लाडकी बहिण मार्च हफ्ता 1500 रुपये या महिलांना जमा होणार कधी येणार पैसे ? Ladaki Bahin March Hafta Date

Ladaki Bahin March Hafta Date मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राज्यातील सर्वाधिक चर्चेत असलेली आणि महिलांच्या पसंतीस उतरलेली योजना म्हणून मागील वर्षभरापासून प्रसिद्ध आहे. विधानसभा निवडणुकीच्या वेळी गेम चेंजर म्हणून ठरलेल्या या योजनेसाठी आता महिलांना मागील दोन दिवसात जागतिक महिला दिनानिमित्त फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा हप्ता एकत्रित देणार असल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली होती.

टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

त्यानुसार दिनांक 07 मार्च 2025 रोजी महिलांच्या बँक खात्यावर प्रत्यक्षात निधी देखील जमा होण्यास सुरुवात झाली परंतु 3000 रुपयांची अपेक्षा लावून बसलेल्या महिलांना प्रत्यक्षात मात्र 1500 रुपयेच मिळाले आणि त्यामुळेच आपली फसवणूक झाली का किंवा आम्हाला जे आश्वासन दिले होते की दोन महिन्यांचे एकत्रित पैसे येतील ते पैसे का आले नाहीत असे अनेक प्रश्न महिलांना पडले परंतु आता मार्च महिन्याच्या हप्त्या वितरणाबद्दल तारीख आणि सविस्तर माहिती देखील सांगण्यात आलेली आहे आणि ती तुम्ही खाली पाहू शकणार आहात.

Ladki Bahin 8th Installment Date :

मित्रांनो लाडकी बहीण योजनेचे जे पंधराशे रुपये महिलांच्या बँक खात्यामध्ये काल आणि परवा जमा करण्यात आले आहेत हे पैसे हे फेब्रुवारी महिन्याचा हप्ता असल्याचे महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांच्याकडून स्पष्ट करण्यात आले आहे आणि त्यासोबतच आम्ही आश्वासन दिले होते की महिला दिनानिमित्त आम्ही फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा हप्ता एकत्रित महिलांच्या बँक खात्यावर जमा करणार आहोत ते आश्वासन देखील आम्ही पाळणार आहे.

याचाच अर्थ मार्च महिन्यातला हप्ता जो देखील पंधराशे रुपये प्रमाणेच सर्व पात्र भगिनींच्या बँक खात्यावर लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावर दिनांक 12 मार्च 2024 च्या आधी आम्ही जमा करणार आहोत असे देखील महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी फेसबुक पोस्ट आणि त्यासोबतच ट्विटरवर ट्विट करून देखील याबद्दलची सविस्तर माहिती दिलेली आहे.Ladaki Bahin March Hafta Date

Ladki Bahin Yojana New Update :

याचाच अर्थ ज्या लाडक्या बहिणींना 1500 रुपये मागील दोन दिवसांमध्ये जमा झाले आहेत त्या सर्व लाडक्या बहिणींना पुन्हा एकदा येत्या दोन ते तीन दिवसांमध्येच 1500 रुपये जमा होणार आहेत आणि हा मार्च महिन्याचा हप्ता जमा झाल्यानंतर लाडक्या बहिणींना फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे मिळून 3000 रुपये मिळणार आहेत. हे पैसे जमा झाल्यानंतर लाडकी बहीण योजनेअंतर्गत चा नववा हप्ता देखील सर्व महिलांना मिळणार असून यामुळे लाडक्या बहिणींमध्ये देखील आनंदाचे वातावरण आहे.

लाडकी बहिण २१०० रुपये कधीपासून येणार ?

2100 रुपयांचा निर्णय कधी होणार याकडे देखील संपूर्ण राज्यातील लाडक्या बहिणी लक्ष लावून आहेत कारण विधानसभा निवडणुका झाल्यानंतर आमचे सरकार सत्तेत आल्यास आम्ही सर्व पात्र लाडक्या बहिणींना महिन्याला 2100 रुपये देऊ असे आश्वासन माहिती सरकारने दिले होते आणि त्यामुळे या बजेटमध्ये हा निर्णय होईल का नाही याकडे देखील सर्व महिला लक्ष देऊन आहेत.Ladaki Bahin March Hafta Date

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
Ladaki Bahin March Hafta Date
📃योजना अधिकच्या माहितीसाठीयेथे क्लिक करा
महाराष्ट्र योजना ग्रुप जॉईन करण्यासाठीयेथे क्लिक करा