Ladki Bahin Bonus Date राज्यातील सर्व लाडक्या बहिणीसाठी अत्यंत आनंदाची बातमी समोर येत आहे महाराष्ट्र राज्यात पुन्हा एकदा भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्या माहिती सरकारला मोठ्या प्रमाणावर बहुमत मिळाल्यानंतर आणि या बहुमताचे सर्वात प्रमुख कारण म्हणजे लाडकी बहीण योजना असल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून लाडक्या बहिणींना गिफ्ट घोषित करण्यात आले आहे.
एकनाथ शिंदे यांनी दिनांक 24 नोव्हेंबर 2024 रोजी ज्यावेळी सर्व लाडक्या बहिणी त्यांचे औक्षण करायला आणि अभिनंदन करायला जमा झाल्या होत्या त्याच वेळी महिलांसाठी सुरू असलेल्या लाडक्या बहिणी योजनेअंतर्गत आम्ही दिलेले आश्वासन पूर्ण करणार असून यामुळे आता महिलांच्या बँक खात्यावर 2100 रुपये जमा होणार आहेत आणि याची तारीख देखील आता सांगण्यात आली असून तुम्ही सविस्तर माहिती खाली पाहू शकणार आहात.
Ladki Bahin Yojna Maharashtra 2024 :
मित्रांनो महाराष्ट्र राज्य सरकारने अधिवेशनामध्ये घोषित केल्यानुसार महाराष्ट्र राज्यातील सर्व पात्र महिलांसाठी महिन्याला 1500 रुपये थेट बँक खात्यात जमा करण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राज्यभरात लागू करण्यात आली. या योजनेसाठी सर्व महिलांना ऑनलाइन आणि ऑफलाइन या दोन्ही पद्धतीने अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली.
योजनेसाठी महिला मोबाईल ॲप्लिकेशन मधून अथवा जवळील अंगणवाडी सेविका किंवा ग्रामपंचायत कार्यालयामध्ये जाऊन आपले अर्ज करू शकणार होत्या आणि याद्वारे जुलै महिन्यामध्ये लाडकी बहीण योजनेमध्ये तब्बल 01 कोटी 40 लाख महिलांना ज्यांनी व्यवस्थित अर्ज केले होते आणि सर्व पात्रतेमध्ये बसत होते अशा महिलांना पात्र करण्यात आले.
विधानसभा निवडणुकांपूर्वी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत सर्व पात्र महिलांच्या बँक खात्यावर या योजनेचे 05 हप्ते म्हणजेच प्रत्येक पात्र महिलेच्या बँक खात्यावर सुमारे 7500 रुपये जमा करण्यात आले आणि यामुळेच या योजनेबद्दल महिलांच्या मनात विश्वास निर्माण झाला आणि विधानसभा निवडणुकांमध्ये देखील यामुळेच महिलांच्या मतदानाचा टक्का देखील वाढल्याचा पाहायला मिळाले.Ladki Bahin Bonus Date
Ladki Bahin Yojna Next Installment Date :
विधानसभा निवडणुकांच्या दरम्यान लाडकी बहीण योजना हा एक अत्यंत महत्त्वाचा प्रचाराचा विषय बनला होता आणि या योजनेला काही प्रमाणात विरोधी पक्षांकडून विरोध करण्यात आल्याने याचा फटका नक्कीच या निवडणुकांमध्ये विरोधी पक्षाला बसल्याचे पाहायला मिळाले आणि यामुळेच पुन्हा एकदा राज्यात माहिती सरकार बहुमताने निवडून आले.
विधानसभेचा निकाल लागल्यानंतर लगेचच लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता आम्ही महिलांच्या बँक खात्यावर जमा करणार असे महायुती सरकारच्या वतीने सांगण्यात आले होते आणि त्यावरच आता येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये राज्यात नवीन सरकार स्थापन होणार आहे आणि यानंतर सर्वात पहिला निर्णय म्हणजे लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता महिलांच्या बँक खात्यावर जमा करण्यात येणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून देण्यात आली आहे.
Ladki Bahin Yojna New Registration Link :
लाडक्या बहिणींना त्यामुळेच आता येत्या काही दिवसांमध्येच योजनेचा पुढचा हप्ता देण्यात येणार आहे आणि यामध्येच आता पुढचा येणारा हफ्ता 2100 रुपये मिळणार की 1500 रुपये मिळणार याबद्दल देखील लवकरच घोषणा होणार आहे आणि या सोबतच बहिणींना पुन्हा एकदा नव्याने अर्ज करण्याची प्रक्रिया देखील सुरू करण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे.
गेम चेंजर ठरलेली ही योजना पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणावर राज्यात क्रांती घडवून आणेल असे देखील सरकारच्या वतीने सांगण्यात आले आहे आता याबद्दल लवकरच पुढची देखील माहिती तुम्हाला मिळणार आहे. अर्ज करण्यासाठी किंवा तुम्हाला आजवर किती हप्ते मिळाले ते पाहण्यासाठी देखील खाली लिंक वर तुम्ही क्लिक करू शकणार आहात.Ladki Bahin Bonus Date
📃लाडकी बहिण योजना लाभार्थी यादी पाहण्यासाठी | येथे क्लिक करा |
💻लाडकी बहिण योजना ऑनलाईन अर्ज करण्यासाठी | येथे क्लिक करा |
🟢योजना ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा |