लाडकी बहिण योजना अर्ज बाद झाला ? नवीन अर्ज देखील बंद आता काय करणार ? पहा सविस्तर | Ladki Bahin Yojana Status

Ladki Bahin Yojana Status मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आता अंतिम टप्प्यात आली असून यामध्ये आता ज्या महिलांनी अर्ज केले होते अशा सर्व महिलांची अर्जांची पडताळणी सुरू असून बऱ्याच महिलांचे अर्ज स्वीकारले गेले आहेत तर काही महिलांचे अर्ज बाद देखील करण्यात आलेले आहेत. बाद झालेल्या महिलांनी आता पुढे काय करायचे ? यासोबतच तुम्ही अर्ज करत असताना आता नवीन अर्ज देखील सबमिट होत नाही आहे ? पेंडिंग मध्ये असणाऱ्या अर्जांचे पुढे काय होणार आणि हप्ता कोणत्या तारखेला जमा होणार याबाबतची सविस्तर माहिती तुम्हाला खाली देण्यात आलेली आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

Majhi Ladki Bahin Yojana Maharashtra 2024 :

महाराष्ट्र शासन महिला व बालविकास विभाग यांच्याद्वारे दिनांक 12 जुलै 2024 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या या शासन निर्णयानुसार राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य आणि घोषणा सुधारणा करण्यासाठी तसेच कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राबवण्यास दिनांक 28 जून 2024 रोजी राज्य सरकारच्या हिवाळी अधिवेशनात मान्यता देण्यात आलेली आहे.

लाडकी बहीण योजनेचा अर्ज करण्यासाठी राज्यभरातील महिलांना ऑनलाइन आणि ऑफलाइन या दोन्ही पद्धतीने सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी महिला मोबाईल ॲप्लिकेशन मधून आपल्या घर बसून अर्ज करू शकत आहेत आणि ज्या महिला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकणार नाहीत अशा महिलांसाठी अंगणवाडी कार्यालय तसेच पंचायत समिती, नगरपंचायत, महानगरपालिका आणि विविध प्रशासन विभागात देखील ऑफलाइन अर्ज स्वीकारले जात आहेत.

महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिलेल्या माहितीनुसार आजवर महाराष्ट्र राज्यात तुम्ही या योजनेसाठी तब्बल 01 कोटी 40 लाख महिलांनी आपले अर्ज केले आहेत आणि या अर्जांची आता छाननी सुरू असून एप्लीकेशन मध्ये तुम्ही याचा स्टेटस देखील पाहू शकता आणि ज्या महिलांचे फॉर्म Approved झाले आहेत अशा महिलांना मोबाईलवर एसएमएस देखील पाठवण्यात आले आहेत.Ladki Bahin Yojana Status

Ladki Bahin Yojana अर्ज बाद झाल्यावर काय करायचे ?

मित्रांनो या योजनेसाठी ज्या महिलांनी अर्ज केले आहेत त्यापैकी काही महिलांचे अर्ज हे बाद देखील करण्यात आले आहेत. आणि अशा महिलांना एप्लीकेशन मध्ये स्टेटस ओपन केल्यानंतर Disapproved असा एरर मेसेज येत आहे. मित्रांनो बाद झालेले अर्जामध्ये काही अर्ज हे एडिट करण्यासाठी खाली पर्याय उपलब्ध होत आहे आणि त्या पर्यायावर जाऊन तुम्ही बाद झाल्याचे कारण तपासून ते कागदपत्र पुन्हा अपलोड करून किंवा माहिती बदलून तुमचे अर्ज पुन्हा सबमिट करू शकता.

यामध्ये काही महिलांच्या स्टेटस मध्ये एडिटचा पर्याय येत नाही आहे अशा महिलांना सध्या यावर कोणताही पर्याय नाही आणि त्यांना या योजनेचा लाभ दिला जाणार नाही. बऱ्याच महिलांची याबाबत तक्रार अशी आहे की सर्व पात्रतांमध्ये पात्र असून आणि व्यवस्थित अर्ज भरलेला असून देखील आमचे अर्ज बाद झाले आहेत परंतु यावर अद्याप कोणताही ऑप्शन देण्यात आलेला नाही आणि तुम्हाला एडिटचा ऑप्शन येत नसल्यास तुम्ही पुन्हा तुमचा अर्ज भरू शकणार नाही.

Ladki Bahin Yojana Pending/In Review मध्ये असलेल्या अर्जाचे काय होणार ?

Pending to Submitted अर्ज केल्यानंतर स्टेटस चेक करताना ज्या महिलांचा हा स्टेटस दिसत आहे याचा अर्थ असा की तुमचा अर्ज तुम्ही भरलेला आहे परंतु अद्याप या अर्जाची छाननी सुरू झाली नाही अथवा संबंधित अधिकाऱ्यांनी अजूनही हा अर्ज तपासण्यास सुरुवात केलेली नाही. अशावेळी तुम्हाला काही करायचे नाही आणि थोडे दिवस तुम्हाला वाट पाहायची आहे.

In Review – ज्या महिलांचा असा स्टेटस दिसत आहे याचा अर्थ असा होतो की तुमचे अर्ज आता संबंधित अधिकाऱ्यांनी तपासण्यासाठी घेतले आहेत यामध्ये तुम्ही केलेला अर्ज व्यवस्थित तपासला जाईल त्यासोबतच तुम्ही अपलोड केलेल्या कागदपत्रांची योग्य त्या छाननी करून तुमचा रिझल्ट तुम्हाला कळविला जातो. हे कळायला 2-3 दिवसांचा कालावधी लागतो आणि या कालावधी दरम्यान तुम्ही काहीही करायचे नाही यानंतर तुमचा अर्ज Approve झाल्यानंतर तुम्हाला मोबाईलवर एसएमएस देखील येतो.

Approved – ज्या महिलांचा स्टेटस असा दाखवत असल्यास अशा महिलांचे अर्ज स्वीकारले गेले आहेत आणि आता तुम्हाला काहीही करायची आवश्यकता नाही. तुम्हाला आता ज्या दिवशी सरकार या निधीचा वितरण करणार आहे त्या दिवशी तुमच्या बँक खात्यामध्ये तुम्हाला योजनेचा हप्ता डीबीटी द्वारे थेट जमा केला जाणार आहे. आणि पैसे जमा होताना तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही.

Ladki Bahin Yojana New Form Official Website :

मित्रांनो लाडकी बहीण योजनेचा नवीन अर्ज करताना ज्यावेळी येता तुम्ही एप्लीकेशन ओपन करत आहात आणि संपूर्ण माहिती भरल्यानंतर अर्ज सबमिट करताना तुम्हाला No New Form Accepted हा एरर येत आहे आणि यामुळे तुमचे अर्ज सबमिट होत नाही आहेत. असा प्रॉब्लेम येत असल्यामुळे अनेक महिलांमध्ये आता प्रश्न उपस्थित होत आहे की 31 ऑगस्ट पर्यंत मुदत असताना देखील आमचे अर्ज का सबमिट होत नाही आहेत.

तर मित्रांनो यामध्ये एक गोष्ट लक्षात घ्या एप्लीकेशन वर जेवढे अर्ज भरले होते त्या सर्व अर्जांची आता छाननी सुरू असल्याने एप्लीकेशन वरून आता तुम्ही नवीन अर्ज करू शकत नाही. परंतु ज्या महिलांनी अद्याप या योजनेसाठी अर्ज केला नाही अशा महिला आता वेबसाईट किंवा पोर्टल वर जाऊन अर्ज करू शकणार आहेत. यामध्ये ज्या महिलांनी अद्याप अर्ज केला नाही केवळ त्याच महिला अर्ध करू शकणार आहेत ज्यांचे अर्ज रिजेक्ट झाले आहेत अशा महिला पोर्टलवर जाऊन पुन्हा नव्याने अर्ज करू शकणार नाहीत याची नोंद घ्यायची आहे.Ladki Bahin Yojana Status

लाडकी बहिण योजना हेदेखील महत्वाचे –

👉लाडकी बहिण योजना पात्रता पाहण्यासाठी क्लिक करा

👉लाडकी बहिण योजना हफ्ता जमा तारीख पाहण्यासाठी क्लिक करा

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
Ladki Bahin Yojana Status
लाडकी बहिण योजना नवीन अर्ज करण्यासाठीयेथे क्लिक करा
💻लाडकी बहिण योजना सविस्तर अर्जप्रक्रिया पाहण्यासाठीयेथे क्लिक करा
🟢योजना ग्रुप जॉईन करण्यासाठीयेथे क्लिक करा
⏺️Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठीयेथे क्लिक करा