Majhi Ladki Bahin Yojana List 2024 मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी संपूर्ण महाराष्ट्र राज्यातून महिला अर्ज करत आहेत. एप्लीकेशन द्वारे, पोर्टल द्वारे आणि ऑफलाइन पद्धतीने देखील योजनेसाठी अर्ज स्वीकारले जात असल्याने लाभार्थी संख्या देखील दिवसेंदिवस वाढत आहे अर्ज करून बरेच दिवस झाल्यानंतर आता योजनेची लाभार्थी यादी अथवा कन्फर्मेशन कधी येणार याबाबत महिला चौकशी करत असल्याचे पाहायला मिळत आहे. योजनेची लाभार्थी यादी आता या दिवशी प्रसिद्ध होणार आहे, यासोबतच हप्त्याची तारीख देखील निश्चित करण्यात आली असून महिलांना एकाच दिवशी ३००० रुपये देण्यात येणार आहेत याबाबतची सविस्तर माहिती तुम्ही खाली पाहू शकणार आहात.
माझी लाडकी बहिण योजना नवीन अपडेट :
लाडकी बहीण योजनेचा अर्ज करण्यासाठी आता पुन्हा एकदा नवीन शासन निर्णय जारी करण्यात आलेला असून यामध्ये आता महिलांना अधिकच सूट मिळणार आहेत आणि त्यामुळेच जास्तीत जास्त महिला आता योजनेचा लाभ घेऊ शकणार आहेत. सुरुवातीपासूनच शक्य होईल एवढ्या जास्त महिलांनी योजनेचा लाभ घेण्यासाठीच राज्य सरकारच्या वतीने शासन निर्णयांमध्ये बदल करण्यात येत आहेत.
२.५ कोटी महिलांनी योजनेचा लाभ घेण्याचे सरकारचे टार्गेट आहे आणि योजनेसाठीच एका वर्षाकरिता तब्बल 46 हजार कोटींचे बजेट राज्य सरकार द्वारे ठेवण्यात आलेले आहे आणि मंजूर देखील करण्यात आले. राज्यभरात नगरपंचायत, पंचायत समिती तसेच ग्रामपंचायत स्तरावर देखील विविध कॅम्पचे आयोजन करून महिलांकडून अर्ज देखील भरून घेतले जात असल्याने योजनेच्या लाभार्थी यादीमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ होणार आहे आणि जास्तीत जास्त पात्र महिला योजनेचा लाभ घेऊ शकणार आहेत.Majhi Ladki Bahin Yojana List 2024
माझी लाडकी बहिण योजना New GR :
नवीन शासन निर्णयानुसार खालील बाबींमध्ये आता महिलांना सूट मिळणार आहे :
- ज्या महिलांचे नाव रेशनिंग कार्ड वर नसेल अशा नवविवाहित महिला आता त्यांच्या पतीचे रेशनिंग कार्ड आणि मॅरेज सर्टिफिकेट अपलोड करून योजनेचा लाभ घेऊ शकणार आहेत.
- ज्या महिलांकडे 15 वर्ष जुना रहिवासी दाखला नसल्यास अशा महिला पतीचा देखील शाळा सोडल्याचा दाखला अपलोड करू शकणार आहेत जेणेकरून अधिक महिला योजनेसाठी पात्र होणार आहेत.
- सुरुवातीला नारीशक्ती दूत एप्लीकेशन मधून अर्ज करताना सबमिट करता वेळी महिलांचा लाईव्ह फोटो घेणे आवश्यक होते परंतु आता ही देखील अट बाजूला करण्यात आली असून तुम्ही पासपोर्ट साईज फोटो देखील महिलांचा अपलोड करून योजनेचा अर्ज सबमिट करू शकणार आहात.
- तसेच ज्या महिला पीएम किसान, नमो शेतकरी योजना अथवा निराधार योजना यांसारख्या योजनांचा लाभ घेत आहेत त्या महिलांचा डेटा आणि आधार ऑथेंतिकेशन सरकारकडे आधीच असल्याने अशा महिलांना कोणत्याही प्रकारचा ऑनलाइन फॉर्म भरण्याची आवश्यकता नाही आणि यांनी केवळ ऑफलाइन पद्धतीने अंगणवाडी सेविकांकडे अर्ज भरून दिल्यास अशा महिलांना थेट लाभ दिला जाणार आहे.
👉माझी लाडकी बहिण योजना नवीन GR व यादी पहा
माझी लाडकी बहिण योजना लाभार्थी यादी यादिवशी होणार प्रसिद्ध :
योजनेसाठी सर्व महिलांनी अर्ज केले आहेत परंतु एप्लीकेशन मध्ये सगळीकडे पेंडिंग दाखवत असल्याने महिला आता हे अप्रोवल होऊन लाभार्थी यादी कधी येणार याबाबत चौकशी करत असल्याचे पाहायला मिळत आहे मित्रांनो याबाबत अर्ज यांची छाननी करून ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये लाभार्थी यादी येण्याची दाट शक्यता संबंधित विभागाकडून वर्तवली जात आहे.
लाभार्थी यादी प्रसिद्ध करून त्यानंतर चुकून काही महिला अपात्र ठरल्या असल्यास त्यांना यादीवर आक्षेप घेण्यासाठी देखील मुदत देण्यात येणार असल्याने ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात योजनेची लाभार्थी यादी येणार आहे.लाभार्थी यादी तुम्ही एप्लीकेशन वर अथवा पोर्टलवर पाहू शकणार आहात आणि यादी प्रसिद्ध झाल्यानंतर यामध्ये तुमचे नाव नसल्यास परंतु तुम्ही पात्र असल्यास तुम्हाला आक्षेप देखील घेता येणार आहे असे देखील सांगण्यात येत आहे. यामुळेच तुम्ही लवकरात लवकर योजनेसाठी तुमचे अर्ज केले नसल्यास करायचे आहे आणि या योजनेचा लाभ घ्यायचा आहे.Majhi Ladki Bahin Yojana List 2024
लाडकी बहिण योजना नवीन GR पाहण्यासाठी | येथे क्लिक करा |
लाडकी बहिण योजना सविस्तर अर्जप्रक्रिया पाहण्यासाठी | येथे क्लिक करा |
योजना ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा |
Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा |
माझी लाडकी बहिण योजना यादिवशी जमा होणार 3000 रुपये :
लाडक्या बहिणी योजनेच्या हप्त्याबद्दल बोलायचे झाल्यास बहिणीला रक्षाबंधनाला भावाकडून भेट म्हणून माझी लाडकी बहीण योजनेचे दोन हप्ते जमा केले जाणार आहेत. 15 ऑगस्ट च्या शुभमुहूर्तावर महिलांच्या बँक खात्यामध्ये या योजनेचे जुलै महिन्याचा आणि ऑगस्ट महिन्याचा एकत्रित हप्ता वितरित करण्यात येणार आहे आणि हा हप्ता वितरित करण्यासाठी सर्व पूर्वतयारी देखील झाली आहे. त्यामुळेच तुम्ही ऑगस्ट महिन्याच्या आधीच तुमचे अर्ज भरून घ्यायचे आहेत जेणेकरून तुम्हाला 15 ऑगस्टला एकाच दिवशी ३००० रुपये बँक खात्यावर मिळणार आहेत.Majhi Ladki Bahin Yojana List 2024