Anganwadi Bharti 2025 Document List महाराष्ट्र राज्य महिला व बाल विकास विभाग अंतर्गत यावर्षीची सर्वात मोठी मेगा भरती नोकरी प्रक्रिया सुरू होणार असून या भरतीमध्ये सर्व पात्र व इच्छुक महिलांनी लवकरात लवकर आपले अर्ज करायचे आहेत. राज्यभरातील सर्व लाडक्या बहिणीसाठी त्यामुळे पुन्हा एकदा आनंदाची बातमी येत आहे आणि महिलांना आता कायमस्वरूपी आणि सरकारी नोकरी रोजगाराच्या संधी उपलब्ध झालेल्या आहेत.
महाराष्ट्र राज्य महिला व बाल विकास विभाग अंतर्गत अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी मदतनीस या पदासाठी जम्बो नोकर भरती प्रक्रिया दिनांक 14 फेब्रुवारी 2025 पासून सुरू करण्यात येत आहे सदरील भरतीमध्ये एकूण 18882 जागांसाठी महिलांना नोकरी मिळणार आहे.यासाठी पात्रता काय असणार आहे तसेच कोण अर्ज करू शकते याबद्दलची सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे.
Maharashtra Anganwadi Bharti 2025 :
महाराष्ट्र शासन यावर्षी तब्बल 70 हजार रिक्त जागांची भरती करणार आहे आणि यामध्येच महिला व बाल विकास विभाग यांच्या अंतर्गत 14 फेब्रुवारी 2025 ते 03 मार्च 2025 दरम्यान अंगणवाडी अंतर्गत मुख्य सेविका किंवा अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी मदतनीस या पदासाठी देखील भरती प्रक्रिया राबवली जात आहे आणि यामध्ये सर्व पात्र व इच्छुक महिलांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहेत.
महाराष्ट्र राज्य महिला व बाल विकास विभाग यांच्या अंतर्गत राज्यातील जवळपास सर्व जिल्ह्यांमध्ये सध्या अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी मदतनीस या पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू आहे. मित्रांनो सदरील भरती प्रक्रिया ही संपूर्णपणे ऑफलाइन पद्धतीने पार पडण्यात येणार आहे कारण यामध्ये स्थानिक रहिवासी असणाऱ्या महिलांनाच नोकरीची संधी मिळणार आहे.
तुम्हाला देखील या भरती बद्दलची तुमच्या गावातील अथवा तालुक्यातील जाहिरात पाहिजे असल्यास तुम्हाला तालुका पातळीवर अथवा गावामध्ये देखील जाऊन या संदर्भातील चौकशी करायच्या आहेत याबद्दलची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे का हे तपासून तुम्हाला रिक्त जागा असल्यास यामध्ये फॉर्म आणि त्यासोबत खाली दिलेली सर्व कागदपत्रे जोडून अंतिम मुदत संपण्याआधी सबमिट करणे अनिवार्य असणार आहे.Anganwadi Bharti 2025 Document List
Anganwadi Bharti 2025 Maharashtra Documents :
ओळख प्रमाणपत्र – ओळखीचे प्रमाणपत्र म्हणून यामध्ये उमेदवार आधार कार्ड देऊ शकतात.
रहिवासी प्रमाणपत्र – या भरतीचा अर्ज करण्यासाठी संबंधित महिलेकडे तहसील कार्यालयातून मिळालेले रहिवासी प्रमाणपत्र अर्जासोबत जोडणे बंधनकारक असणार आहे.
शैक्षणिक पात्रता प्रमाणपत्र – अर्ज करणारे उमेदवार किमान 12वी पास असणे आवश्यक आहे त्यामुळे संदर्भातील प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे पदवीचे अथवा पदव्युत्तर पदवीधर शिक्षण घेतले असल्यास संदर्भातील प्रमाणपत्र देखील उमेदवारांनी अर्जासोबत जोडायचे आहेत.
लहान कुटुंब संबंधित प्रमाणपत्र – अंगणवाडी भरतीसाठी कुटुंब नियोजन धोरण अंतर्गत लहान कुटुंब असलेलेच उमेदवार अर्ज करण्यास पात्र असल्याने त्या संदर्भातील देखील प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
MSCIT प्रमाणपत्र – उमेदवाराचे MSCIT अथवा कंप्यूटर कोर्स झाला असल्यास ते प्रमाणपत्र देखील जोडायचे आहे.
जातीचे प्रमाणपत्र – अर्ज करणारा उमेदवार हा आरक्षित प्रवर्गाचा असल्यास संबंधित उमेदवाराकडे सक्षम प्राधिकरणाने दिलेले जात प्रमाणपत्र देखील असणे आवश्यक आहे आणि ते देखील अर्जासोबत जोडणे अनिवार्य आहे.
विधवा महिला असल्यास प्रमाणपत्र – अर्ज करणारी उमेदवार महिला विधवा असल्यास त्या संदर्भातील देखील प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.

💻अंगणवाडी भरती रिक्त जागा पाहण्यासाठी | येथे क्लिक करा |
✅महाराष्ट्र नोकरभरती जाहिराती पाहण्यासाठी | येथे क्लिक करा |
🟢नोकरी ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा |