लाडक्या बहिणींना 1500 रु.सोबत आता 3 गॅस सिलेंडर देखील मोफत नवीन GR | Ladki Bahin Yojana Update

Ladki Bahin Yojana Update मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सध्या राज्यातील अत्यंत महत्त्वाच्या योजनांपैकी एक आहे आणि या योजनेचे सर्वच महिलांकडून स्वागत करण्यात येत आहे. लाडक्या बहिणी योजनेला अधिक व्यापक करण्यासाठी दिवसेंदिवस यामध्ये नवनवीन अपडेट समोर येत आहेत आणि याच अपडेट मुळे राज्यभरातील महिलांना मोठ्या प्रमाणावर फायदा होणार असल्याचे दिसत आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

दिनांक 26 जुलै 2024 रोजी पुन्हा एकदा राज्य सरकारच्या वतीने लडकी बहीण योजनेसाठी एक चांगली अपडेट देण्यात आली आहे. यानुसार ज्या महिला लाडकी बहीण योजनेसाठी पात्र ठरणार आहेत अशा महिलांना मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा थेट लाभ दिला जाणार असून त्यामुळे सर्व पात्र महिलांना आता महिना १५०० रुपये आणि सोबत 3 गॅस सिलेंडर देखील मोफत दिले जाणार आहेत.याबद्दलची सविस्तर माहिती तुम्ही खाली पाहू शकणार आहात.

Majhi Ladki Bahin Yojana New GR :

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महाराष्ट्र शासनाच्या अधिवेशनामध्ये यावर्षीची सर्वात मोठी योजना घोषित करण्यात आली आणि या योजनेच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण राज्यभरातील महिलांमध्ये आनंदाचे वातावरण आहे कारण महिन्याला 1500 रुपयांचा थेट लाभ बँक खात्यामध्ये दिला जाणार आहे आणि त्यामुळेच संपूर्ण राज्यभरातून या योजनेसाठी अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया ऑनलाइन व ऑफलाइन या दोन्ही पद्धतीने राज्य सरकारच्या वतीने सुरू ठेवण्यात आले आहे.

योजनेसाठी अद्याप 85 लाखांहून अधिक महिलांनी ऑनलाईन आणि ऑफलाइन या दोन्ही पद्धतीने आपली नोंदणी केली आहे आणि त्यामुळेच योजनेला मिळणारा प्रतिसाद पाहून राज्य सरकार देखील जास्तीत जास्त महिलांनी लाभ घ्यावा म्हणून सोयीस्कर अपडेट देखील योजनेमध्ये आणत आहेत आणि यामुळेच नवनवीन शासन निर्णय आणि परिपत्रक योजनेद्वारे प्रसिद्ध करण्यात येत आहेत.

Majhi Ladki Bahin Yojana Documents List :

लाडक्या बहिणी योजनेसाठी सुरुवातीचा जो शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आला होता यामध्ये काही जाचक अटी आणि कागदपत्रांची पूर्तता मागितली होती आणि त्यामुळे अनेक महिला सेतू केंद्र असेल अथवा तहसील कार्यालयामध्ये जाऊन कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी रांगा लावत होत्या. यामधील काही कागदपत्र काढण्यासाठी अनेक दिवसांची वेळ लागत असल्याने राज्य सरकार द्वारे योजनेच्या अटींमध्ये शिथिलता देण्यात आली आणि त्यासोबतच कागदपत्रांमध्ये देखील मोठ्या प्रमाणावर शिथिलता दिली.Ladki Bahin Yojana Update

  • अर्जदाराचे आधार कार्ड
  • अर्जदाराचे किंवा कुटुंबाचे रेशनिंग कार्ड
  • रहिवासी दाखला/ जन्म प्रमाणपत्र अथवा १५ वर्षांपूर्वील मतदान कार्ड
  • अर्जदार महिलांचे बँक पासबुक
  • हमीपत्र

👉माझी लाडकी बहिण योजना लाभार्थी यादी पाहण्यासाठी – क्लिक करा

Majhi Ladki Bahin Yojana New Update GR :

लाडकी बहिण योजनेसाठी आता पुन्हा एकदा नवीन आणि सर्वात मोठे अपडेट समोर आले आहे याच अधिवेशनामध्ये राज्य सरकारने लाडकी बहीण योजनेसोबत मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना देखील घोषित केली होती आणि या योजनेअंतर्गत दारिद्र्य रेषेखालील महिलांना वर्षाला 03 गॅस सिलेंडर मोफत देण्याचा निर्णय राज्य सरकार द्वारे घेतला गेला होता.

ज्या महिलांनी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज केला आहे आणि ज्या महिला कागदपत्रांच्या पडताळणी नंतर या योजनेसाठी पात्र होणार आहेत अशा सर्व महिलांना आता मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना या योजनेचा थेट लाभ दिला जाणार आहे. याचाच अर्थ असा होतो की लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणाऱ्या सर्वच महिलांना आता वर्षाला 03 गॅस सिलेंडर देखील मोफत दिले जाणार आहेत.

म्हणजेच महिन्याला १५०० रुपयांप्रमाणे वर्षाला सर्व पात्र व लाभार्थी महिलांना १८००० रुपये दिले जाणार आहेत आणि त्यासोबतच 03 गॅस सिलेंडर देखील मोफत मिळणार असल्याने सर्व महिलांमध्ये आता आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे आणि या योजनेचा आणि अपडेटचा सर्व महिलांकडून चांगल्या प्रमाणात स्वीकार देखील केला जात आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
💻लाडकी बहिण योजना नवीन GR पाहण्यासाठीयेथे क्लिक करा
📃लाडकी बहिण योजना लाभार्थी यादी पाहण्यासाठीयेथे क्लिक करा
🟢योजना ग्रुप जॉईन करण्यासाठीयेथे क्लिक करा
Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठीयेथे क्लिक करा
Ladki Bahin Yojana Update
Ladki Bahin Yojana Update (सतत विचारले जाणारे प्रश्न)

Q : लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता कधी मिळणार आहे ?

A – लाडकी बहीण योजनेसाठी 19 ऑगस्ट 2024 रोजी जुलै व ऑगस्ट या दोन्ही महिन्यांचे हप्ते दिले जाणार आहेत.

Q : गॅस सिलेंडर मोफत मिळण्यासाठी दुसरा कोणता अर्ज करण्याची आवश्यकता आहे का ?

A – नाही. लाडकी बहीण योजनेसाठी तुम्ही पात्र झाल्यास तुम्हाला मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेसाठी थेट पात्र करून 03 गॅस सिलेंडर मोफत दिले जाणार आहेत.

Q : एकाच कुटुंबातील किती व्यक्ती किंवा महिला लाडकी बहीण योजनेचा लाभ घेऊ शकतात ?

A – एकाच कुटुंबातील एक विवाहित आणि एक अविवाहित अशा दोन महिला या योजनेचा लाभ घेऊ शकतात.