DTP Maharashtra Recruitement 2024 महाराष्ट्र राज्य नगररचना व मूल्यनिर्धारण विभाग अंतर्गत सरकारी नोकरीच्या संधी उपलब्ध झाल्या असून या भरतीचा अर्ज करण्यासाठी सर्व पात्र व इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू आहे. तुम्ही देखील या भरतीचा अर्ज करण्यासाठी पात्र व इच्छुक असल्यास तुम्ही लवकरात लवकर खाली दिलेल्या लिंक वर जाऊन तुमचा अर्ज व त्यासोबत सर्व आवश्यक कागदपत्रे सबमिट करणे आवश्यक आहे.
या भरतीमध्ये रचना सहाय्यक, उच्च श्रेणी लघुलेखक आणि निम्न श्रेणी लघुलेखक या पदासाठी उमेदवारांची निवड केली जाणार आहे. आणि अर्ज करण्यासाठी 29 ऑगस्ट 2024 पर्यंत उमेदवारांना मुदत देण्यात आली आहे.सदरील भरतीची प्रकाशित करण्यात आलेली अधिकृत जाहिरात, अर्ज करण्यासाठी आवश्यक शैक्षणिक व इतर पात्रता, वेबसाईट, परीक्षा शुल्क, मुदत आणि सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे.
DTP Maharashtra Bharti 2024 Notification :
महाराष्ट्र शासन राज्य नगररचना आणि मुल्यनिर्धारण विभाग अंतर्गत पुणे/कोकण/नाशिक/नागपूर/छत्रपती संभाजीनगर/अमरावती अंतर्गत उमेदवारांना रचना सहायक (गट-ब) अराजपत्रित,उच्चश्रेणी लघुलेखक (गट-ब) अराजपत्रित,उच्चश्रेणी लघुलेखक (गट-ब) अराजपत्रित,निम्नश्रेणी लघुलेखक (गट-ब) अराजपत्रित या संवर्गातील पदांसाठी उमेदवारांची निवड केली जाणार आहे.दररोज नवनवीन नोकरी अपडेट्स पाहण्यासाठी mhcorner.in नक्की आमच्या वेबसाईटला भेट द्या.
Maharashtra DTP Department released a notification for recruitement of posts naming Composition Assistant,Upper Level Shorthand and Lower Level Shorthand.To apply for this post candidates needs to submit their application online.There are total 289 vacant posts for which candidates will get selected.The last date for registration is 29 August 2024 and hence all interested candidates must submit their application before the last date.Official advertisement,Link for application,website,criteria and all details given below.DTP Maharashtra Recruitement 2024
महाराष्ट्र DTP विभागाच्या अधिकृत वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आलेला जाहिरातीनुसार या भरतीमध्ये एकूण 289 जागांसाठी उमेदवार अर्ज करू शकणार आहेत. या भरतीमध्ये उमेदवारांची निवड ही परीक्षेद्वारे केली जाणार आहे. तुम्हीही चांगल्या पगाराची नोकरी शोधत असल्यास लवकरात लवकर वेळ वाया न घालवता सर्व आवश्यक कागदपत्रांसह तुम्ही तुमचा अर्ज आजच सबमिट करायचा आहे.
DTP Maharashtra Recruitement 2024 अर्ज शुल्क,वयोमर्यादा,वेतनश्रेणी व कागदपत्रे :
अर्ज करण्यासाठी शुल्क –
- खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी : Rs.1000/-
- मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांसाठी Rs.900/-
अर्ज करण्याची प्रक्रिया – सदरील भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज स्विकारले जाणार आहेत.
वयोमर्यादा –
- खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी : 18 ते 38 वर्ष
- मागासवर्गीय/ महिला/ अपंग/ माजी सैनिक प्रवर्गासाठी 03-05 वर्ष सूट
वेतनश्रेणी – नियमानुसार (जाहिरात पहा)
आवश्यक कागदपत्रे –
- पासपोर्ट साईज फोटो
- आधार कार्ड/पासपोर्ट/मतदान कार्ड (ओळखीचा पुरावा)
- रहिवासी दाखला
- उमेदवाराची स्वाक्षरी
- शाळा सोडल्याचा दाखला
- शैक्षणिक कागदपत्रे
- उमेदवाराची स्वाक्षरी
- जातीचा दाखला
- नॉन क्रिमीलेअर
- डोमासाईल प्रमाणपत्र
- MSCIT किंवा इतर प्रमाणपत्रे आवश्यक असल्यास
- अनुभव असल्यास संबंधित प्रमाणपत्र
भरतीचा अर्ज करण्याची शेवटची मुदत – सदरील भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे 29 ऑगस्ट 2024 पर्यंत अंतिम मुदत देण्यात आली आहे.
सदरील भरतीची निवड प्रक्रिया – या भरतीमध्ये उमेदवारांची निवड परीक्षेद्वारे केली जाणार आहे.
DTP Maharashtra Recruitement 2024 पदे व शैक्षणिक पात्रता :
भरतीचे नाव – महाराष्ट्र शासन राज्य नगररचना आणि मुल्यनिर्धारण विभाग भरती 2024
भरती विभाग – DTP विभागात नोकरी मिळणार आहे.
भरती श्रेणी – सदरील भरतीमध्ये सरकारी नोकरीच्या संधी मिळणार आहेत.
पदाचे नाव – सदरील भरतीमध्ये रचना सहाय्यक,उच्चश्रेणी लघुलेखक,निम्नश्रेणी लघुलेखक या पदांसाठी हि भरती केली जाणार आहे.
उपलब्ध पदसंख्या – एकूण 289 जागांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे.
पदसंख्या तपशील –
- रचना सहाय्यक (गट ब) : 261
- उच्चश्रेणी लघुलेखक (गट ब) : 09
- निम्नश्रेणी लघुलेखक (गट ब) : 19
आवश्यक शैक्षणिक पात्रता –
- रचना सहाय्यक या पदाचा अर्ज करण्यासाठी उमेदवार स्थापत्य किंवा ग्रामीण स्थापत्य/नागरी ग्रामीण अथवा वास्तुशास्त्र डिप्लोमा किंवा बाधकाम तंत्रज्ञान डिप्लोमा असावा.
- उच्चश्रेणी लघुलेखक या पदाचा अर्ज करण्यासाठी उमेदवार मान्यताप्राप्त बोर्डातून 10वी पास असावा.उमेदवाराकडे लघुलेखन १२० श.प्र.मि. सोबत इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. किंवा मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. कोर्स झालेला असावा.
- निम्नश्रेणी लघुलेखक या पदाचा अर्ज करण्यासाठी उमेदवार मान्यताप्राप्त बोर्डातून 10वी पास असावा.उमेदवाराकडे लघुलेखन १२० श.प्र.मि. सोबत इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. किंवा मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. कोर्स झालेला असावा.
टीप – शैक्षणिक पात्रता बद्दल सविस्तर माहिती पाहण्यासाठी उमेदवारांनी जाहिरात पहायची आहे.
DTP Maharashtra Recruitement 2024 अर्ज करण्याची लिंक व अधिकृत जाहिरात pdf :
या भरतीसाठी सर्व पात्र व इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने आपले अर्ज करायचे आहेत.
ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची प्रक्रिया दिनांक 29 ऑगस्ट 2024 पर्यंत सुरू असणार आहे.
सदरील भरतीसाठी फक्त अधिकृत वेबसाईटवर जाऊनच उमेदवारांनी आपले अर्ज करायचे आहेत.
अर्ज करण्यापूर्वी आवश्यक सर्व पात्रता तपासण्यासाठी उमेदवारांनी दिलेली अधिकृत जाहिरात पीडीएफ तपासून आपले अर्ज करायचे आहेत.
अर्जामध्ये विचारण्यात आलेली सर्व माहिती योग्य रित्या भरायची आहे अपूर्ण असलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.
मोबाईल मधून अर्ज करत असताना वेबसाईट ओपन न झाल्यास उमेदवारांनी शो डेस्कटॉप साईट यावर क्लिक करायचे आहे किंवा मोबाईल मधून लँडस्केप मोड सिलेक्ट करायचा आहे.
आवश्यक असणारे सर्व कागदपत्रे व्यवस्थित रित्या स्कॅन करून सबमिट करायचे आहेत.
पासपोर्ट साईज फोटो अपलोड करत असताना तो रिसेंट मधीलच असावा आणि त्यावर शक्यतो तारीख असावी.
मोबाईल नंबर व ई-मेल आयडी चालू असावा कारण पुढील सर्व माहिती एसएमएस द्वारे किंवा ई-मेलद्वारे पोरांना दिली जाणार आहे.
उमेदवारांची निवड ही परीक्षेद्वारे केली जाणार असल्याने परीक्षा शुल्क भरायची आहे.
परीक्षा शुल्क भरल्यानंतरच अर्ज सबमिट होणार आहेत.
एकदा सबमिट झालेले अर्ज उमेदवार पुन्हा एडिट करू शकणार नाहीत त्यामुळे एक सबमिट करण्यापूर्वी व्यवस्थित तपासायचे आहे.
📃या भरतीची अधिकृत जाहिरात pdf पाहण्यासाठी | येथे क्लिक करा |
💻भरतीचा ऑनलाईन अर्ज करण्यासाठी | येथे क्लिक करा |
✅महाराष्ट्र नोकरभरती जाहिराती पाहण्यासाठी | येथे क्लिक करा |
🟢नोकरी ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा |
⏺️Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा |