Ladki Bahin February Installment Date राज्यातील सर्व लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी आहे कारण मागील काही दिवसांपासून सर्व महिला ज्या योजनेच्या हप्त्याची वाट पाहत होत्या त्याच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेच्या फेब्रुवारी हफ्त्यासाठी तारीख आता जवळपास निश्चित झाली आहे आणि त्यामुळेच आता महिलांच्या बँक खात्यावर पैसे देखील येणार आहेत.
परंतु मित्रांनो आपल्या सर्वांना माहिती आहेच की लाडकी बहीण योजनेअंतर्गत पुन्हा एकदा फेर तपासणी सुरू असल्याकारणाने अनेक महिला योजनेअंतर्गत बाद करण्यात आलेले आहेत आणि त्यामुळे फेब्रुवारी महिन्याचा हप्ता हा काही ठराविक महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे आता यामध्ये कोणत्या महिला पात्र असणार त्याची यादी कशी पहायची याबद्दल सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे.
Ladki Bahin Yojna February Hafta :
लाडकी बहीण योजनेबद्दल बोलायचे झाल्यास सुरुवातीला ज्यावेळी या योजनेची राज्य सरकार द्वारे अंमलबजावणी सुरू झाली त्यावेळी लाडकी बहीण योजनेसाठी महाराष्ट्र राज्यातून सुमारे अडीच कोटी महिला लाभार्थी ठरतील असे सांगण्यात आले होते. आणि आचारसंहितेपूर्वीच महिलांच्या खात्यामध्ये काही हप्ते द्यायचे असल्याने अगदी त्वरित या योजनेसाठी नोंदणी प्रक्रिया सुरू केली होती आणि त्याद्वारेच महिलांनी उत्सर्फ असा प्रतिसाद देऊन या योजनेचे स्वीकार केला.
महाराष्ट्र सरकारने राज्यातील सर्व महिलांना लाभ देण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेची घोषणा केली आणि त्यानुसारच योजनेसाठी त्वरित अंमलबजावणी देखील सुरू करण्यात आली आणि अंमलबजावणीनंतर महिलांच्या बँक खात्यावर पैसे देखील जमा होण्यास सुरुवात झाली. जुलै महिन्यामध्ये या योजनेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सरकारद्वारे सुरू करण्यात आली होती आणि यामध्ये ऑनलाईन आणि ऑफलाइन अशा दोन्ही पद्धतीने अर्ज सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती.Ladki Bahin February Installment Date
Ladki Bahin Yojna Apatra List Check Online :
लाडकी बहीण योजनेअंतर्गत अपात्र यादी कसे पाहायचे असा देखील अनेक महिलांना प्रश्न पडलेला आहे याबद्दल बोलताना महिला व बालविकास विभागाकडून तसेच संबंधित खात्याच्या मंत्री आदिती तटकरे यांच्याकडून काही बाबी स्पष्ट करण्यात आलेले आहेत आणि त्या बाबींनुसार योजनेअंतर्गत जानेवारी महिन्यामध्ये सुमारे 05 लाख महिलांना बाद करण्यात आलेले आहे.
यामध्ये प्रामुख्याने संजय गांधी निराधार योजना अंतर्गत लाभ घेणाऱ्या महिला त्यासोबतच 18 ते 65 या वयोगटांमध्ये बसत नसलेल्या महिला आणि सोबतच इतरही शासकीय योजनांचा लाभ घेणाऱ्या महिलांना योजनेमधून बाद करण्यात आलेले आहे आणि परिणामी अशा सर्व महिलांना फेब्रुवारी महिन्यामध्ये योजनेचे पैसे मिळणार नाहीत. तुम्ही या योजनेच्या सर्व अटी आणि निकषांमध्ये बसत असल्यास तुम्हाला योजनेचे पुढील देखील हप्ते येत राहणार आहेत.
फेब्रुवारीचा हफ्ता यादिवशी जमा होणार –
लाडक्या बहिणींना फेब्रुवारी महिन्याचा हप्ता हा संभावितपणे दिनांक 20 फेब्रुवारीच्या आसपास जमा होणार असल्याचे सांगण्यात येत आहे कारण फेब्रुवारी महिना हा 28 दिवसांचाच असल्याने आणि योजनेचा हप्ता चार-पाच दिवसात सर्व पात्र-बहिणींच्या खात्यामध्ये वर्ग होत असल्याने ही एक संभावित तारीख काढली जात आहे आणि यामध्ये इतर सर्व पात्र महिला ज्यांना जानेवारी महिन्यामध्ये हप्ता मिळाला होता त्यांना पैसे मिळणार आहेत.Ladki Bahin February Installment Date

📃लाडकी बहिण योजना यादी पाहण्यासाठी | येथे क्लिक करा |
🟢 योजना ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा |