Majhi Ladki Bahin Yojana Update नमस्कार मित्रांनो राज्य सरकार द्वारे यंदाच्या अधिवेशनामध्ये जाहीर केलेली सर्वात महत्त्वाची योजना म्हणजेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेबद्दल आता एक महत्त्वाचे अपडेट समोर येत आहे. यामधील अटींमध्ये तसेच कागदपत्रांमध्ये आता मोठा बदल करण्यात आला आहे आणि अनेक महिलांच्या तसेच विरोधी पक्षांच्या नेत्यांच्या मागणीनंतर या योजनेत देखील अपडेट करण्याबाबतचा अधिकृत शासन निर्णय आता प्रसिद्ध करण्यात आला आहे. याबद्दलची सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना नवीन शासननिर्णय :
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राज्यभरात ही योजना सुरू केल्यानंतर या योजनेवर मोठ्या प्रमाणावर विरोधकांकडून टीका करण्यात आल्या कारण यामध्ये टाकलेल्या जाचक अटी असतील किंवा कागदपत्रांची पूर्तता असतील यासोबतच अर्ज करण्याची मुदत असेल या सर्वांमुळेच सेतू केंद्रांवर तसेच ग्रामपंचायत मध्ये मोठ्या प्रमाणावर महिला गर्दी करत होत्या आणि यामुळेच या योजनेचा सर्व बाबतीत पुनर्विचार करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली होती त्यानुसारच आता नवीन अपडेट समोर आली आहे आणि त्यामध्ये खालील सर्व माहिती देण्यात आली आहे.
०५ एकर शेती संदर्भातील अट देखील आता नसणार –
- या योजनेच्या पात्रतेमध्ये अधिवास प्रमाणपत्र आवश्यक असल्याचे नमूद करण्यात आले होते म्हणजेच की डोमासाईल सर्टिफिकेट कंपल्सरी करण्यात आले होते परंतु आता अनेक महिला लाभार्थींकडे हे प्रमाणपत्र उपलब्ध नसल्यामुळे त्याऐवजी महिला पंधरा वर्षांपूर्वीचे रेशन कार्ड, मतदार ओळखपत्र, शाळा सोडल्याचा दाखला अथवा जन्म दाखला यापैकी कोणतेही ओळखपत्र अथवा प्रमाणपत्र या योजनेसाठी ग्राह्य धरले जाणार आहे.
- तसेच पूर्वी या योजनेच्या लाभार्थी महिलेच्या कुटुंबाकडे एकत्रित ०५ एकर जमीन असल्यास या महिलेला लाडकी बहीण या योजनेच्या लाभापासून वंचित ठेवण्यात आले होते यादेखील मागणीवर अनेकांनी पुनर्विचार करण्यासाठी सरकारला आवाहन केले होते आणि यानुसारच आज जाहीर करण्यात आलेल्या शासन निर्णयामध्ये हा देखील निर्णय आता रद्द केला आहे आणि त्यामुळेच आता ज्या शेतकरी कुटुंबाच्या एकत्रित नावावर ०५ एकर जमीन असणार आहे अशा देखिल महिला या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र आहेत.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना पात्रता व अटी :
लाभ घेण्याची वयोमर्यादा वाढवली –
तसेच नवीन प्रसिद्ध करण्यात आलेल्या शासन निर्णयामधून या योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांचे वयोगट जोपूर्वी 21 ते 60 वर्षे करण्यात आला होता तो आता 21 ते 65 वर्ष करण्यात आला आहे.
त्यामुळेच आता या योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांच्या संख्येमध्ये वाढ देखील होणार आहे. ज्या महिलेचा जन्म पर राज्यात झाला आहे अशा महिलांनी महाराष्ट्रातील अधिवास असणाऱ्या पुरुषाबरोबर विवाह केला असल्यास अशा वेळेस त्यांना त्यांच्या पतीचा जन्म दाखला अथवा शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र अथवा अधिवास प्रमाणपत्र असल्यास यादेखील महिलांना या योजनेचा लाभ घेण्यासाठी ग्राह्य धरले जाणार आहे.
या महिलांना नाही लागणार उत्पन्नाचे प्रमाणपत्र –
उत्पन्नाच्या दाखल्याबद्दल देखील काढण्यासाठी जास्त वेळ लागत असल्याचे महिलांकडून सांगण्यात येत होते आणि यामुळेच आता ज्या महिलांचे वार्षिक उत्पन्न कमी आहे म्हणजेच की २.५ लाखांपेक्षा कमी वार्षिक उत्पन्न आहे परंतु काही कारणामुळे महिलांकडे उत्पन्नाचा दाखला उपलब्ध नसेल तर अशा महिला त्यांच्या कुटुंबाचे असणारे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड दाखवून या योजनेचा लाभ घेण्यास पात्र आहेत म्हणजेच की उत्पन्नाचे प्रमाणपत्र देखील लागणार नाही.
कुमारिकांना देखील घेता येणार लाभ –
योजनेच्या पूर्वीच्या शासन निर्णयानुसार या योजनेचा लाभ घेण्यासाठी विवाहित, विधवा, घटस्फोटीत याच महिला पात्र होत्या म्हणजेच की कुमारी का असल्यास या योजनेचा लाभ देण्यात येणार नव्हता परंतु आता प्रसिद्ध करण्यात आलेल्या शासन निर्णयामध्ये सदर योजनेत कुटुंबातील एका पात्र अविवाहित महिलेला सुद्धा या योजनेचा लाभ घेता येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना अर्ज मुदत :
या योजनेसाठी सुरुवातीला दिनांक 01 जुलै 2024 ते दिनांक १५ जुलै 2024 एवढ्या फक्त पंधरा दिवसांचीच मुदत देण्यात आली होती आणि यामुळेच अनेक महिला या सेतू केंद्रावर असेल किंवा ग्रामपंचायत कार्यालय अथवा तहसील कार्यालयात जाऊन आपला अर्ज भरण्यासाठी गर्दी करत असल्याचे संपूर्ण महाराष्ट्रात चित्र दिसत होते. यावरच पर्याय म्हणून मुख्यमंत्र्यां द्वारे निवेदन करण्यात आले आहे की या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करण्याची मुदत आता वाढवण्यात येत आहे.
नवीन सुधारित शासन निर्णयानुसार या योजनेचा लाभ घेण्यासाठी आता सर्व पात्र महिला दिनांक 31 ऑगस्ट 2024 पर्यंत अर्ज करू शकणार आहेत अर्ज उशिरा जरी केला तरी देखील तुम्हाला जुलै महिन्यापासूनच महिन्याला १५०० रुपये देण्यात येतील.Majhi Ladki Bahin Yojana Update
योजनेची अधिकची व सविस्तर माहिती पाहण्यासाठी क्लिक करा
माझी लाडकी बहिण योजना नवीन शासन निर्णय नुसार अपात्र असलेल्या महिला –
- ज्या महिलांच्या कुटुंबातील सदस्य आयकर दाता आहेत अशा कुटुंबातील महिला देखील अपात्र ठरणार आहेत.
- ज्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित अथवा कायम कर्मचारी, कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम, मंडळ भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहे किंवा सेवानिवृत्तीनंतर प निवृत्ती वेतन घेत आहे अशा देखील महिला अपात्र ठरणार आहे.
- सदर लाभार्थी महिलेने शासनाच्या इतर विभागांमार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे रुपये १५०० पेक्षा जास्त लाभ घेतला असेल अशा देखील महिला अपात्र ठरणार आहेत.
- ज्यांच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार अथवा आमदार आहेत किंवा इतर कुठल्याही बोर्डाचे अध्यक्ष उपाध्यक्ष किंवा संचालक आहेत अशा देखील महिला अपात्र ठरणार आहे.
- ज्यांच्याकडे चार चाकी वाहन ( ट्रॅक्टर वगळून) कुटुंबातील कोणत्याही सदस्याच्या नावावर असल्यास अशा महिला देखील या योजनेचा लाभ घेण्यासाठी अपात्र आहेत.Majhi Ladki Bahin Yojana Update
या योजनेचा अर्ज करण्यासाठी | येथे क्लिक करा |
Whatsapp Group जॉईन करण्यासाठी | येथे क्लिक करा |