभार्थी महिलांनी ऑनलाइन पोर्टलवर स्वतः अथवा सेतू केंद्रावर जाऊन आपले अर्ज सबमिट करायचे आहेत. हे अर्ज करण्यासाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क घेतले जाणार नाही ऑनलाइन नोंदणी न करू शकल्यास आपल्या गावातील अंगणवाडी सेविकांकडे जाऊन देखील या योजनेचे अर्ज लाभार्थी महिला जमा करू शकणार आहेत.

योजनेचा अर्ज करण्यासाठी सर्व पात्र व लाभार्थी महिलांनी खालील कागदपत्रांची पूर्तता करणे आवश्यक असणार आहे.

  • लाभार्थींचा आधार कार्ड
  • रेशन कार्ड/ अथवा महाराष्ट्र राज्यातील जन्म दाखला
  • सक्षम प्राधिकारी यांनी दिलेला म्हणजेच तहसीलदार द्वारे देण्यात आलेले उत्पन्नाचे प्रमाणपत्र ( उत्पन्नाचा दाखला)
  • बँक खाते पासबुकची झेरॉक्स
  • लाभार्थींचा पासपोर्ट साईज फोटो
  • लाभार्थीचे रेशन कार्ड
  • या योजनेच्या सर्व अटी व शर्ती मध्ये पात्र असल्याचे हमीपत्र
Majhi Ladki Bahin Yojana 2024
  • लाभ घेणारी महिला महाराष्ट्र राज्याची रहिवासी असणे आवश्यक असणार आहे.
  • राज्यातील विवाहित, विधवा, घटस्फोटीत, परितक्त्या आणि निराधार महिला या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र असणार आहेत.
  • लाभ घेणाऱ्या महिलांचे वय किमान 21 वर्ष व कमाल ६० वर्षे पूर्ण असावे.
  • या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करणाऱ्या लाभार्थी महिलांचे स्वतंत्र बँक खाते असणे आवश्यक असणारा आहे.
  • लाभ घेणाऱ्या महिला च्या आधार कार्ड ला बँक खाते लिंक असणे देखील अनिवार्य असणार आहे.
  • लाभार्थी महिलाच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न २.50 पेक्षा जास्त नसावे.Majhi Ladki Bahin Yojana 2024
  • ज्या महिलांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न २.50 लाखांपेक्षा जास्त आहे अशा महिला या योजनेचा लाभ घेण्यासाठी अपात्र ठरणार आहेत.
  • ज्या महिलांच्या कुटुंबातील सदस्य आयकर दाता आहेत अशा कुटुंबातील महिला देखील अपात्र ठरणार आहेत.
  • ज्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित अथवा कायम कर्मचारी, कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम, मंडळ भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहे किंवा सेवानिवृत्तीनंतर प निवृत्ती वेतन घेत आहे अशा देखील महिला अपात्र ठरणार आहे.
  • सदर लाभार्थी महिलेने शासनाच्या इतर विभागांमार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे रुपये १५०० पेक्षा जास्त लाभ घेतला असेल अशा देखील महिला अपात्र ठरणार आहेत.
  • ज्यांच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार अथवा आमदार आहेत किंवा इतर कुठल्याही बोर्डाचे अध्यक्ष उपाध्यक्ष किंवा संचालक आहेत अशा देखील महिला अपात्र ठरणार आहे.
  • ज्या महिलांच्या कुटुंबातील सदस्यांची संयुक्तपणे शेतजमीन ०५ एकर पेक्षा जास्त आहे अशा देखील महिला अपात्र ठरणार आहे.
  • ज्यांच्याकडे चार चाकी वाहन ( ट्रॅक्टर वगळून) कुटुंबातील कोणत्याही सदस्याच्या नावावर असल्यास अशा महिला देखील या योजनेचा लाभ घेण्यासाठी अपात्र आहेत.
Majhi Ladki Bahin Yojana 2024
या योजनेचा अधिकृत GR पाहण्यासाठीयेथे क्लिक करा
अधिकच्या माहितीसाठीयेथे क्लिक करा

मित्रांनो या योजनेमुळे ज्या पात्र महिला ठरणार आहेत त्यांना चांगल्या प्रमाणात लाभ मिळणार आहे आणि त्यांच्या कुटुंबासाठी हातभार लावण्यामध्ये या योजनेद्वारे मोठा फायदा होणार आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना मान्यता देण्यात आल्याने आता जुलै महिन्यामध्येच या योजनेचे अर्ज सुरू होणारा असून सर्व पात्र महिलांनी लवकरात लवकर ऑनलाइन पद्धतीने आपले अर्ज करायचे आहेत जेणेकरून आपल्याला या योजनेचा लाभ सर्वात आधी मिळण्यास सुरुवात होणार आहे.

या योजनेच्या अटीनुसार यामध्ये स्पष्टपणे दिसत आहे की ज्या महिला या आर्थिकदृष्ट्या सक्षम नाहीत त्यांचे सक्षमीकरण करण्याचा प्रयत्न राज्य सरकार द्वारे या योजनेचा घोषणा करून करण्यात आला आहे आणि यामुळेच या योजनेचा लाभ ज्यांना खरी आवश्यकता आहे अशाच महिलांना देण्यासाठी यामध्ये हमीपत्र देखील सही करून घेतले जाणार आहे आणि चुकीची माहिती दिल्यास सदरील महिलांना लाभ देण्यात येणार नाही.Majhi Ladki Bahin Yojana 2024