या लाडक्या बहिणींना जानेवारी महिन्याचा हफ्ता 3000 रुपये मिळणार यादिवशी होणार जमा | Ladki Bahin January Installment Date

Ladki Bahin January Installment Date राज्यातील सर्व लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी आहे कारण मागील काही दिवसांपासून सर्व महिला ज्या योजनेच्या हप्त्याची वाट पाहत होत्या त्याच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेच्या जानेवारीच्या हप्त्याची तारीख निश्चित झाली आहे आणि त्यामुळेच आता महिलांच्या बँक खात्यावर पैसे देखील येणार आहेत.

Whatsapp Channel लिंक येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

Ladaki Bahin Yojna Maharashtra 2025

महाराष्ट्र सरकारने राज्यातील सर्व महिलांना लाभ देण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेची घोषणा केली आणि त्यानुसारच योजनेसाठी त्वरित अंमलबजावणी देखील सुरू करण्यात आली आणि अंमलबजावणीनंतर महिलांच्या बँक खात्यावर पैसे देखील जमा होण्यास सुरुवात झाली. जुलै महिन्यामध्ये या योजनेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सरकारद्वारे सुरू करण्यात आली होती आणि यामध्ये ऑनलाईन आणि ऑफलाइन अशा दोन्ही पद्धतीने अर्ज सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती.

लाडकी बहीण योजनेबद्दल बोलायचे झाल्यास सुरुवातीला ज्यावेळी या योजनेची राज्य सरकार द्वारे अंमलबजावणी सुरू झाली त्यावेळी लाडकी बहीण योजनेसाठी महाराष्ट्र राज्यातून सुमारे अडीच कोटी महिला लाभार्थी ठरतील असे सांगण्यात आले होते. आणि आचारसंहितेपूर्वीच महिलांच्या खात्यामध्ये काही हप्ते द्यायचे असल्याने अगदी त्वरित या योजनेसाठी नोंदणी प्रक्रिया सुरू केली होती आणि त्याद्वारेच महिलांनी उत्सर्फ असा प्रतिसाद देऊन या योजनेचे स्वीकार केला.Ladki Bahin January Installment Date

Ladki Bahin Next Installment List 2025

लाडकी बहीण योजनेअंतर्गत सुरुवातीला जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर आणि नोव्हेंबर असे 05 महिन्यांचे हप्ते लाभार्थी महिलांच्या बँक खात्यावर जमा करण्यात आले. महाराष्ट्र विधानसभा निवडणुका नंतर योजनेचा पुढील हप्ता म्हणजेच डिसेंबर महिन्याचा हप्ता 24 डिसेंबर ते 31 डिसेंबर 2024 यादरम्यान महिलांच्या बँक खात्यावर जमा करण्यात आला.

या महिलांना मिळणार जानेवारीचा हफ्ता 3000 रुपये –

परंतु काही महिलांच्या बँक खात्यावर पूर्वीचे सर्व हप्ते मिळाले होते परंतु डिसेंबर चा हप्ता मिळाला नाही आणि त्यामुळेच अशा महिलांच्या बँक खात्यावर आता जानेवारी महिन्यामध्ये डिसेंबर आणि जानेवारी दोनही महिन्यांचे मिळून 3000 रुपये जमा होणार असल्याने महिलांमध्ये नक्कीच आनंदाचे वातावरण आहे.

Ladki Bahin January Installment Date

लाडकी बहिण जानेवारी हफ्ता कधी मिळणार ?

लाडकी बहीण योजनेचा जानेवारी महिन्याचा हप्ता हा 26 जानेवारी 2025 पर्यंत सर्व पात्र महिलांच्या बँक खात्यावर जमा होणार असल्याची माहिती आज महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे. आता यास 2-3 दिवस आधीच सुरुवात होणार आहे आणि 26 तारखेपर्यंत सर्व महिलांच्या बँक खात्यावर या योजनेचा हप्ता जमा होणार आहे.

ज्या महिलांना डिसेंबर महिन्यामध्ये देखील लाडकी बहीण योजनेअंतर्गत पैसे मिळाले होते अशा सर्व पात्र लाभार्थी महिलांना नेहमीच्या हप्त्याप्रमाणेच 1500 रुपये मिळणार आहेत.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
Ladki Bahin January Installment Date
📃लाडकी बहिण योजना यादी पाहण्यासाठीयेथे क्लिक करा
लाडकी बहिण अधिकची माहिती पाहण्यासाठीयेथे क्लिक करा
🟢 योजना ग्रुप जॉईन करण्यासाठीयेथे क्लिक करा