महाराष्ट्र मधील युवकांना 10 हजार जागा जर्मनी मध्ये नोकरीच्या संधी अर्ज सुरु | Germany Jobs Recruitement 2024

Germany Jobs Recruitement 2024 मित्रांनो महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र अंतर्गत महाराष्ट्रातील युवक युवतींना जर्मनीमध्ये रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे आणि याबाबतचा शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आला असून या रोजगारासाठी ऑनलाईन पद्धतीने नोंदणी देखील सुरू करण्यात आली आहे. राज्य सरकारच्या या कार्यक्रमात अंतर्गत राज्यभरातून तब्बल 10000 युवक युवतींना हा रोजगार दिला जाणार आहे.

जर्मनीतील बाडेन-वुटेनबर्ग या राज्यात महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील उपलब्ध कुशल मनुष्यबळ पुरवण्यास बाबतच्या पथदर्शी प्रकल्पास मान्यता देण्यासंदर्भात असणारी पार्श्वभूमी खालील प्रमाणे देण्यात आली आहे. युरोपीय युनियन मधील बहुतांश देश औद्योगिक दृष्ट्या संपन्न आहे तथापिमागील काही वर्षापासून या देशांना कुशल मनुष्यबळाची कमतरता भासत आहे.

Germany Job Vacancy 2024 Maharashtra :

यासाठी 10वी पास,12वी पास आणि पदवीधर उमेदवार देखील अर्ज करण्यासाठी पात्र आहेत. अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू असून यामध्ये आवश्यक असणारे सर्व ट्रेनिंग देखील तुम्हाला शासनाद्वारे दिले जाणार आहे. उपलब्ध पदे, शासन निर्णय, आवश्यक शैक्षणिक व इतर पात्रता आणि इतर सर्व सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे.

Maharashtra Students have opportunity to work in Germany.There are 10000 vacancies in germanies Baden-Vutenberg city.This city needs workers and hence it had done agreement with maharashtra's candidates.If you are interested to work in Germany then you must register yourself.The link for application is given below.Germany Jobs Recruitement 2024

यामध्ये विविध विभागातील पदांची भरती केली जाणार आहे आणि यासाठी आवश्यक असणारे सर्व ट्रेनिंग तसेच भाषेचे ज्ञान देखील उमेदवारांना सरकारद्वारेच मोफत दिले जाणार आहे.शासन निर्णयात नमूद केल्यानुसार 30 कौशल्यधारीत व्यवसायासाठी महाराष्ट्र राज्यातील अनुरूप व्यावसायिक पात्रता धारण केलेले उमेदवारच हा अर्ज करू शकणार आहेत. रोजगाराकरिता जर्मनी देशातील बाडेन-वुटेनबर्ग या राज्यामध्ये विजा मिळवण्याकरता तसेच त्या ठिकाणी स्थायिक होण्याकरिताच्या सोयी अंतरास उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र शासन आणि जर्मनी देशातील बाडेन-वुटेनबर्ग राज्य यांच्यात समन्वयाने संपूर्ण सहकार्य केले जाणार आहे

Germany Jobs Recruitement 2024 For Freshers :

यासाठी महाराष्ट्र राज्यात विविध क्षेत्रातील कुशल मनुष्यबळ मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे या मनुष्यबाणासाठी एक तर तुलनेने रोजगाराचा संधी कमी प्रमाणात उपलब्ध आहेत आणि यामुळेच यांना रोजगार देण्यासाठी आणि समाधानकारक वेतनश्रेणी देण्यासाठी हा कार्यक्रम राबवला जात आहे. यामुळेच तुम्ही देखील रोजगाराच्या अथवा नोकरीच्या शोधात असल्यास तुम्हाला जर्मनीमध्ये चांगल्या कामाची आणि आकर्षक वेतन श्रेणीची देखील ही एक चांगली संधी असणार आहे.

या कार्यक्रमाअंतर्गत यासाठी उमेदवारांची भरती केली जाणार आहे आरोग्य विभागातील पदांमध्ये –

  • नर्स
  • लॅब असिस्टंट
  • रेडिओलॉजी असिस्टंट
  • डेंटल असिस्टंट
  • केअर टेकर
  • फिजिओथेरपिस्ट
  • डॉक्युमेंटेशन अंड कोडींग
  • अकाउंटिंग अँड ऍडमिनिस्ट्रेशन

इतर विभागातील पदांमध्ये –

  • इलेक्ट्रिशियन
  • हीटिंग टेक्निशियन
  • पेंटर
  • कारपेंटर
  • प्लंबर
  • मेकॅनिक
  • आणि इतरही विविध पदांसाठी

यांसारख्या विविध पदांसाठी सदरील भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे आणि यासाठी शैक्षणिक पात्रतेबद्दल बोलायचे झाल्यास उमेदवार दहावी पास अथवा बारावी पास असावा.

Germany Jobs Recruitement 2024 अधिकृत जाहिरात pdf व अर्ज करण्याची लिंक :

अर्ज सादर करीत असताना विशिष्ट कौशल्यावर आधारित कामाच्या अनुभवाविषयी स्वतंत्र माहिती अर्जामध्ये नमूद करावी. नमूद करण्यात आलेल्या माहितीच्या आधारेच उमेदवाराची निवड केली जाणार आहे. या संपूर्ण अभ्यासक्रमाच्या शुल्काची जबाबदारी महाराष्ट्र शासन उचलणार असून अभ्यासक्रमाच्या कुठल्याही टप्प्यावर उमेदवाराकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही परंतु अनुत्तीर्ण मुळे द्यावे लागणाऱ्या जर्मन भाषेच्या फेरपरीक्षांचे शुल्क अर्जदारांना द्यावे लागणार आहे त्यामुळे अर्जदारांनी गांभीर्य पूर्वक यासाठी अर्ज करायचा आहे.

या भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन आपला अर्ज भरणे आवश्यक आहे.

अर्ज करत असताना उमेदवारांनी स्वतःचे संपूर्ण नाव, जन्मतारीख त्यासोबतच व्हाट्सअप नंबर, ईमेल आयडी, जेंडर, तुमचा सध्याचा आणि कायमस्वरूपी चा पत्ता यांसारखी सविस्तर माहिती भरायची आहे आणि जर्मन भाषेच्या या कोर्ससाठी तुमचे रजिस्ट्रेशन पूर्ण करायचे आहे.

जर्मन भाषेचे संपूर्ण ज्ञान घेतल्यानंतर उमेदवारांना पुढील अपडेट हा कोर्स करत असताना दिले जाणार आहेत आणि त्यानंतर उमेदवारांची निवड होऊन उमेदवारांना जर्मनीमध्ये चांगल्या पगाराच्या नोकरीच्या संधी राज्य सरकारच्या वतीने दिल्या जाणार आहेत.

तुम्ही देखील चांगल्या नोकरीच्या शोधात असल्यास तुमच्यासाठी एक सुवर्णसंधी असणार आहे जिथे तुम्ही अवश्य लाभ घ्यायचा आहे.

Germany Jobs Recruitement 2024
📃या भरतीची अधिकृत जाहिरात pdf पाहण्यासाठीयेथे क्लिक करा
💻भरतीचा ऑनलाईन अर्ज करण्यासाठीयेथे क्लिक करा
महाराष्ट्र नोकरभरती जाहिराती पाहण्यासाठीयेथे क्लिक करा
🟢नोकरी ग्रुप जॉईन करण्यासाठीयेथे क्लिक करा
⏺️Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठीयेथे क्लिक करा