Mazi Ladki bahin Yojana Online Apply मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अखेरीस अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून यासाठी मोबाईल ॲप्लिकेशन मधून सर्व पात्र महिला घरबसल्या अगदी काही मिनिटांमध्ये आपला अर्ज करू शकणार आहेत ही अर्ज करण्याची सविस्तर प्रक्रिया तुम्हाला समजावून सांगितले आहे त्यासोबतच कागदपत्रांची माहिती आणि सर्वच सविस्तर तुम्हाला आज सांगण्यात आले आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कागदपत्रे :
महाराष्ट्र राज्याच्या सुरू असलेल्या अधिवेशनामध्ये सर्व बहिणींसाठी म्हणजेच महिलांना अत्यंत महत्त्वाचे असलेल्या या योजनेची घोषणा करण्यात आली आणि त्यानंतर या योजनेसाठी त्वरित अर्ज करण्याची देखील प्रक्रिया सुरू होणार असल्याची माहिती देण्यात आली सुरुवातीला या योजनेसाठी अत्यंत जाचक अटी त देखील घातल्या गेल्या होत्या आणि त्यामुळे अनेक महिला या योजनेच्या लाभापासून वंचित राहत असल्याचे लक्षात येत होते.
या सर्व बाबी लक्षात घेऊन या योजनेमध्ये असणाऱ्या अनेक अटी तसेच कागदपत्रांच्या पूर्ततेसाठी सरकारने काल पुन्हा एकदा नव्याने शासन निर्णय प्रसिद्ध केला आणि यानुसार अनेक कागदपत्रांची आता यातून आवश्यकता नसल्याचे या शासन निर्णयाद्वारे लक्षात येत आहे.
आता फक्त हीच कागदपत्रे आवश्यक असणार –
योजनेचा लाभ घेण्यासाठी आता केवळ उमेदवाराकडे खालील कागदपत्रांची आवश्यकता असणे अनिवार्य आहे.
- लाभार्थी महिलेचे आधार कार्ड
- बँकेचे पासबुक
- अधिवास प्रमाणपत्र : यासाठी उमेदवार 15 वर्षांपूर्वीचे जुने असणारे रेशन कार्ड, 15 वर्षांपूर्वीचे जुने मतदान कार्ड, उमेदवारांचा जुना शाळा सोडल्याचा दाखला अथवा जन्माचा दाखला देखील अधिवास प्रमाणपत्र म्हणून चालणार आहे.
- उत्पन्नाचे प्रमाणपत्र : २.५ लाखांपेक्षा कमी उत्पन्नाचे प्रमाणपत्र उमेदवाराकडे असावे आणि नसल्यास या ठिकाणी पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड तुम्ही अपलोड करू शकणार आहात.
- हमीपत्र – प्रिंट करून सही करायची आहे.
माझी लाडकी बहिण योजना Online Apply Link :
मित्रांनो या योजनेचा अर्ज करण्यासाठी आता मोबाईल ॲप्लिकेशन मधून सुरुवात झाली असून यामधून अगदी काही मिनिटांमध्ये तुम्ही तुमचे अर्ज घरबसल्या सबमिट करू शकणार आहात यासाठी तुमच्याकडे आवश्यक असणाऱ्या कागदपत्रांची पूर्तता करणे अनिवार्य असणार आहे आणि अर्ज करण्यासाठीची सविस्तर प्रक्रिया खाली देण्यात आली आहे.
- मित्रांनो यासाठी सुरुवातीला तुम्हाला तुमच्या मोबाईल मध्ये प्ले स्टोअर मध्ये जाऊन नारीशक्ती दूत हे ॲप्लिकेशन डाऊनलोड करून घ्यायचे आहे.
- एप्लीकेशन डाउनलोड केल्यानंतर सुरुवातीला तुम्हाला यामध्ये तुमची प्रोफाइल अपडेट करून घ्यावी लागणार आहे.
- सुरुवातीला तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकून लॉगिन या बटणावर क्लिक करायचे आहे लॉगिन बटणावर क्लिक केल्यानंतर तुमच्या मोबाईलवर तुम्हाला चार अंकी ओटीपी येणार आहे तो ओटीपी टाकून स्वीकारा या बटनावर क्लिक करून तुम्हाला पुढे जायचे आहे.
- यानंतर तुम्हाला तुमची वैयक्तिक माहिती प्रोफाइल अपडेट साठी विचारली जाणार आहे ज्यामध्ये तुमचे नाव, ईमेल आयडी, तुमचा जिल्हा, तालुका आणि नारीशक्ती प्रकार निवडावा लागणार आहे.
- नारीशक्ती प्रकारामध्ये तुम्ही स्वतःसाठी अर्ज करत असल्यास त्या ठिकाणी तुम्हाला सामान्य महिला यावर क्लिक करायचे आहे आणि पुढे जायचे आहे.
- प्रोफाइल अपडेट झाल्यानंतर तुम्हाला होम पेजवर यायचे आहे आणि त्या ठिकाणी तुम्हाला खाली योजना या पर्यायावर क्लिक करून त्यानंतर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेच्या पर्यायावर क्लिक करायचे आहे यानंतर तुम्हाला फॉर्म ओपन होणार आहे या फॉर्ममध्ये तुम्हाला विचारलेली सर्व माहिती तुम्ही सविस्तर भरायची आहे.
- यामध्ये जन्मस्थळ असेल, तुमचा पत्ता असेल, तुमचा जन्म दिनांक, तुमचे संपूर्ण नाव पतीचे नाव यांसारखी सर्व माहिती भरून त्यानंतर तुम्हाला तुमच्या बँकेचा तपशील व्यवस्थित भरायचा आहे.
- बँकेचा तपशील भरताना त्या ठिकाणी आयएफएससी कोड, बँक अकाउंट नंबर याची खात्री करून घ्यायची आहे आणि तुम्ही इतर कुठल्या योजनेचा लाभ घेत नाही हे देखील तुम्हाला त्या ठिकाणी सिलेक्ट करायचे आहे.Mazi Ladki bahin Yojana Online Apply
महत्वाची टीप – सर्व कागदपत्रांची साईज हि १MB पेक्षा कमी असणे आवश्यक आहे.
माझी लाडकी बहिण योजना आवश्यक कागदपत्रे :
सर्व माहिती भरल्यानंतर तुम्हाला खाली आवश्यक असणारी कागदपत्रे जोडायची आहेत ज्यामध्ये तुम्हाला वरती सांगितल्याप्रमाणे आधार कार्ड, अधिवास प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला, रेशनिंग कार्ड आणि याला समतोल असणारी दुसरे देखील कागदपत्र तुम्ही जोडू शकणार आहात आणि सर्व माहिती भरल्यानंतर तुम्हाला एप्लीकेशन मधूनच लाभार्थी महिलेचा फोटो लाईव्ह काढायचा आहे आणि हा फोटो काढल्यानंतर तुम्ही खाली जतन करा या बटणावर क्लिक करून अर्ज सबमिट करायचा आहे.
माझी लाडकी बहिण योजना नवीन शासन निर्णय नुसार अपात्र असलेल्या महिला –
- ज्या महिलांच्या कुटुंबातील सदस्य आयकर दाता आहेत अशा कुटुंबातील महिला देखील अपात्र ठरणार आहेत.
- ज्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित अथवा कायम कर्मचारी, कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम, मंडळ भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहे किंवा सेवानिवृत्तीनंतर प निवृत्ती वेतन घेत आहे अशा देखील महिला अपात्र ठरणार आहे.
- सदर लाभार्थी महिलेने शासनाच्या इतर विभागांमार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे रुपये १५०० पेक्षा जास्त लाभ घेतला असेल अशा देखील महिला अपात्र ठरणार आहेत.
- ज्यांच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार अथवा आमदार आहेत किंवा इतर कुठल्याही बोर्डाचे अध्यक्ष उपाध्यक्ष किंवा संचालक आहेत अशा देखील महिला अपात्र ठरणार आहे.
- ज्यांच्याकडे चार चाकी वाहन ( ट्रॅक्टर वगळून) कुटुंबातील कोणत्याही सदस्याच्या नावावर असल्यास अशा महिला देखील या योजनेचा लाभ घेण्यासाठी अपात्र आहेत.Mazi Ladki bahin Yojana Online Apply
योजनेचा अधिकृत शासननिर्णय पाहण्यासाठी | येथे क्लिक करा |
हमीपत्र डाउनलोड करण्यासाठी | येथे क्लिक करा |
योजनेची अधिकची माहिती पाहण्यासाठी | येथे क्लिक करा |
योजना ग्रुप जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा |